मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship Tips : तुमचं लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही? असं तपासा तुमच्या नात्याचं आयुष्य

Relationship Tips : तुमचं लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही? असं तपासा तुमच्या नात्याचं आयुष्य

लोक एकमेकांना समजून न घेता घाईगडबडीत नातं जोडतात आणि नंतर ते एकमेकांशी न पटल्यामुळे नातं लवकर संपवतातही. मात्र कोणत्याही नात्यात पार्टनरला पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं.

लोक एकमेकांना समजून न घेता घाईगडबडीत नातं जोडतात आणि नंतर ते एकमेकांशी न पटल्यामुळे नातं लवकर संपवतातही. मात्र कोणत्याही नात्यात पार्टनरला पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं.

लोक एकमेकांना समजून न घेता घाईगडबडीत नातं जोडतात आणि नंतर ते एकमेकांशी न पटल्यामुळे नातं लवकर संपवतातही. मात्र कोणत्याही नात्यात पार्टनरला पुरेसा वेळ देणं गरजेचं असतं.

  मुंबई, 12 ऑगस्ट : हल्ली आपली नाती खूप संवेदनशील झाली आहेत. नाती जितक्या लवकर जुळतात तितक्याच लवकर ती तुटतातही. लोक एकमेकांना समजून न घेता घाईगडबडीत नातं जोडतात आणि नंतर ते एकमेकांशी न पटल्यामुळे नातं लवकर संपवतातही. मात्र कोणत्याही नात्यात पार्टनरला पुरेसा वेळ देणे गरजेचे असते. असेच लग्न झाल्यानंतरही होते. त्यामुळे आधीच पार्टनरविषयी खात्री करून घेणे योग्य ठरते. लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात तुमच्या पार्टनरच्या काही वागणुकींवरून तुम्ही ठरवू शकता की, तुमचे लग्न दीर्घकाळ टिकेल की लवकर संपेल. या लक्षणांवरून कळू शकते तुमच्या नात्याचे आयुष्य छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होणे झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जर तुमच्या सवयी आणि छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या जोडीदाराला खटकत असतील. तर समजून घ्या की, तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खूश नाही. त्याच्या मनात काहीतरी वेगळेच आहे. मात्र तो या छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमच्यावर राग काढत आहे. अशा परिस्थितीतही तुमचे नाते धोक्यात असते.

  Relationship Tips : पार्टनरचा विश्वास जिंकण्यासाठी नक्की विचारा हे प्रश्न; नातं होईल अधिक घट्ट

  भावनांना महत्त्व न देणे जर जोडीदार प्रत्येक गोष्टीत स्वतःला तुमच्यापेक्षा वरचढ मानत असेल आणि तो तुम्हाला दुय्यम वागणूक देत असेल. तर समजून घ्या की तुमच्या जोडीदाराच्या मनात काहीतरी सुरु आहे. लग्नामध्ये दोन लोकांना अनेक गोष्टींमध्ये एकमेकांशी जुळवून घ्यावं लागतं, एकमेकांच्या भावना जपाव्या लागतात. जर तुमच्या नात्यात हे घडत नसेल तर तुमचे नाते धोक्यात आहे. लग्नानंतरही एकटेपणा जाणवतो लग्न करूनही जर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल. तर ती चिंतेची बाब आहे. जर तुमचा जोडीदार दिवसभर तुम्ही काय करत आहात याची पर्वा करत नसेल आणि तो त्याच्या आयुष्यात एकटाच व्यस्त राहत असेल. तर यामुळे तुमच्यातील ओढ आणि प्रेम कमी होते. Happy Hormones : तिची एक झलक दिसली तरी मन उडू उडू का होतं? तुम्हालाही माहिती नसेल हे कारण जोडीदाराच्या वागण्याकडे लक्ष द्या जर तुमचा जोडीदार घटस्फोट घेण्याचा विचार करत असेल किंवा घटस्फोट घेणं योग्य आहे की नाही आणि त्यानंतर आयुष्यात काय बदल घडतात याचा विचार करत असेल. तर तुमचा जोडीदार घटस्फोट घेण्याचा विचार का करतोय, यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहून त्याच्याशी बोलले पाहिजे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Relationship, Relationship tips

  पुढील बातम्या