Home /News /lifestyle /

VIDEO: पुण्याच्या गव्यासारखंच रस्ता चुकलं हे हरीण; पूर्ण रात्र विहिरीत पडून कुडकुडलं पण...

VIDEO: पुण्याच्या गव्यासारखंच रस्ता चुकलं हे हरीण; पूर्ण रात्र विहिरीत पडून कुडकुडलं पण...

पुण्यात पंधरवड्यात दोन वेळा रानगव्याने दर्शन दिलं. असंच एक हरीण रात्री रस्ता चुकून एका गावात शिरलं आणि नेमकं विहिरीत पडलं. पुढे काय झालं पाहा VIDEO

    मेहरोनी (उत्तर प्रदेश), 23 डिसेंबर : जंगलाचा (Forest) रस्ता चुकून गाव परिसरात आलेले प्राणी ही आता नवी गोष्ट राहिली नाही. पुण्यात पंधरा दिवसात दुसऱ्यांना गव्याने दर्शन दिलं. पहिला गवा माणसांच्या गर्दीचा बळी ठरला तर दुसऱ्या गव्याला त्याच्या जंगलात परत पाठवण्यात आपल्याला यश आलं. असंच एक हरीण (Deer) रात्री रस्ता चुकलं आणि गावाजवळ आलं. अचानक एका मोठ्या विहिरीत (well) पडलं. संपूर्ण रात्र विहिरीत कुडकुडत घालवल्यानंतर सकाळी गावकऱ्यांना या बिचाऱ्या हरीणाचा आवाज ऐकला. तेव्हा गावातील काही तरुण विहीरीत उतरले आणि अथक प्रयत्नांनंतर त्यांनी त्या हरणाच्या पिल्लाला सुखरूप बाहेर काढलं आहे. हरीण विहीरीत पडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रस्सीची व्यवस्था केली आणि हरणाला कसलीही दुखापत होऊ न देता त्याला सुखरुप बाहेर काढलं आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील मेहरोनी भागातील धवारी गावची आहे. असं म्हटलं जात आहे, की मध्यरात्रीच्या वेळी हरीण जंगलात फिरत असताना अचानक विहीरीत पडलं. सकाळी या हरणाचा आवाज ऐकल्यानंतर त्याला वाचवण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडिओदेखील बनवला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, बर्‍याच प्रयत्नांनंतर हरणाला दोरीनं बांधण्यात यश आलं आणि नंतर विहीरीतून अलगद बाहेर काढण्यात आलं. बचाव मोहिमेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, धवारी या गावात मंगळवारी पहाटे विहीरीत कोणतं तरी जनावर पडल्याचा फोन ग्रामस्थांना आला. आतमध्ये पाहिलं तर एक हरीण विहीरीच्या पाण्यात पोहत होतं. हरणाची एकंदरित स्थिती पाहून ते हरीण रात्रभर पाण्यात पोहत असावं, असा अंदाज ग्रामस्थानी व्यक्त केला. यानंतर हरणाला दोरीनं बांधून सुखरूप बाहेर काढून ग्रामस्थांनी या हरणाचा प्राण वाचवला आहे. या हरीणाचं रिस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यानंतर, हरणाला काही काळ उन्हात बसवण्यात आलं. गावकऱ्यांनी या हरीणाची माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि हरणाना जंगलात सोडून देण्यासाठी घेऊन गेले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Wild animal

    पुढील बातम्या