Home /News /lifestyle /

सुंदर, सुगरण नव्हे तर अशी बायको हवी मला! पत्नीबाबत बदलल्या तरुणांच्या अपेक्षा

सुंदर, सुगरण नव्हे तर अशी बायको हवी मला! पत्नीबाबत बदलल्या तरुणांच्या अपेक्षा

काळ बदलायला लागला तशा मुलामुलींच्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षाही (Expectation from life partner) बदलायला लागल्या आहेत.

    मुंबई, 30 एप्रिल : पूर्वी वधू परीक्षेत मुलीला हमखास विचारला जाणारा प्रश्न असायचा तो म्हणजे स्वयंपाक येतो का? आता मॉडर्न जमान्यात (Modern Life) बघण्याच्या कार्यक्रमापासून लग्नाच्या (Marriage) पद्धतीमध्येही बदल झालेत. तशाच मुलामुलींच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षाही (Expectations from life partner) बदलल्या आहेत. आता उत्तम स्वयंपाक (Cooking skills) येणं हाच एक गुण मुलांना आवडतो असं नाही. तर सुंदर आणि सुगरण या पलिकडे आता मुलांच्या पत्नीबाबतच्या अपेक्षा आहेत. आकर्षण आणि प्रेम समाजात अशी अनेक जोडपी आहेत ज्यांच्यामध्ये प्रेम नाही. पण ते लग्नाचं नातं निभावत आहेत किंवा कुटुंबासाठी आपलं लग्न टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. University of Iowa मधील संशोधकांच्या स्टडीनुसार आजच्या काळात मुलांना अशी मुलगी हवी आहे जिच्याबद्दल त्यांना आकर्षण आणि प्रेम वाटेल. आत्मनिर्भरता आणि जबाबदारी लग्नानंतर पत्नीची जबाबदारी तिच्या पतीवर असते असा विचार करण्याचा काल आता गेला. आता मुलं दोन्ही बाजूंनी विचार करतात. मुलांना आता स्वावलंबी मुली आवडतात. मुली शिक्षित असाव्यात आणि लग्नानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेण्यातही पुढाकार घ्यावा असं त्यांना वाटतं. मॉडर्न मुलीदेखील मुलांप्रमाणे विचार करत आहेत. लग्नानंतर कुटुंबात त्यांना समान वागणूक मिळावी असंच वाटतं. (संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी वाढवा प्रतिकारशक्ती, असा ठेवा आहार) वाढत्या महागाईच्या काळात आणि बदलत्या लाईफस्टाईलमध्ये एकट्याने घरखर्च चालवणं तितकसं सोप राहिलेलं नाही. त्यामुळे स्वत: कमावणाऱ्या आणि आर्थिक पातळीवर सक्षम असणारी जोडीदार मुलांना हवी आहे. मॅरिड लाईफ, मुलं, हेल्थ आणि इतर गोष्टींचे खर्च याचा विचार करता एकट्याला आजच्या काळात हा खर्च निभावणं शक्य नाही. पालकांची जबाबदारी एकीकडे आर्थिकदृष्ट्या मुलगी स्वावलंबी हवी, असं तर मुलांना वाटतंच. पण त्याबरोबर आपल्या जोडीदाराने आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी, त्यांचा आदर करावा असंही त्यांना वाटतं. आजच्या मॉडर्न काळात इमोशनपेक्षा प्रॅक्टिकलीच सगळेजण विचार करतात. तिथंच पालकांच्या बाबतीत मुलं आजही जबाबदारीचा विचार करतात. मुलांना वाटतं की, त्यांच्या पत्नीने आपल्या आईवडिलांप्रमाणेच सासू-सासऱ्यांची जबाबदारी घ्यावी. (Gold Price Today: स्वस्त झालं सोनं, 'Record High' वरून 10000 रुपयांची घसरण) एका रिसर्चनुसार आता स्वयंपाक कलेला दुय्यम स्थान मिळालं आहे, तर कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक जबाबदारी, आत्मनिर्भरता आणि प्रॅक्टीकल विचारांना जास्त महत्त्व दिलं जात आहे. आजचं धावपळीचं आयुष्य, वर्किंग स्ट्रेस यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पार्टनर प्रॅक्टीकल असेल तरच हेल्दी रिलेशन बनेल असा विचार मुलं करतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Couple, Lifestyle, Marriage, Relationship, Relationship tips

    पुढील बातम्या