मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुम्हालाही माठातील थंडगार पाणी प्यायची सवय आहे? मग 'या' गोष्टींची न चुकता घ्या खबरदारी

तुम्हालाही माठातील थंडगार पाणी प्यायची सवय आहे? मग 'या' गोष्टींची न चुकता घ्या खबरदारी

माठातलं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं; पण ते व्यवस्थित पद्धतीनं साठवलं नाही, तर तब्येत बिघडू शकते. माठातील पाणी पिण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची जाणून घ्या.

माठातलं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं; पण ते व्यवस्थित पद्धतीनं साठवलं नाही, तर तब्येत बिघडू शकते. माठातील पाणी पिण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची जाणून घ्या.

माठातलं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं; पण ते व्यवस्थित पद्धतीनं साठवलं नाही, तर तब्येत बिघडू शकते. माठातील पाणी पिण्याआधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची जाणून घ्या.

मुंबई, 12 ऑगस्ट: उन्हाळ्यात माठातलं पाणी पिणं शरीरासाठी उत्तम असतं. फक्त उन्हाळ्यातच नाही, तर एरव्हीही माठातलं पाणी प्यावं. त्याचे अनेक फायदे आहेत. हे पाणी नैसर्गिकरीत्या थंड होतं. मातीपासून तयार केलेल्या माठामुळे पाणी निवळतं. त्यातले अनेक विषारी घटक शोषले जातात. त्यामुळे पाणी शुद्ध होतं; मात्र माठातलं पाणी पिताना काही गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. त्याबाबत जाणून घेऊ या. 'ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम'ने त्याबद्दल माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. माठातलं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं; पण ते व्यवस्थित पद्धतीनं साठवलं नाही, तर तब्येत बिघडू शकते. माठातलं पाणी दररोज बदलावं. पाणी कमी झाल्यावर त्यात भर घालून माठ पूर्ण भरला जातो. यामुळे माठ स्वच्छ करून भरला जात नाही. अशानं पाण्यात घातक जिवाणू तयार होतात. काही वेळा माठ रोजच्या रोज स्वच्छ न केल्यानं पाण्यात अळ्याही तयार होऊ शकतात. अशामुळे तब्येत बिघडते. म्हणून माठ रोज स्वच्छ करूनच त्यात पाणी भरावं. उन्हाळ्यात पाणी गार व्हावं, म्हणून माठ खिडकीच्या कडेला ठेवतात, कधी त्यावर ओलं कापड गुंडाळतात. असं केल्यानं धूळ कापडाला चिकटते. कधीकधी कापडावर बुरशीही वाढते. त्यामुळे कापड गुंडाळत असाल, तर माठ रोज धुतलाच पाहिजे. नाही तर पाणी दूषित होतं. त्याबरोबर माठावर झाकणही ठेवलं पाहिजे. हे झाकण खूप घट्ट नसावं. माठाच्या तोंडावर व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवा. त्यामुळे घाण, धूळ पाण्यात जाणार नाही. एखाद्यावेळी झाकण ठेवलं नाही तरी पाण्यात किडे, धूळ जाण्याचा धोका असतो. हेही वाचा - Bad Taste: तोंडाची चव बिघडलीय? 'हे' आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर माठातलं पाणी काढण्यासाठी ओगराळं (Long Handle Utensil) वापरा. लांब दांडा असलेल्या ओगराळ्यामुळे हात पाण्यापासून दूर राहतील. पर्यायानं हाताला काही जंतू किंवा घाण असल्यास पाण्यात मिसळणार नाही. त्यामुळे माठातून पाणी काढण्यासाठी ओगराळ्याचाच वापर करा. माठातलं पाणी आरोग्यदायी असतं. यामुळे पचनक्रिया सुधारते व पोट साफ होण्यास मदत होते. शरीरातली इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढण्यासाठीही माठातलं पाणी उपयुक्त असतं. फ्रीजमधल्या पाण्यामुळे घसा खवखवणं, सर्दी होणं या समस्या उद्भवू शकतात. माठातलं पाणी गार असलं, तरी त्यामुळे अशा समस्या उद्भवत नाहीत. या पाण्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते व रक्तदाब नियंत्रित राहतो. त्वचेसाठीही हे पाणी खूप फायदेशीर असतं. शरीरासाठी पाणी खूप गरजेचं असतं. पाणी किती प्यावं, कसं प्यावं याबाबत आयुर्वेदात काही नियम सांगितले आहेत. पाणी साठवण्यासाठीदेखील कशाचा उपयोग करावा याबाबत शास्त्रात मार्गदर्शन केलं आहे. त्या दृष्टीने मातीपासून तयार केलेला माठ किंवा डेरा हे पाणी साठवण्याचं एक उत्तम साधन आहे. काही गोष्टींची खबरदारी घेतली, तर हे पाणी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल.
First published:

Tags: Lifestyle, Water

पुढील बातम्या