मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship आणि Dating मध्ये बदलल्यात बऱ्याच गोष्टी! मुलीला पहिल्यांदा भेटत असाल, तर 4 टिप्स ठेवा लक्षात

Relationship आणि Dating मध्ये बदलल्यात बऱ्याच गोष्टी! मुलीला पहिल्यांदा भेटत असाल, तर 4 टिप्स ठेवा लक्षात

आजकाल Dating बरंच कॉमन झालंय. पण रिलेशनशिपमध्ये बरंच काही बदललं आहे. पूर्वीच्या फिल्मी स्टाइलने वागाल तर चालणार नाही.. आधी या 4 गोष्टी समजून घ्या

आजकाल Dating बरंच कॉमन झालंय. पण रिलेशनशिपमध्ये बरंच काही बदललं आहे. पूर्वीच्या फिल्मी स्टाइलने वागाल तर चालणार नाही.. आधी या 4 गोष्टी समजून घ्या

आजकाल Dating बरंच कॉमन झालंय. पण रिलेशनशिपमध्ये बरंच काही बदललं आहे. पूर्वीच्या फिल्मी स्टाइलने वागाल तर चालणार नाही.. आधी या 4 गोष्टी समजून घ्या

     नवी दिल्ली, 2 सप्टेंबर: आजच्या आधुनिक काळात तरुण पिढीची (Young Generation) जीवनशैलीच (Lifestyle) बदलली आहे. आजकाल मुला-मुलींनी भेटणं, एकत्र फिरणं गैर मानलं जात नाही. तरुण पिढी लग्नाशिवाय लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहण्यास अधिक पसंती देत आहे. आजकालच्या मुलीही धीट, स्वतंत्र आणि आधुनिक विचारसरणीच्या आहेत. आपलं मत, आपली आवड-निवड याला त्यांचं प्राधान्य असतं. अशा या बदलत्या काळात डेटिंगचे ट्रेंडही (Dating Trend) बदलले आहेत. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा एखाद्या मुलीबरोबर डेटवर जात असाल तर काही गोष्टींची पक्की खूणगाठ बांधा. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतच्या काही टिप्स प्रसिद्ध केल्या आहेत. आता 'लेडीज फर्स्ट'ची गरज नाही : पूर्वी प्रत्येक बाबतीत, पुरुष महिलांना ‘लेडीज फर्स्ट’ (Ladies First) असं म्हणत, त्यांना आपल्या मनातली गोष्ट सांगण्यास प्रोत्साहन देत. कारण मुलींना अशा गोष्टी सांगण्यास संकोच वाटत असे; पण आजच्या मुलींचा समानतेवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांना ‘लेडीज फर्स्ट’ची गरज वाटत नाही. त्या सर्व काही उघडपणे सांगतात आणि विचारतातही. अगदी प्रेम व्यक्त करण्यापासून आणि प्रपोज करण्यापर्यंत, कोणत्याही बाबतीत मुली आता संकोचत, लाजत नाहीत. पहिल्या भेटीसाठी नटून-थटून येणं, लाजणं वगैरे नको: पूर्वीच्या काळी मुली पहिल्यांदा जेव्हा मुलाला भेटायला जात तेव्हा खास तयारी करत. छान साडी नेसून किंवा ड्रेस घालून, नटून-सजून त्या भेटायला जात. नजर झुकवत त्या बोलत, लाजत लाजत लग्नासाठी संमती देत; पण आजच्या काळातल्या मुलींना त्या जशा आहेत तशाच पहिल्या भेटीत स्वतःला सादर करणं पसंत करतात. नात्याच्या सुरुवातीला त्यांच्या काही अटीही असतात. तुम्ही त्यांना त्या जशा आहेत तशा स्वीकारायला तयार असाल तर ठीक, अन्यथा बाय बाय, अशी त्यांची भूमिका असते. कोण कुणासाठी काय करतेय हे मुलींसाठी महत्त्वाचं नसतं : पूर्वीच्या काळी डेटवर जाण्यासाठी, मुलगा मुलीला ठरलेल्या ठिकाणी येऊन तिला फिरण्याच्या ठिकाणी नेत असे. आपल्या पार्टनरकडून भारतीयांना काय हवंय? सर्व्हेतून आली धक्कादायक माहितीसमोर तिच्यासाठी सरप्राइज प्लॅन (Surprise Plan) बनवत असे; पण आजच्या मुलींसाठी, कोण काय करतं हे महत्त्वाचं नसतं. मुलगी स्वतःच्या वाहनाने (Own Vehicle) येते आणि कधीकधी ती मुलाला पिक-अप करते. मुलाला सरप्राइज देण्यापासून ते बिल भरण्यापर्यंत मुली आता स्वतः पुढाकार घेतात. त्यासाठी त्या मुलांवर अवलंबून नसतात. आताच्या मुलींना इतरांसोबतच स्वतःची जबाबदारी कशी घ्यावी याचीही चांगली माहिती आहे. डेटिंग करणं म्हणजे लग्नासाठी होकार नव्हे पूर्वीच्या काळी मुलगा-मुलगी डेटवर जाऊ लागले की त्यांचं लग्न (Marriage) होणार, असं गृहीत धरलं जात असे; पण आजच्या काळात डेटिंगनंतर लग्न होईलच असं नसतं. आजच्या काळातल्या मुली पहिल्या भेटीमध्ये आपल्या अटी मुलासमोर ठेवतात. समोरच्या व्यक्तीचीही त्या परीक्षा करतात. मुलीला मुलगा योग्य वाटला तरच पुढची भेट ठरते. नाही तर हे नातं इथंच संपतं किंवा फक्त मैत्रीपुरतं (Friendship) मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला जातो.
    First published:

    Tags: Relationship, Relationship tips

    पुढील बातम्या