Home /News /lifestyle /

Relationship Tips: नात्यात दुरावा आलाय? भांडण किंवा तणाव मिटवण्यासाठी फक्त या गोष्टी करा

Relationship Tips: नात्यात दुरावा आलाय? भांडण किंवा तणाव मिटवण्यासाठी फक्त या गोष्टी करा

काही वेळा कपल्स (Couples) इतकी दुरावतात, की ती एकमेकांचं तोंडदेखील पाहत नाही. अशा प्रकारामुळे साहजिक तणावाची (Stress) स्थिती निर्माण होते. कपल्समधल्या भांडणाला एखादं साधं कारणही पुरेसं ठरतं. कसा सोडवाल हा गुंता?

मुंबई, 11 जानेवारी ः  प्रत्येक नात्यात (Relation) लहान-मोठे वादविवाद होत असतात. परंतु, काही वेळा विसंवाद, गैरसमजुतीमुळे वैवाहिक जीवनातले छोटे वाददेखील नात्यावर गंभीर परिणाम करतात. अशा गोष्टींमुळे नातं तुटणं, अयशस्वी होण्याचे प्रकार घडतात. काही वेळा कपल्स (Couples) इतकी दुरावतात, की ती एकमेकांचं तोंडदेखील पाहत नाही. अशा प्रकारामुळे साहजिक तणावाची (Stress) स्थिती निर्माण होते. कपल्समधल्या भांडणाला एखादं साधं कारणही पुरेसं ठरतं. हे कारण प्रसंगी नातं तुटण्यालाही कारणीभूत ठरू शकतं. नात्यात विश्वास, समजूतदारपणा, खुलेपणा आणि सुसंवाद आवश्यक असतो. रिलेशनशिपमध्ये (Relationship) पडलेलं अंतर कमी करण्यासाठी, हेल्दी रिलेशनसाठी काही टिप्स निश्चितच फायदेशीर ठरू शकतात. याबाबतची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने प्रसिद्ध केली आहे. काही कारणांमुळे पती-पत्नीमध्ये एकमेकांविषयी नाराजी असल्यास त्यामुळे नातं तुटण्याची शक्यता असते. एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास दोघांमध्ये वादविवाद सुरू होतात. नातं तुटू नये, यासाठी दोघांमध्ये संयम, योग्य समज आणि सुसंवाद (Communication) आवश्यक आहे. लहान वयाच्या पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास महिला का होतात तयार? वैवाहिक जीवनात काही जणांना जोडीदारानं आपल्या मनाप्रमाणे वागावं असं वाटतं. यासाठी ते आग्रहीदेखील असतात. जोडीदाराची मानसिकता बदलेल आणि नात्यात सगळं आलबेल होईल असं संबंधित व्यक्तीला वाटतं. परंतु, असं नातं असफल ठरू शकतं. त्यामुळे जोडीदाराला गुणदोषांसह स्वीकारणं श्रेयस्कर ठरतं. समजूतदारपणा नसल्यामुळे नात्यात अनेकदा दुरावा निर्माण होतो. त्यामुळे जोडीदाराला समजून घेणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे. कधीकधी असं केल्यानं सर्व गैरसमज दूर होण्यास मदत होते आणि नात्यातला गोडवा वाढू लागतो. नातं कसं खुलतं? अनेकदा कपल्सची वागणूक अत्यंत कठोर (Restraint) असते. यामुळेही नात्यात दुरावा (Distance) निर्माण होतो. सुंदर दिसण्यासाठी जास्त काही करू नका, फक्त झोपा; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत एखाद्या व्यक्तीशी नातं जोडल्यानंतर त्याच्या जुळवून घेणं हितावह ठरतं. त्यामुळे कपल्सनी एकमेकांशी परखड किंवा कठोर वागण्यापेक्षा एखादी गोष्ट आवडली नाही, तर त्याबाबत सुसंवाद साधावा. एकमेकांना समजून घ्यावं. जोडीदाराशी खुलेपणानं संवाद नसल्यानं नात्यात दुरावा निर्माण आल्याचं दिसून येतं. नातं मजबूत करण्यासाठी एकमेकांनी खुलेपणानं, मनमोकळा संवाद साधणं आवश्यक आहे. तसंच मनातल्या भावना एकमेकांशी शेअर (Share) करणं गरजेचं आहे. यामुळे नातं अधिक खुलत जातं. एकूणच या टिप्सचा वापर दैनंदिन जीवनात केला तर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. वादविवाद कमी होतील. परस्परांमधला संवाद, शेअरिंग वाढेल. जोडीदाराला ओळखणं सोपहोईल. रिलेशनशिप मजबूत झाल्यानं आयुष्यातला आनंद द्विगुणित होण्यास मदत होईल.
Published by:News18 Web Desk
First published:

Tags: Relationship, Relationship tips

पुढील बातम्या