नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला खाण्यापिण्याशी संबंधित काही महत्त्वाचे नियम माहीत असले पाहिजेत. तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचे वजन कमी होऊ शकणार (Weight Loss Tips) नाही.
कॅलरीजवर (Calories) लक्ष ठेवा
'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार रात्रीच्या जेवणात तुम्ही किती कॅलरीज (Calories) वापरत आहात, यावर लक्ष हवे. त्याचा वजन कमी करण्यावर चांगला परिणाम होतो. फक्त निर्धारित कॅलरीज घ्या आणि रात्रीच्या जेवणानंतर काहीही खाणं टाळा.
असे खाऊ नका
टीव्ही किंवा मोबाईलवर काहीतरी पाहत अन्न खाऊ नका, अशा पद्धतीनं खाण्याची सवय योग्य नाही. त्यामुळे जेवणाचा वेळही वाढतो. अशा प्रकारे खाल्ल्याने तुम्ही निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीज घेता, ज्यामुळे वजन वाढू शकते.
हे वाचा - Stomach Pain: थंडीच्या दिवसात तुम्हीही पोटदुखीनं त्रस्त आहात का? हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी
जास्त खाणे टाळा
दोन मोठ्या जेवणांच्या दरम्यान काहीतरी मध्ये-मध्ये खावे. निरोगी स्नॅक्स घ्यावा. यामुळे तुम्ही जेवताना जास्त खाणे टाळाल आणि चयापचय देखील वाढेल. यामुळे वजन वाढीवर, पोट सुटण्यावर नियंत्रण राहील.
हलके जेवण करा
रात्री हलके अन्न खावे. जेव्हा तुम्ही जड अन्न खाता तेव्हा त्याचा चयापचयावर परिणाम होतो. हलके अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बरोबर राहील आणि चयापचय देखील वाढेल. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
हे वाचा - Health News: वेलचीचे आरोग्यासाठी आहेत हे 5 जबरदस्त फायदे, अनेक आजार राहतात दूर
जेवण स्कीप करणं योग्य नाही
वजन कमी करण्यासाठी तुम्ही जेवण स्कीप करत असाल तर ही योग्य पद्धत नाही. यामुळे अॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांना जास्तच त्रास होतो. त्याशिवाय असे केल्याने नंतर जेवताना जास्त खाल्ले जाते. त्यामुळे दिवसाचे किंवा रात्रीचे जेवण स्कीप करणे टाळावे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight loss, Weight loss tips