मुंबई, 05 ऑक्टोबर : आयुष्यात पुढच्या क्षणी काय होईल हे कोणालाही माहीत नसतं. आज आपल्यासोबत जे आहे ते उद्या असेल की नाही याची शाश्वती नाही. पण लग्न हे असं नातं आहे, ज्यात एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवल्यानंतरच पुढं ते वृद्धींगत (Relationship Advice) होत जातं. बऱ्याच लोकांना असे वाटते की, आपल्या जोडीदारापासून आपल्या मागील आयुष्याबद्दल काहीही लपवू नये. तर काही लोकांना असे वाटते की, परस्पर समंजसपणा आणि सौहार्द वाढवण्यासाठी सर्व जोडप्यांनी एकमेकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. परंतु, आपल्या आयुष्यात भूतकाळाच्या अशा काही घटना असतात, ज्या तुम्ही तुमच्या जीवन साथीदारासमोर उघड करणं हे तुमच्या वर्तमान काळासाठी जोखमीचं ठरू शकतं.
प्रत्येकाचे याबद्दल स्वतःचे मत आहे, परंतु बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या भूतकाळाबद्दल काहीतरी सांगून आताचा आनंद पणाला लावला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे नातेसंबंध (Relationship) तुटण्याच्या मार्गावर देखील पोहोचू शकतो. तुमच्या जीवनातील अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या जोडीदारासोबत शेअर केल्याने तुमची अडचण होऊ शकते हे पाहुया
तुमच्या पूर्वीच्या प्रेमसंबधांविषयी
जर तुमच्या जोडीदाराला तुमच्या मागील आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असेल. तुमच्या अगोदरच्या मैत्रिणींविषयी जाणून घ्यायची इच्छा असेल तर तिला किंवा त्याला त्यावर चर्चा न करण्याविषयी अतिशय शांतपणे सांगा. कारण, तुझ्या शिवाय आता मला दुसऱ्या कोणाचा विचारही करण्याची गरज वाटत नाही आणि आपल्याला पूर्वीच्या कोणत्याही गोष्टींमध्ये रस नसल्याचे नम्रपणे सांगा. त्यांना नेहमी असे वाटू द्या की त्यांच्यापेक्षा तुमच्यासाठी कोणीही दुसरे नाही आणि तुम्ही त्याच्या किंवा तिच्यासोबत खूप आनंदी आहात.
हे वाचा - Part Time Jobs: अवघ्या काही तासांचं काम आणि मिळतील भरघोस पैसे; ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स करून बघाच
पूर्वीच्या ती किंवा त्याच्याविषयी सांगितले असेल तर
जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या भूतकाळाबद्दल सांगितले असेल आणि तुम्ही तो किंवा त्याच्या समोर वारंवार त्या व्यक्तीबद्दल बोलत असाल, तर तुमच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतील. भूतकाळ आपण विसरू शकत नसलो तरी, त्यासाठी आपण आपला आजचा दिवस खराब करू नये.
लग्नाचा पश्चाताप होतो असं कधी म्हणू नये
हे वाचा - मंदिर परिसरता मुलाला लघुशंका करू दिली नाही, पोलिसाने पुजाऱ्याला केली मारहाण, बीडमधील घटना
असे होऊ शकते की तुमच्या जोडीदारामध्ये तुमच्या वडिलांप्रमाणे किंवा आईसारखे गुण नसतील. परंतु, त्यावरून तुम्ही तुमच्या जोडीदाराला वारंवार टोचून बोलणे योग्य नाही, प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो त्यानुसार सर्व गोष्टी सारख्याच असतील, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या पत्नीचे किंवा पतीच्या काही तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टींची चर्चा घरातील इतर व्यक्तींशी चर्चा करता तेव्हा तुमच्या नात्यात दुरावा येऊ लागतो. चांगल्या नात्यासाठी आपण आपल्या जोडीदाराचे गुण-दोष स्वीकारायला हवेत.
( सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Relationship, Relationship tips