सावधान! तुमच्या 'या' 3 गोष्टींमुळे जोडीदार जाऊ शकतो दूर

सावधान! तुमच्या 'या' 3 गोष्टींमुळे जोडीदार जाऊ शकतो दूर

नात्यामध्ये कोणत्या गोष्टींमुळे तुमचा साथीदार असुरक्षित आहे हे वेळीच जाणून कसं घ्यायचं हे जाणून घ्यायला हवं. आपली पर्सनल स्पेस प्रत्येकासाठी महत्त्वाची हाच नातं टिकवण्याचा कानमंत्र आहे.

  • Share this:

मुंबई : सध्याच्या मॉडर्न Lifestyle मध्ये  रिलेशनशिप हा एक ट्रेंड बनला आहे. प्रेम हे माणसाची आवड आणि गरज दोन्ही बनलं आहे. प्रेमाच्या नात्यात आपल्या जोडीदारावर हक्क गाजवणं तसंच पार्टनरसाठी त्याग करणं या गोष्टी ओघानं केल्या जातातच. पण रिलेशनशिपमध्ये एका काळानंतर असंही होतं की, पार्टनरच्या छोट्या छोट्या गोष्टींवरही शंका येते. त्यामुळे प्रत्येक गोष्टींवर प्रश्नांचा भडिमार सुरू होतो. परिणामी वाद विवाद होतात. तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जात आहे. तर एकदा त्याच्याशी शांतपणे बोला. पण नात्यामध्ये कोणत्या गोष्टींमुळे तुमचा साथीदार असुरक्षित आहे हे वेळीच जाणून कसं घ्यायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सतत फोनवर पाळत – कोणत्याही व्यक्तीच्या खासगी जीवनात प्रमाणापेक्षा जास्त दखल देणं किंवा त्या व्यक्तीचा फोन त्याच्या नकळत तपासणं चुकीचं मानलं जातं. पण, काहीजण त्यांच्यातील असुरक्षिततेमुळे जोडीदाराचा फोन चेक करतात. या गोष्टीचं प्रमाण पुढे वाढतं आणि मग फोन बिझी आला तरी त्यावर प्रश्नचिन्ह उठवलं जातं. आणि त्यावरून जोडीदाराला वायफळ प्रश्न विचारत असेल तर..  नातं कधीही तुटू शकेल याचे हे संकेत मानावेत. नात्यात प्रायव्हेट स्पेस मिळणं आवश्यक आहे.

वजन कमी करण्यासोबत बडीशेप खाण्याचे आहेत अनेक 'हे' 5 फायदे

ऑनलाईन असण्यावरही आक्षेप – सोशल मीडियाचा जमाना आहे आणि प्रत्येक जण त्याच्या आवडीनुसार त्याचा वापर करतो आणि सोशल मीडियानर अ‍ॅक्टीव्ह राहावं की नाही किंवा किती वेळ राहावं हा वैयक्तिक प्रश्न आहे. रिलेशनशिपमध्ये असताना जोडीदारावर सतत पाळत ठेवणं आणि तो किंवा ती ऑनलाईन हे का? कशासाठी आहे? कुणाशी चॅट करतोय किंवा करतेय हे चेक करणं सुरक्षित असण्याचं मोठं लक्षण आहे. याचा जो पाळत ठेवतो त्याला त्रास होतोच, पण पार्टनरला जर ही गोष्ट समजली तर त्याचा नात्यावर थेट परिणाम होऊ शकतो.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायचा असेल तर स्त्रियांनी लावून घ्यायला हवी 'ही' सवय

मैत्रीवर शंका -  पार्टनरच्या वैयक्तिक आयुष्यात सारखं लक्ष घालणं टाळावं. आपला जोडीदार कोणाच्या संपर्कात आहे किंवा त्याचा मित्रपरिवार काय करतोय, कुणाबद्दल बोलतोय यावर सतत लक्ष ठेवलं तर ते नात्यात दुरावा निर्माण करण्याचं कारण होऊ शकतं. मित्र किंवा मैत्रिणीवर शंका घेत सतत पाळत ठेवणं, त्यांच्याशी संपर्क तोडण्यास भाग पाडणं म्हणजे असुरक्षित होणं. त्यातुन तुमची पर्सनल लाईफ आणि स्पेस पूर्णपणे नष्ट होते.

लक्षात ठेवा नात्याचं ओझं झालं तर तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघांच्याही आयुष्यात समस्या येतील. त्यामुळे नात्यातील गुंता प्रेमानं सोडवा. पण त्यानंतरही तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर होऊ इच्छित असेल तर त्याला तसंच जाऊ द्या. यामुळे काही काळासाठी तुम्हाला त्रास होईल पण नंतर काही काळानं तुम्हालाही शांत आणि समाधानी वाटेल. नात्यात अविश्वास असेल तर नातं टिकत नाही. एकदा विश्वास उडाला की, नात्यात राहणं हेही योग्य नाही. त्यामुळे आपल्या सवयींमुळे दुसऱ्याची पर्सनल स्पेस तुम्ही धोक्यात आणत असाल तर वेळीच सावध व्हा!

VIDEO : राष्ट्रवादीला धक्का, शहापूरचे आमदार शिवसेनेत दाखल

First Published: Jul 11, 2019 03:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading