Home /News /lifestyle /

Reliance Retail ने व्होकल फॉर लोकल म्हणत 30 हजार कारागिरांना उपलब्ध केली ऑनलाइन बाजारपेठ

Reliance Retail ने व्होकल फॉर लोकल म्हणत 30 हजार कारागिरांना उपलब्ध केली ऑनलाइन बाजारपेठ

दिवाळीच्या निमित्ताने RIL ने 'Vocal for Local' मिशन सुरू करून जवळपास 30 हजार भारतीय कारागिरांना व्यासपीठ मिळवून दिलं. Indie by AJIO आणि Swadesh या नावाने कंपनीने 40 हजारांहून अधिक कलात्मक वस्तू विविध रिटेल प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध करून दिल्या होत्या.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 नोव्हेंबर : आत्मनिर्भर भारत किंवा स्वदेशी वस्तू हा नुसताच नारा ठरू नये असं एक उदाहरण समोर आलं आहे. रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) दिवाळीच्या निमित्ताने 'Vocal for Local' मिशन सुरू करून जवळपास 30 हजार भारतीय कारागिरांना व्यासपीठ मिळवून दिलं. Indie by AJIO आणि Swadesh या नावाने कंपनीने 40 हजारांहून अधिक कलात्मक वस्तू विविध रिटेल प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध करून दिल्या होत्या. 50 वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले पारंपरिक कारागिर, विणकर आणि कलाकार यांनी हाताने तयार केलेल्या 40 हजारांहून अधिक कलात्कम वस्तू दिवाळी निमित्ताने उपलब्ध झाल्या आणि यामुळे स्थानिक कलाकारांना मोठी बाजारपेठ खुली झाली. इंडी बाय अजिओ (Indie by AJIO) हा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे. रिलायन्सच्या या प्लॅटफॉर्मवरून स्थानिक कारागिरांनी केलेल्या हस्तकलेच्या आणि शोभिवंत वस्तू विकत घेता येतात. स्थानिक कारागिरांना रोजगार मिळावा आणि त्यांना मुख्य बाजारपेठेत सामावून घेता यावं या उद्देशाने व्होकल फॉर लोकल हा उपक्रम सुरू केल्याचं रिलायन्स फॅशन अँड लाइफस्टाइलचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद यांनी सांगितलं. या माध्यमातून आतापर्यंत 30 हजारांहूनअधिक कारागिर आणि त्यांच्या 600 हून अधिक पारंपरिक कला-उद्योग जोडले गेले आहेत. कलात्मक वैविध्य रिलायन्ल अजिओच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या वस्तूंमध्ये भरपूर कलात्मक वैविध्य सापडतं. त्यांच्या इंडी रेंजमध्ये (Indie Range) इक्कत, शिबोरी, बनारसी, अजरख से जामदानी, तांगड़, बाग, चंदेरी अशा पारंपरिक कापडांचा समावेश आहे. हे कापडावरचे काम करणारे विणकर आणि कलाकार गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधले आहेत. त्यांनी तयार केलेली हस्तशिल्प, विणलेलं, भरलेलं, शिवलेलं कापड ग्राहकांसाठी थेट उपलब्ध आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Shopping

    पुढील बातम्या