Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship Funda : घरात असलो की बायको सतत भांडत असते, कधी कधी वाटतं....

Relationship Funda : घरात असलो की बायको सतत भांडत असते, कधी कधी वाटतं....

दिल्लीत एका पतीनं आपल्या पत्नीसोबत होणाऱ्या भांडणाला (wife fight) कंटाळून मल्टीनॅशनल कंपनीतील चांगल्या हुद्द्यावरची नोकरी सोडली, घर सोडलं आणि आता ड्रायव्हरची नोकरी करतो आहे. तुम्हीदेखील असेच तुमच्या बायकोच्या कटकटीला वैतागला आहात का?

दिल्लीत एका पतीनं आपल्या पत्नीसोबत होणाऱ्या भांडणाला (wife fight) कंटाळून मल्टीनॅशनल कंपनीतील चांगल्या हुद्द्यावरची नोकरी सोडली, घर सोडलं आणि आता ड्रायव्हरची नोकरी करतो आहे. तुम्हीदेखील असेच तुमच्या बायकोच्या कटकटीला वैतागला आहात का?

दिल्लीत एका पतीनं आपल्या पत्नीसोबत होणाऱ्या भांडणाला (wife fight) कंटाळून मल्टीनॅशनल कंपनीतील चांगल्या हुद्द्यावरची नोकरी सोडली, घर सोडलं आणि आता ड्रायव्हरची नोकरी करतो आहे. तुम्हीदेखील असेच तुमच्या बायकोच्या कटकटीला वैतागला आहात का?

पुढे वाचा ...
  • Published by:  Priya Lad

"तुला काही कदर आहे का माझी? मी ऑफिसला जायचं, घरचं पाहायचं. मुलांचंही सर्वकाही एकटीनं मी करायचं. मुलंच कशाला तूसुद्धा काही कमी नाहीस. तुलाही सर्व हातात द्यावं लागतं.वसभर मरमर मरायचं आणि शेवटी काय सर्वांचं करून मी सर्व काही ऐकायचं. तुलापण काहीच पडलेली नसते. माझ्यासाठी तुला वेळच नसतो. तू गेला नाहीस तर तुझ्या मित्रांच्या पार्ट्या कशा होतील, ते भटकायला कसे जातील नाही का? आज पण बघ कधी नव्हे ती सुट्टी घेऊन घरात बसला आहेस तीपण माझ्यासाठी नाही तर मित्रासाठीच"

"घरीच जेवायला ये म्हणे. त्याच्यासाठी पंचपक्वान कोण करणार? मीच ना. तुझीची काडीची मदत नाही. लग्नाआधी तर किती स्वप्नं दाखवलीस तुझ्यासाठी असं करेन, तसं करेन. आता स्वयंपाक शिक म्हटलं तर ते तुझ्यानं होत नाही. इतर कामात जरा मदत कर म्हटलं तर तुझा पुरुषी स्वाभिमान दुखावतो ना? घरातल्या कामाचा ठेका मीच घेतला आहे आणि संसाराचा गाडा सांभाळावा म्हणून पैसे कमवण्यासाठीही धडपड करायची. लग्न करून पश्चाताप झाला आहे मला. मुद्दामहून खड्ड्यात उडी मारल्यासारखी वाटते आहे मला"

समीरची बायको प्रेरणाची सकाळपासून अशीच बडबड सुरू होती. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. समीरचा बालपणीचा मित्र राजेश काही कामानिमित्त मुंबईत आला तर तो समीरला भेटायला आला. समीरनं त्याला आपल्या घरीच जेवायला बोलावलं होतं. तो घरी आल्यानंतरही प्रेरणाच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता.

तसं समीरसाठी हे नवं नव्हतं पण मित्रासमोर त्याला थोडं विचित्र वाटलं. किमान आपल्या मित्रासमोर तरी प्रेरणा शांत राहिल असं त्याला वाटलं. पण तसं काही झालं नाही. "वैताग आलाय तुझ्या या कटकटीचा असं म्हणजे मित्राला घेऊन घराचा दरवाजा धाडकन आपटून तो घराबाहेर पडला" तोदेखील रागानं लाल झाला होता. पण डोळ्यात कधी नव्हे ते पाणी आलं होतं. बायकोच्या भांडणाचा इतक्या महिन्यांचा राग, ताण त्यानं आपल्या मनात साठवून ठेवला होता आणि आपल्या बालपणीचा मित्र भेटताच त्याच्यासमोर त्यानं मन मोकळं केलं.

हे वाचा - Relationship Funda : नवरा नीट बोलत नाही, वागत नाही; त्याचं Office Affair तर नाही ना?

