पार्टनरला लग्नासाठी प्रपोज करणार आहात, मग आधी हे वाचा

पार्टनरला लग्नासाठी प्रपोज करणार आहात, मग आधी हे वाचा

तुम्हाला जर तुमच्या नात्याला नवी ओळख द्यायची असेल तर या हटके टिप्स फॉलो करायला हरकत नाही.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै : अनेक लोकांना जिवापाड प्रेम करूनही आपल्या जोडीदाराला आपल्या मनातली गोष्ट सांगणं जमत नाही. जर तुम्ही एकमेकांवर प्रेम करत असाल तर तुम्हाला हटके आणि खास अंदाजात तुमच्या पार्टनरला लग्नासाठी प्रपोज करता आलं पाहिजे. मात्र अनेकांना अशावेळी काय करावं हे सुचत नाही. त्यामुळे पार्टनरच्या अपेक्षेप्रमाणं लग्नासाठी विचारणं त्यांना जमत नाही. जाणून घ्या काही अशा युक्त्या ज्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला हटके आणि खास अंदजात लग्नासाठी प्रपोज करून त्याला तुमचा जीवनसथी बनवू शकता. तुम्हाला जर तुमच्या नात्याला नवी ओळख द्यायची असेल तर या हटके टिप्स फॉलो करायला हरकत नाही.

या घरगुती उपायांनी निरोगी ठेवा तुमची किडनी

पेंटिंग- तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबतच्या फोटोचं पेंटिंग बनवून त्याला व्यवस्थित फ्रेम करून ते तुमच्या फर्टनरलाला गिफ्ट करू शकता. यासोबत पत्र देऊन तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करू शकता किंवा रोमँटिक कार्डमध्ये तुम्ही त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांवर कविता करून त्याला तुम्ही लग्नासाठी प्रपोज करू शकता.

या अनोख्या उपायानं दूर करू शकता विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण

सरप्राइज- सामान्यपणे प्रत्येकाला सरप्राइज आवडतं. ही थोडी पारंपरिक स्टाइल आहे. मात्र ही पद्धत अजूनही हिट आहे. तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही मॉल, पार्क किंवा असंच रस्त्यामध्ये गुढग्यावर बसून तुमच्या पार्टनरला सर्वांसमोर प्रपोज करू शकता. यावेळी तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तुम्ही त्याला सांगा. ज्यामुळे तुमच्या बद्दल त्याच्या मनातील आदर वाढेल आणि कदाचित लगेच होकार मिळेल.

लग्नानंतरही या 5 गोष्टी कधीच बदलत नाहीत

घरच्यांना भेटणं- भारतात ज्यास्तीत जास्त कुटुंबं लव्ह मॅरेजच्या विरोधात असतात. मात्र आता हा ट्रेंड बदलत आहे. पण तरीही आपल्या घरातल्यांना लग्नासाठी समजावणं अनेक कपल्ससाठी कठीण जातं. अशात जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या घरी जाऊन त्यांच्याशी मनमोकळे पणानं बोललात तर फक्त तुमच्या पार्टनरलाच नाही तर त्याच्या घरच्यांनाही तुमच्या प्रेमावर विश्वास बसतो. त्यामुळे कुटुंबीय सुद्धा लग्नासाठी तयार होतील.

=============================================================

पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?

First published: July 18, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading