मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship Tips: तुमचा बॉयफ्रेंड, नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करतो का? तर नात्यातला गोडवा जपण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Relationship Tips: तुमचा बॉयफ्रेंड, नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करतो का? तर नात्यातला गोडवा जपण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

मात्र विनाकारण जोडीदार दुर्लक्ष करत असेल, तर कसं वागावं हे अनेकदा कळत नाही. त्याबद्दल काही टिप्स जाणून घेऊ या.

मात्र विनाकारण जोडीदार दुर्लक्ष करत असेल, तर कसं वागावं हे अनेकदा कळत नाही. त्याबद्दल काही टिप्स जाणून घेऊ या.

मात्र विनाकारण जोडीदार दुर्लक्ष करत असेल, तर कसं वागावं हे अनेकदा कळत नाही. त्याबद्दल काही टिप्स जाणून घेऊ या.

मुंबई, 09 ऑगस्ट: नातं टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास आणि संवाद जितका महत्त्वाचा असतो, तितकंच महत्त्वाचं असतं एकमेकांना स्पेस देणं. एकमेकांचे जोडीदार असले, तरी दोन व्यक्ती स्वतंत्र विचारांच्या व मतांच्या असतात. सतत एकमेकांचाच विचार करणं, एकमेकांसाठीच गोष्टी करणं यामुळे नाती एकसुरी होऊ शकतात. स्वतःची ओळख जपून दुसऱ्याच्या सोबतीनं पुढे जाता आलं तरच नातं टिकवता येतं. नाही तर वाद आणि भांडणं सुरू होतात. काही वेळा जोडीदार दुर्लक्ष करू लागतात. काही कारणामुळे जोडीदार नाराज असेल, तर ती नाराजी दूर करता येते; मात्र विनाकारण जोडीदार दुर्लक्ष करत असेल, तर कसं वागावं हे अनेकदा कळत नाही. त्याबद्दल काही टिप्स जाणून घेऊ या. 'ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम'ने त्याबद्दल माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जोडीदाराची नाराजी कधी शब्दांतून व्यक्त होते, तर कधी त्याच्या शांत असण्यातून कळते; मात्र जोडीदार दुर्लक्ष करू लागला, तर काय करावं हे सुचत नाही. प्रत्येक वेळी याकडे संशयानं पाहण्याची आवश्यकता नसते. काही वेळा स्वतःची स्पेस मिळवण्यासाठीही जोडीदार दुर्लक्ष करू लागतो. त्यामागचं नेमकं कारण समजून घ्या. जोडीदार दुर्लक्ष करत असेल, तर अनेक वेळा समोरची व्यक्ती टोचून बोलते किंवा सतत काही ना काही बोलायला भाग पाडते. अशा वेळी शांत राहा. जोडीदाराच्या कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. त्याच्याशिवायही तुम्ही खूश आहात असं त्याला जाणवू द्या; मात्र हे करताना तुमच्या वागण्यात उद्धटपणा येऊ देऊ नका. बऱ्याच वेळा जोडीदारानं दुर्लक्ष करायला सुरुवात केली, की दुसरी व्यक्ती त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागते. जोडीदार लांब जाण्याची भीती त्यांना तसं वागायला भाग पाडते; मात्र तसं करण्यानं काहीच साध्य होणार नाही. उलट शांत राहण्यानं जोडीदाराला विचार करायला वेळ मिळेल. हेही वाचा - Parenting Tips : अशा पद्धतीने मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवा, मुलं होतील कॉन्फिडन्ट आणि मॅच्युअर नात्यांमध्ये स्पेस न मिळाल्यामुळेही जोडीदार दुर्लक्ष करू लागतो. अशा वेळी एकमेकांचं स्वतंत्र अस्तित्व जपणं, एकमेकांच्या स्पेसचा आदर ठेवणं या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्या जोडीदाराला त्याची इतरांसोबत सततची तुलना दुखावणारी ठरते. जोडीदार जसा आहे, तसाच त्याचा स्वीकार केला पाहिजे. यामुळे एकमेकांचा सहवास आनंनदायी होतो. एखाद्या गोष्टीवरून मतभेद झाले, तर नाराजी दर्शवण्यासाठीही दुर्लक्ष केलं जातं. अशा वेळी नाराजीमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. बोलून, संवाद साधून हा प्रश्न सोडवता येतो. तुमची चूक असेल, तर माफी मागून भांडण मिटवा. तुमची चूक नसेल, तर जोडीदाराला तुमची बाजू पटवून द्या. घरातलं वातावरण चांगलं ठेवा. जोडीदाराला एखादं सरप्राइज द्या, भेटवस्तू देऊन तुमचं प्रेम व्यक्त करा. हेही वाचा - प्री-डायबिटीज असेल तर डायबिटीज होण्याचा धोका जास्त; या गोष्टींची वेळीच घ्या काळजी तुमचा जोडीदार दुर्लक्ष करत असेल, तर तुम्हीही त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. याआधी प्रत्येक गोष्ट तुम्ही जोडीदाराला सांगत असाल, तर आता तसं करू नका. त्यामुळे कदाचित जोडीदाराला तुम्हाला गमावण्याची भीती वाटेल व तो/ती लक्ष द्यायला लागेल. संसार आनंदी करण्यासाठी एकमेकांसाठी वेळ देण्याबरोबरच एकमेकांना आपापला स्वतंत्र वेळ देणंही गरजेचं आहे. मोकळा संवाद आणि समाधानी वृत्ती या गोष्टी नातं टिकवण्यासाठी उपयोगी पडतात.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या