"अरे राजेश काय करू काहीच समजत नाही. प्रेरणावर मी तितकंच प्रेम करतो, जितकं आधी करायचो. पण तिला समजत कसं नाही. मला माहिती आहे ती खूप काम करते. पण मीदेखील काहीच करत नाही असं नाही. जास्त पैसे मिळावेत म्हणून जास्तीचं काम घेतलं आहे.. घरातील कामांचं म्हणायचं तर मी तिला आधीच सांगितलं होतं मला जमणार नाही. मोलकरीण ठेव म्हटलं तर तेदेखील नाही म्हणते ती. मग सांग आता मी काय करू"

"आणि राहिला प्रश्न तिच्यासाठी मी माझ्या मित्रांना तर नाही सोडू शकत नाही ना. ती जितकी मला प्रिय आहे, तितकेच माझे मित्रही. ती माझ्या आयुष्यात नव्हती तेव्हा माझ्या अडीअडचणीत तेच उभे राहिले होते माझ्यासाठी. आजही मला जेव्हा गरज पडते तेव्हा ते असतात. तर मग त्यांच्यासह काही आनंदाचे क्षण घालवले तर काय हरकत आहे"

"तिच्यासाठी काही करायचं म्हटलं तर कशाला काही नको, मी आहे त्यात खूश आहे, कशाला पैसे वाया घालवायचे असं म्हणते. कुठे कधी बाहेर जाऊया म्हटलं तर आता नको कंटाळा आला आहे, आता बिझी आहे, अशी काहीतरी कारणं देते आणि नंतर माझ्यासाठी काही करत नाहीस, वेळ देत नाही. असा दोष ती उलट माझ्यावरच लावते. वैताग आला आहे, सर्वाचा. म्हणून मी कधी घरात राहत नाही. पण आज तू येणार म्हणून घरात राहिलो. पण तेच दररोजचं. कधी कधी वाटतं घर सोडून निघून जावं दूर कुठेतरी, कधी तरी रागात स्वतःलाच काहीतरी करून घ्यावंसं वाटतं"

हे वाचा - बायकोच्या जाचाला कंटाळून सोडली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, ड्रायव्हर म्हणून करतोय काम

राजेशचं हे रडगाणं म्हणजे तुम्हाला आपलंच वाटेल. घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ना. लग्नानंतर काही वर्षांनी पती-पत्नीच्या नात्यात प्रेमाऐवजी भांडणंच जास्त असतात. मग ते लव्ह मॅरेज का असेना. भांडखोर आणि कटकट्या बायकोमुळे तुम्हीही त्रस्त झाला असाल.

न्यूज 18 लोकमतशी बोलताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद, "नात्यामध्ये अपेक्षा कायम राहतात. मात्र हनीमूनचा काळ दीर्घकाळ राहिलच असं नाही. लग्न म्हणजे अशा दोन व्यक्तींमधील प्रवास ज्या वेळेनुसार पुढे जातात. साहजिकच परिस्थितीदेखील बदलते. जबाबदारीचं ओझं, ताणतणाव वाढला की त्याचा परिणाम कोणत्याही नात्यावर होतो. आर्थिक चिंता, मुलांची जबाबदारी, स्वतःसाठी कमी वेळ मिळलं, पत्नी-पत्नी एकमेकांना पुरेसा वेळ देऊ न शकणं यामुळे गैरसमज वाढू शकतात. पत्नी-पत्नीमध्ये योग्य संवाद न होणं, संवादाची कमतरता यामुळे वैवाहिक आयुष्यात समस्या अधिक वाढतात. दररोज तोच दिनक्रम, तेच तेच पुन्हा करणं यामुळे जोडीदाराला कंटाळा आलेला असतो. शिवाय पुरेसा वेळ नसल्यानं नवीन काहीतरी करण्याची संधीही मिळत नाही. ही सर्व कारणं यामागे असतात"

"पती-पत्नी नात्यात गोष्टी आपोआप न सांगता कळायला पाहिजेत असं नसतं. एकमेकांचा स्वभाव, सवयींबद्दल चर्चा, एकमेकांचा जगण्याबद्दलचा दृष्टीकोन काय आहे? जोडीदारामध्ये काय बदल अपेक्षित आहेत? एकमेकांच्या आनंदाची परिभाषा काय आहे? एकमेकांचे विचार समजून घेणं, त्याबाबतीत सुसंवाद साधणं गरजेचं आहे. समजून सांगणं आणि समजून घेणं ही प्रक्रिया जाणीवपूर्वक व्हायला हवी. सुसंवाद साधल्यानंतरदेखील काही अडचणी येत असतील तर समुपदेशकाचा सल्ला घेऊ शकता", असा सल्ला समुपदेशक संहिता सावंत यांनी दिला आहे.

First published:

Tags: Relationship, Relationship tips, Wife and husband