Home /News /lifestyle /

Relationship Funda : बॉयफ्रेंडला माझ्याकडून 'ते' हवंय! रिलेशनशिपमध्ये Sex

Relationship Funda : बॉयफ्रेंडला माझ्याकडून 'ते' हवंय! रिलेशनशिपमध्ये Sex

'खरं सांगायचं तर तो जे काही मागतो आहे, ते मलादेखील हवंहवंसं वाटतं आहे. पण... एवढ्या थोड्या महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर लगेच Sex करावं का?' Relationship Expert यावर काय म्हणतात वाचा...

    प्रितेश म्हणजे माझा बॉयफ्रेंड (boyfriend) आणि मी आम्ही आमच्या फ्रेंड्ससह अलिबागला पिकनिकला गेलो. एक रात्र राहण्याचा आमचा प्लॅन. तसं आम्ही सर्वजण कपल्सच (couple) होतो. म्हणजे प्रत्येकीचा बॉयफ्रेंड होता आणि प्रत्येकाची गर्लफ्रेंड (girlfriend). सिंगल असं आमच्यात कुणीच नव्हतं. त्यामुळे कपल्स म्हणून आम्ही वेगवेगळ्या रूम बुक केल्या होत्या. साहजिकच प्रितेश आणि मी त्या दिवशी एकाच खोलीत होतो. तसं एरवी मुंबईत जिथं आम्ही राहतो तिथं फिरताना हातात हात धरायचीही आम्हाला भीती वाटायची. पण तिथं तसं आम्हाला कुणी पाहणारं नव्हतं. त्यामुळे प्रितेश आणि मी एकमेकांच्या इतकं जवळ आलो जितकं आम्ही यायला नको होतं. त्या दिवशी त्याचा स्पर्श काही वेगळाच जाणवत होता. दोघांच्या शरीरातही एक वेगळाच रोमांच होता. आमच्या नकळत आमचे ओठ कधी एकमेकांना भिडले समजलंच नाही. का कुणास ठाऊक काही तरी झालं आणि मी एखादं स्वप्नं पडल्यावर ताडकन उठून जागं व्हावं, तसे उठले आणि प्रितेशला दूर लोटलं. प्रितेशनंही नंतर काही केलं नाही. पण तेव्हापासून प्रितेशचा तो स्पर्श मी आजही विसरले नाही. मला अजूनही तो स्पर्श हवाहवासा वाटतो. मुंबईत आताही जेव्हा कधी आम्ही दोघं भेटतो तेव्हा प्रितेश त्याच पद्धतीनं माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि मलाही ते आवडतं. अशात प्रितेशनं मला आपण आता रिलेशनशिपच्या पुढच्या टप्प्यावर जाऊया का? असं विचारलं. हा पुढचा टप्पा म्हणजे सेक्स. त्यानं फक्त एकदाच हा विषय काढला मात्र कृतीतून तो हे सातत्यानं दाखवून देतो. हे वाचा - ती सध्या 'कुणाशी' बोलते; बायको सतत फोनवर असल्यानं तुमच्या मनातही असा संशय? तशी प्रितेशची आणि माझी ओळख वर्षभराची. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडचा तो मित्र. मी त्याला फार ओळखत नाही. मात्र आम्ही जेव्हापासून रिलेशनशिपमध्ये आहोत तेव्हापासून तो माझ्यासोबत कधी चुकीचा वागला नाही. त्यानं नेहमी मला काय हवं नको त्याचा विचार केला. माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या आणि आज तर तो माझ्याकडे काही मागतो आहे, तर मला त्याला नकार द्यावासा वाटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर तो जे काही मागतो आहे, ते मलादेखील हवंहवंसं वाटतं आहे. पण माझ्या संस्कारक्षम मनाला पटत नाही आहे. माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीशीही याबाबत बोलले तर तिनं तर अशी प्रतिक्रिया दिली जसं काही हे फार मोठं नाही. म्हणजे अगदी कॉमन आहे. पण तरी मनात एक भीती आहेच. Redwomb वरील Sexual wellness columnist पूजा प्रियंवदा यांनी सांगितलं, "सेक्स हे शारीरिक आहे, हे सर्व तरुणांना माहिती असतं, मात्र पहिल्यांदाच सेक्स करताना होणाऱ्या मानसिक परिणामांना सामोरं जाण्यास ते तयार नसतात. खरंतर प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. त्याचं संगोपन आणि त्याचे वैयक्तिक प्राधान्य यावरून सेक्स कधी आणि किती करावा हे ठरतं. बहुतेक मुलींना लग्नासाठी Saving the hymen म्हणजेच virginity टिकवून ठेवणं हा निर्णायक घटक असतो. तर एखाद्याकडून दबाव आणि कुतूहल यामुळे मुलांना पुढाकार घेऊन सेक्स करणं भाग पडतं" हे वाचा - Relationship Funda : होणाऱ्या नवऱ्याला फक्त ऑनलाइनच भेटलेय आणि आता लग्न करायचंय, काय करू? "कोणत्याही नात्यात पहिल्याच भेटीत किंवा अगदी लगेच पहिल्यांदाच सेक्स करणं योग्य नाही, तर जेव्हा दोघांनाही सेक्सबाबत पुरेशी माहिती असते आणि ते तयार असतात तेव्हाच पहिल्यांदा सेक्स करावं. तुम्ही सेक्ससाठी तयार आहात की नाही हे जाणून घ्यायचं असेल, तर स्वत:ला काही प्रश्न विचारा. तुम्हाला सेक्स, गर्भनिरोधक (contraception), सुरक्षित आणि निरोगी सेक्सची पद्धत (safe and hygienic sexual practices) याबाबत किती माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्सबाबत नकारात्मक आणि गंभीर अशा प्रतिक्रिया हाताळण्यासाठी तुम्ही तयार आहात का? पहिल्यांदाच केलेलं सेक्स तणावपूर्ण किंवा जबरदस्ती केलेलं नसावं, तर अविस्मरणीय आणि मजेशीर असायला हवं", असं प्रियंवदा म्हणाल्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Relationship, Relationship tips, Sexual relationship

    पुढील बातम्या