नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : कोणतंही नातं (Relationship) नवीन असतं तेव्हा एकमेकांसोबत वेळ घालवायला छान वाटतं आणि वेळ कधी निघून जातो कळतही नाही. नवीन जोडपी एकमेकांशी तासन्तास बोलतात आणि जसजसा वेळ जातो तसतसे त्यांच्यात एकमेकांच्या तक्रारी आणि काही सवयींवरून वाद सुरू होतात. अशा स्थितीत मग सर्व प्रेमाचे रूपांतर भांडणात होऊ लागतं. वास्तविक, नात्यातील या अंतराचे कारण म्हणजे जोडप्यांमधील जीवनातील उत्साहाचा अभाव. होय, याचे कारण कामातील व्यग्रता आणि कंटाळा हे देखील असू शकते. अशा परिस्थितीत चांगला वेळ घालवता येत नसल्यामुळे एकमेकांमध्ये अंतर निर्माण होणं स्वाभाविक आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की, तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये अंतर येत आहे, तर तुम्ही या काही टिप्सचा अवलंब करून तुमच्या नात्यातील उत्साह, गोडवा परत (Relationship Tips ) आणू शकता.
अशा प्रकारे नात्यात उत्साह आणा
1. वेळ देणं आवश्यक
क्वालिटी टाइम घालवण्यासाठी तुम्ही लांब सुट्टीवर जाणं आवश्यक नाही, तुम्ही कुठेतरी लाँग ड्राईव्हवर जाऊन तुमच्या पार्टनरसोबत चांगला वेळ घालवू शकता. जोडीदाराशी योग्य संवाद साधण्याचा प्रयत्न करा. कारण कम्युनिकेशन गॅपमुळे नात्यात गैरसमज वाढतात.
2. प्रशंसा
तुमच्या जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी तुम्ही कोणतेही मोठे नियोजन केलेच पाहिजे असे नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचं थोडं कौतुक करून त्याला आनंदी करू शकता. आपल्या नात्यात आनंद आणि उत्साह आणण्यासाठी कधी-कधी तुमच्या जोडीदाराची चांगली प्रशंसा करा. नातेसंबंधावर त्यांचा प्रभाव खूप सकारात्मक आहे.
हे वाचा - धक्कादायक : 300 फूट खोल दरीत कोसळली बस; 13 जणांचा जागीच मृत्यू
3.एक सरप्राईज गिफ्ट द्या
तुम्ही कधीकधी तुमच्या पार्टनरला सरप्राईज गिफ्ट देऊ शकता. या भेटवस्तू महाग असतीलच असे नाही. पण भेटवस्तू ही नेहमीच जोडीदाराची आवडती असावा हे महत्त्वाचे आहे. सरप्राईज म्हणून, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी सुट्टी किंवा डिनरची योजनाही करू शकता.
4. व्यत्यय टाळा
नात्यात अधिक बंधने घातली तर आपापसात दुरावा वाढू शकतो. अशा परिस्थितीत एकमेकांना थोडी स्पेस द्या आणि प्रत्येक गोष्टीवर आपलं मत व्यक्त करणं टाळा. असं केल्यानं नात्यात आनंद टिकून राहतो.
हे वाचा - चाळीशी उलटूनही सुटेना मुलाची हौस, अपत्यप्राप्तीसाठी सुरूय तिसऱ्या लग्नाची तयारी
5.हसणं आवश्यक
कधीकधी हसणं, विनोद आणि गमती-जमती करणं यामुळे तुमच्या नात्यातील कंटाळा कमी होतो. त्यामुळं नातं मजेशीर होण्यासाठी हसणं आवश्यक आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा हेतू आहे. मात्र, न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Relationship, Relationship tips