आता तुम्हीच सांगा; आई की बायको, पुरुषावर सर्वात जास्त हक्क कुणाचा?

आता तुम्हीच सांगा; आई की बायको, पुरुषावर सर्वात जास्त हक्क कुणाचा?

आई आणि बायकोपैकी (Mother and wife) पुरुषावर सर्वात जास्त हक्का कुणाचा याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 03 एप्रिल : लग्नानंतर जसं एका महिलेचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. दुसऱ्या घरी म्हणजे सासरी गेल्यानंतर तिला तिथं वावरणं, त्या परिस्थितीत स्वतःला बसवणं सुरुवातीला थोडं कठीण जातं. नवी नाती (Relationship) जोडणं, त्यांना समजून घेणं, सर्वांच्या आवडी-निवडी-मन राखणं यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पण पुरुषांसाठीही लग्नानंतरचा (Man's life after marriage) हा काळ फार सोपा नसतो. लग्नानंतर पुरुषांसमोरील सर्वात मोठं आव्हान असतं ते आई आणि बायको (Mother and wife) या त्याच्या आयुष्यातील दोन अनमोल महिलांना सांभाळून घेणं.

लग्नानंतर बायकोसाठी नवरा 'मम्माज बॉय' तर आईसाठी मुलगा 'जोरू का गुलाम'. दोन्ही टॅग त्या पुरुषावर लागतात.  अनेकदा जेव्हा आई आणि बायकोची भांडणं होतात तेव्हा पुरुषांसाठी हा क्षण एखाद्या मोठ्या परीक्षेपेक्षा कमी नसतो. आई असो किंवा बायको कुणा एकाची बाजू घेतली तरी पुरुषांची पंचाईत व्हायची ती होणारच. आईची बाजू घेतली तर बायको आणि बायकोची बाजू घेतली तर आईचा राग. एकीने जन्म दिलेला आहे, लहानाचं मोठं केलं आहे. तर दुसरी आयुष्याची सोबतीण आहे, पुढील संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवायचं आहे. त्यामुळे कुणा एकाची निवड करणं प्रत्येक पुरुषांसाठी कठीणच असतं.

हे वाचा - भरधाव ट्रेनसमोर डान्स करत होता, पुढे असं काही घडलं की...; VIDEO पाहून थक्क व्हाल

तुझ्यासाठी कोण महत्त्वाचं मी की ती? आई आणि बायकोच्या प्रश्नाच्या कात्रीत अनेक जण अडकतात. बरं तुम्ही त्या प्रश्नाचं त्यांच्यासमोर खरं उत्तर देऊ शकत नाहीत. पण याबाबत तुम्ही सोशल मीडियावर तर व्यक्त होऊ शकता. आई आणि बायको यांच्यापैकी पुरुषांवर सर्वात जास्त हक्क कुणाचा असतो? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगते आहे.

पोलीस आशिष मिश्रा यांनी आपल्या सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच अशी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी एक प्रश्न विचारला होता. एका पुरुषावर सर्वात जास्त हक्क कुणाचा असतो? आई की पत्नी? विचार करून उत्तर द्या.

यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेक युझर्सनी हे एक धर्मसंकट असल्याचंच म्हटलं आहे. तर काहींनी आईच्या पारड्यातच मतं टाकली आहे. एका युझरने मात्र अगदी स्मार्टपणे उत्तर दिलं आहे. पुरुषावर पत्नीचा हक्क असतो आणि मुलावर आईचा हक्क असतो, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

हे वाचा - हौशी जोडपं! मनसोक्त फिरण्यासाठी सोडली नोकरी, 5 महिन्यापासून करतायेत प्रवास

नात्यांचा गुंता असा होतच असतो. जो सोडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आयुष्यातील स्थान आणि महत्त्व माहिती असायला हवं आणि तेच लक्षात घ्यायला हवं.

Published by: Priya Lad
First published: April 3, 2021, 10:35 PM IST

ताज्या बातम्या