कंबर दुखतेय? हे घरगुती उपाय करून पाहा

कंबर दुखतेय? हे घरगुती उपाय करून पाहा

पेनकिलर्स घेऊन साईड इफेक्टस होतात. अशा वेळी काही घरगुती,सुरक्षित उपायही आहेत.

  • Share this:

31 आॅगस्ट : हल्ली तरुणांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण वाढलंय. अनेकदा त्यासाठी डाॅक्टरांकडच्या फेऱ्या वाढतात. पेनकिलर्स घेऊन साईड इफेक्टस होतात. अशा वेळी काही घरगुती,सुरक्षित उपायही आहेत.

  • खोबरेल तेलानं मसाज करा. खोबरेल तेल गरम करायचं, त्यात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. गरम तेल थंड झालं की त्यानं दुखऱ्या भागावर मसाज करायचा.
  • मिठाच्या पाण्यानं शेक द्या. गरम पाण्यात मीठ टाका. आणि पाठ,कंबर त्या पाण्यानं शेका.
  • मिठानंही कंबर शेका. अगोदर मीठ चार-पाच मिनिटं गरम करा. आणि एका स्वच्छ कापडात गुंडाळून त्यानं कंबर शेका.
  • एकसारखं एकाच स्थितीमध्ये बसून कंबर दुखायला लागते. 40 मिनिटांपेक्षा जास्त बसू नये. अनेकदा आॅफिसमध्ये अनेक तास माणसं एकाच जागी काम करत राहतात. अधेमधे उठून फेरफटका मारावा.
  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कंबरदुखीचा त्रास उद्भवू शकतो. आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ जास्त असावेत.
  • आॅफिसमध्ये काम करताना ताठ बसावं. मान आणि पाठ ताठ ठेवावी.

First published: August 31, 2017, 2:37 PM IST

ताज्या बातम्या