Home /News /lifestyle /

नात्यात सतत वाद होतायत? पार्टनरशी बोलाताना 'या' 5 गोष्टींचा उल्लेख टाळाच

नात्यात सतत वाद होतायत? पार्टनरशी बोलाताना 'या' 5 गोष्टींचा उल्लेख टाळाच

पार्टनरशी बोलताना नकळतपणे आपण अशा काही गोष्टी बोलून जातो ज्यामुळे वाद अधिक गंभीर होतात.

    मुंबई, 07 जानेवारी : सध्याच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये रिलेशनशिप हा एक ट्रेंड बनला आहे. प्रेम हे माणसाची आवड आणि गरज दोन्ही झालं आहे. प्रेमाच्या नात्यात आपल्या जोडीदारावर हक्क गाजवणं तसंच पार्टनरसाठी त्याग करणं या गोष्टी ओघानं केल्या जातातच. पण रिलेशनशिपमध्ये एका काळानंतर असंही होतं की, पार्टनरच्या छोट्या छोट्या गोष्टींवरही शंका येते. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रश्नांचा भडिमार सुरू होतो. परिणामी वाद विवाद होतात. नात्यात छोटे-मोठे वाद होणं तर ठीक आहे पण, हेच वाद वाढले की, नातं तुटण्याचीही शक्यता असते. अशा प्रकारच्या वादांमधून गैरसमज होण्याचीही शक्यता जास्त असते. त्यामुळे पार्टनरशी बोलताना नकळतपणे आपण काही अशा गोष्टी बोलून जातो ज्यामुळे वाद अधिक गंभीर होतात. आज आम्ही तुम्हाला याचविषयी काही रिलेशनशिप टिप्स देणार आहोत. जाणून घ्या नात्यामध्ये वाद निर्माण झाल्यास कोणत्या गोष्टी बोलणं टाळावं! -जेव्हा आपसात वाद होतो तेव्हा लगेचच तुमच्या जोडीदाराची माफी मागा. त्यावेळी वादासाठी तुम्ही कारणीभूत नसाल तरीही ‘सॉरी’ म्हणून तो वाद संपवण्याचा प्रयत्न करा. याचं कारण असं की, त्यावेळी माफी मागितल्याने वातावरण शांत होतं. पुढे वादांना गंभीर वळण लागण्याआधी पूर्णविराम मिळतो. ती वेळ शांततेत निघून गेल्यावर काही वेळाने जोडीदाराच्या मूडचा अंदाज घ्या. योग्य वेळी गोष्टींवर चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा. जिम किंवा डाएटशिवाय असं कमी करा वजन! -सर्वसाधारणपणे जेव्हा वाद होतात तेव्हा नैसर्गिकरीत्या समोरच्या व्यक्तीवर आवाज चढवला जातो. परिणामी वाद अधिक चिघळतात. अशा वेळी तुम्ही समजुदारपणा दाखवून शांत राहण्याची भूमिका घेणं सोयीस्कर आहे. नात्यातील दोघांनीही आवाज चढवला तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. उलट गोष्टी बिघडून नातं तुटूही शकतं. -रिलेशनशिपमध्ये कोणतंही कारण वादाला निमित्त ठरू शकतं. पण त्यामध्ये जुन्या गोष्टींचा किंवा प्रसंगांचा नकळतपणे उल्लेख केला जातो. याच गोष्टी नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत असतात. भांडण शांत झाल्यावर तुमच्या पार्टनरला या गोष्टी आठवून वाईट वाटू शकतं. त्यामुळे तुमच्या बोलण्याने जोडीदाराला ठेच पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. त्वचेच्या आजारावर सर्वोत्तम घरगुती उपाय! बहुगुणी कडुनिंबाचे 10 फायदे -प्रत्येकाला त्याची स्पेस महत्त्वाची असते आणि हे समजून घेणं प्रत्येक नात्यासाठी अतिशय गरजेचं असतं. काही झालं तरी प्रत्येक व्यक्तीला त्याचा स्वभिमान हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याला ठेच पोहोचवण्याचा हक्क कोणालाच नसतो. त्यामुळे वाद विवाद झाले तरी समोरच्याचा, त्याच्या मतांचा आदर ठेवणं गरजेचं आहे. त्याला तडा गेल्यास तुमच्या नात्यासाठी हे गंभीर कारण होऊ शकतं. त्यामुळे या गोष्टींची काळजी घेणं आणि त्याप्रमाणे कृती करणे महत्त्वाचं आहे. दुधापेक्षा जास्त बिअर आहे फायद्याची, PETA चा अजब दावा
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Lifestyle, Love relationship

    पुढील बातम्या