मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मुलांच्या या सवयींमुळे गर्लफ्रेंड होतात नाराज, नातं टिकवण्यासाठी काही सवयी बदलायला हव्या

मुलांच्या या सवयींमुळे गर्लफ्रेंड होतात नाराज, नातं टिकवण्यासाठी काही सवयी बदलायला हव्या

विश्वास ही नात्याची पहिली पायरी असते असं म्हणतात. मुलींना विश्वासू जोडीदारच आवडतो. मात्र, मुलं एका नात्यात असतानाही दुसऱ्या मुलींसोबत फ्लर्ट करतात. मुलींना हे अजिबात आवडत नाही.

विश्वास ही नात्याची पहिली पायरी असते असं म्हणतात. मुलींना विश्वासू जोडीदारच आवडतो. मात्र, मुलं एका नात्यात असतानाही दुसऱ्या मुलींसोबत फ्लर्ट करतात. मुलींना हे अजिबात आवडत नाही.

विश्वास ही नात्याची पहिली पायरी असते असं म्हणतात. मुलींना विश्वासू जोडीदारच आवडतो. मात्र, मुलं एका नात्यात असतानाही दुसऱ्या मुलींसोबत फ्लर्ट करतात. मुलींना हे अजिबात आवडत नाही.

    मुंबई, 14 ऑगस्ट : प्रेमात पडलेल्यांना छोट्या छोट्या गोष्टीही खूप महत्त्वाच्या वाटत असतात. एकमेकांच्या बारीकसारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. कधी कधी त्यावरून वादाचे प्रसंगही ओढवतात. विशेषतः मुलींच्या मुलांकडून भरपूर अपेक्षा असतात. मुलांच्या काही सवयींमुळे (Habits Of Boys Which Will Break Relationships) नातं तुटण्याचे प्रसंगही घडतात. प्रेमात पडलेल्या तरुणांनी त्यांच्या सवयी व वागणुकीत काही बदल केले पाहिजेत, त्यामुळे नातं तुटणार नाही. प्रेमात पडलेल्या तरुणींना मुलांकडून काय अपेक्षा असतात, हे मुलांनी समजून घेतलं पाहिजे. 'एमपी ब्रेकिंग न्यूज'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. मुली सहसा शालीन व आदर देणाऱ्या असतात. प्रेमात पडलेले तरुण जोडीदारावर प्रेम करतात; मात्र त्याचा आदर (Respect) करत नाहीत. असा जोडीदार मुलींना आवडत नाही. मुलांना नेहमी असं वाटतं की मुलींनी आपल्याप्रमाणे वागावं; पण मुलींना ते आवडत नाही. विश्वास ही नात्याची पहिली पायरी असते असं म्हणतात. मुलींना विश्वासू जोडीदारच आवडतो; मात्र मुलं एका नात्यात असतानाही दुसऱ्या मुलींसोबत फ्लर्ट करतात. मुलींना हे अजिबात आवडत नाही. अनेक मुलांना स्वतःच्या इच्छा-आकांक्षा महत्त्वाच्या वाटतात; मात्र मुलींच्या इच्छेशी त्यांचा काहीही संबंध नसतो. अशी मुलं मुलींना आवडत नाहीत. जोडीदारावर अधिकार गाजवला म्हणजे मुलांचा पुरुषी अहंकार सुखावतो. अशा प्रकारे स्त्रियांना आपल्या हातातली बाहुली समजणारे, त्यांच्यावर अधिकार गाजवणारे पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत. Relationship Tips : तुमचं लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही? असं तपासा तुमच्या नात्याचं आयुष्य स्वच्छता (Cleanliness) हा बहुतांश स्त्रियांच्या आवडीचा गुण असतो. स्वच्छ, नीटनेटकेपणा स्त्रियांना आवडतो; मात्र अनेक पुरुषांच्या अंगी त्याचा अभाव असतो. हा स्वभाव अनेकदा भांडणाचं कारण ठरतो. काही जण अचानक गायब होतात. जोडीदाराला सांगून, कल्पना देऊन एखाद्या कामासाठी जाणं वेगळं आणि अशा प्रकारे न सांगता गायब होणं वेगळं. अशा स्वभावाच्या व्यक्तीसोबत राहणं स्त्रियांना रुचत नाही. संशयाचं बीज अशाच गोष्टीतून पेरलं जातं. त्यामुळे ही सवय सोडून द्यायला हवी. जोडीदारानं विचारल्यावर कायम वेळ नसल्याची कारणं देणारे जोडीदार अकारण वाद ओढवून घेतात. आपल्या जोडीदारासाठी वेळ नसणं (Give Time To Each Other) ही गोष्ट कोणत्याच मुलीला पसंत पडणार नाही. इतर सगळ्या गोष्टी वेळेत होतात, मग याचसाठी वेळ नसेल, तर नातं टिकवणं अवघड होऊ शकतं. पुरुषांचं दुर्लक्ष करणं स्त्रियांना अजिबात आवडत नाही. फोन न उचलणं, मेसेजला उत्तर न देणं असं अनेक पुरुष करतात. तसं केल्यानं एकमेकांच्या मनात एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाबद्दल शंका उपस्थित होते. व्यग्रतेतूनही काही सेकंद मेसेज करण्यासाठी काढता येतातच. स्त्रियांना वेळ हवा असतो. पुरुषांच्या अशा वागण्यानं स्त्रिया नाराज होतात.
    First published:

    Tags: Relationship tips

    पुढील बातम्या