मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Couple Therapy : वैवाहिक जीवनात ही 5 चिन्हे दिसली तर समजून घ्या तुम्हाला आहे 'कपल थेरपी'ची गरज

Couple Therapy : वैवाहिक जीवनात ही 5 चिन्हे दिसली तर समजून घ्या तुम्हाला आहे 'कपल थेरपी'ची गरज

कपल थेरपीचे फायदे

कपल थेरपीचे फायदे

जेव्हा जोडप्यामधील वियोग आणि वाद कटुतेचे रूप घेतात, तेव्हा कपल थेरपीची आवश्यकता असू शकते. कपल थेरपी संबंध अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सुधारण्यासाठी कार्य करते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 जानेवारी : कोणतंही नातं खूप नाजूक असतं. त्याला एक छोटासा तडासुद्धा नातं तोडू शकतो. जोडप्यांमध्ये भांडणे, वेळ न देणे किंवा एकमेकांशी बोलणे या गोष्टी सामान्यतः घडत असतात. परंतु जेव्हा पती-पत्नी एकमेकांची काळजी घेणे किंवा संवाद साधणे तेव्हा नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकते. अशी नाती जपण्यासाठी आणि जतन करण्यासाठी अनेकदा 'कपल थेरपी'चा आधार घेतला जातो.

नातं वाचवण्यासाठी कपल थेरपी हा या जोडप्याचा शेवटचा प्रयत्न असू शकतो. जोडप्याने थेरपिस्टकडे येणे हे नातेसंबंधाच्या विम्यासारखे असू शकते, जे जोडप्याला नातेसंबंधाच्या फायद्यांबद्दल सावध करते. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला कपल थेरपीची गरज आहे, हे कसे कळते. काही संकेत सांगतात कि, तुमचं नातं तुटण्याच्या परिस्थिती आहे.

Relationship Tips : पार्टनरला सरप्राईज द्यायचंय? या आहेत नो बजेट परफेक्ट Romantic Idea

नात्यातील स्पार्क हरवतो

होल हार्ट रिलेशनशिप्स डॉट कॉमच्या मते, जेव्हा जोडप्याच्या आयुष्यात काही गोष्टींचे महत्त्व कमी होते. तेव्हा नात्याची चमक हरवते. नात्यात नवीनता येण्यासाठी आणि जीवनात स्पार्क येण्यासाठी एकमेकांना काय आवडते, कशा प्रकारचे आयुष्य जगायला आवडते हे माहित असणे आवश्यक आहे. कपल थेरपी नात्यातील जुनी चमक परत आणण्यास मदत करू शकते.

जुन्या गोष्टींवरून भांडणे

अनेक वेळा जोडपे भांडणासाठी विषय शोधत राहतात. अशा स्थितीत अनेकवेळा ते भांडणात जुन्या आठवणींचा समावेश करतात. जुन्या गोष्टी आठवून त्यांना भांडणासाठी निमित्त सापडते. अशा परिस्थितीत त्यांना कपल थेरपीची आवश्यकता असू शकते, जी जोडप्याला वर्तमानात जगायला शिकवू शकते आणि जुन्या समस्या सोडवण्यास मदत करू शकते.

संवाद थांबणे

जेव्हा जोडप्यांमधील संभाषण थांबते किंवा कठीण होते. तेव्हा समजून घ्या की, कपल थेरपी आवश्यक आहे. थेरपी दरम्यान जोडप्याला सुरक्षित वातावरण दिले जाते. जेणेकरून ते मोकळेपणाने बोलू शकतील. याद्वारे जोडप्यांमधील दुरावा आणि विसंवाद कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

एकत्र वेळ न घालवणे

जीवनशैली आणि व्यस्ततेमुळे अनेक वेळा जोडप्यांना एकत्र वेळ घालवता येत नाही. ज्यामुळे भांडण आणि संघर्ष होऊ शकतो. कपल थेरपीच्या माध्यमातून जोडप्यांना एकमेकांसाठी पूर्ण वेळ दिला जातो. जेणेकरून ते एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतील आणि नाते घट्ट करू शकतील.

जोडीदारासोबत नात्यात अजिबात करू नका या 5 चुका, नंतर येईल पश्चातापाची वेळ

गोष्टी लपवणे

जेव्हा जोडपे एकमेकांपासून काही गोष्टी लपवू लागतात तेव्हा समजून घ्या नात्यात अंतर येत आहे. अशा परिस्थितीत थेरपिस्ट जोडप्यामधील अंतर कमी करण्याचे काम करतात. यासोबतच भांडणाचे कारण असलेल्या गोष्टीही ते सोडवू शकतात. नाती तुटण्यापासून वाचवण्यासाठी कपल थेरपीचा वापर केला जाऊ शकतो. ही थेरपी जोडप्यासाठी नातेसंबंधाचे महत्त्व समजावून सांगते तसेच नातेसंबंध नव्याने कसे सुरू करावे याबद्दल माहिती देते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Relationship tips