मासिक पाळीच्या काळात मायग्रेनचा त्रास; 5 घरगुती उपायांनी मिळेल आराम

मासिक पाळीच्या काळात मायग्रेनचा त्रास; 5 घरगुती उपायांनी मिळेल आराम

अनेक महिलांना मासिक पाळीच्या आधी किंवा पाळीच्या काळात अर्धशिशीचा त्रास होतो.

  • Last Updated: Jul 31, 2020 02:29 PM IST
  • Share this:

डोकेदुखी आणि हार्मोन्समधील बदल यांचा संबंध महिलांमध्ये दिसून येतो. एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे दोन हार्मोन्स शरीरात असतात जे मासिक पाळी आणि गर्भावस्था यांना नियंत्रित करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तसेच ते मेंदूतील डोकेदुखीशी संबंधित रसायनांवरदेखील प्रभाव टाकतात. जर एस्ट्रोजनची पातळी एकसमान राहिली तर डोकेदुखी बरी होते. पण जर ती कमी-जास्त होत राहिली तर त्याने डोके दुखते.

अनेक महिलांना पाळीच्या आधी किंवा पाळीच्या काळात अर्धशिशीचा त्रास होतो. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं, अर्धशिशी हा डोकेदुखीचा प्रकार आहे. यामध्ये डोकं दोन्ही बाजूंनी किंवा कधी कधी एका बाजूने दुखते. या वेदना तीव्र असतात. अर्धशिशीचा त्रास जेव्हा होतो तेव्हा रक्तप्रवाह वाढलेला असतो त्यामुळे खूप वेदना होतात. पाळीच्या काळातील या अर्धशिशीच्या त्रासाचा उपचार अनेक प्रकारे करता येतो. पण काही सामान्य उपायांनी देखील त्रास कमी करता येतो. जाणून घेऊ या उपायांविषयी-

मॅग्नेशियम

मॅग्नेशियमची कमतरता अनेक त्रासाचे कारण आहे. डोकेदुखीची सुरुवात पण त्यामुळेच होते, विशेषतः अर्धशिशिची. पाळीच्या काळात अर्धशिशीचा त्रास कमी करण्यासाठी मॅग्नेशियम असलेला आहार भरपूर घ्यावा, अॅवोकॅडो, शेंगदाणे यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश असावा.

पुरेशी झोप

पाळीच्या काळात अर्धशिशीपासून सुटका हवी असेल तर आपण झोपेच्या सवयीवर लक्ष द्यायला हवे. झोपेची कमतरता आणि अति झोप यांचा संबंध हा अर्धशिशी या विकाराशी आहे. चांगली झोप घेण्याचा प्रयत्न करा. रोज ठरलेल्या वेळी झोप आणि ठरलेल्या वेळी उठा. या नियमित झोपण्यानेदेखील डोकेदुखीपासून आराम मिळेल.

तणाव

तणावामुळे अर्धशिशीचा त्रास होऊ शकतो. जर पाळीच्या काळात अर्धशिशीपासून मुक्ती हवी असेल तर दिवसभरातील ताणतणावाचे मूल्यांकन करा आणि तणाव कसा कमी करता येईल याचा प्रयत्न करा. रोज तसा प्रयत्न करा त्याने पाळीच्या काळात तणाव कमी होऊन अर्धशिशीचा त्रास होणार नाहीध्यान आणि व्यायाम हे तणाव कमी करण्यास मदत करू शकतात.

अंधाऱ्या खोलीत बसा

अर्धशिशीचा त्रास प्रकाश संवेदनशीलता वाढवू शकतो. प्रकाश संवेदनशीलतेमध्ये वाढ होण्यास फोटोफोबिया असेही म्हणतात. ही संवेदनशीलता वृद्धी 85 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये आढळून येते. मंद प्रकाश किंवा अंधाऱ्या खोलीत बसल्याने अर्धशिशीचा त्रास कमी होण्यात मदत होते.

कोल्ड कम्प्रेस

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, अर्धशिशीपासून आराम मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणजे कोल्ड कम्प्रेस अर्थात थंड बर्फाच्या पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवणे. काही बर्फाचे खडे घ्यावे त्यांना टॉवेलमध्ये गुंडाळावे आणि 10 मिनिटं कपाळावर ठेवावे. त्यानंतर कपाळावर 10 मिनिटं गरम पाण्याचा शेक कपाळाला द्यावा. आपल्या मानेवर पाठी मागे गरम पाण्याचा शेक द्यावा त्याने वेदना कमी होण्यास मदत होते.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - मायग्रेन

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्यविषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेतस्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून आपल्यासाठी आरोग्यविषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 31, 2020, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading