मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Relationship Funda : नवरा नीट बोलत नाही, वागत नाही; त्याचं Office Affair तर नाही ना?

Relationship Funda : नवरा नीट बोलत नाही, वागत नाही; त्याचं Office Affair तर नाही ना?

त्याला काय झालं आहे कुणास ठाऊक. गेल्या काही दिवसांपासून तो खूप बदललेला वाटतो आहे, माझ्याशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी आहे का? असं तुम्हालाही तुमच्या नवऱ्याबाबत वाटतं का?

त्याला काय झालं आहे कुणास ठाऊक. गेल्या काही दिवसांपासून तो खूप बदललेला वाटतो आहे, माझ्याशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी आहे का? असं तुम्हालाही तुमच्या नवऱ्याबाबत वाटतं का?

त्याला काय झालं आहे कुणास ठाऊक. गेल्या काही दिवसांपासून तो खूप बदललेला वाटतो आहे, माझ्याशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरी कुणी आहे का? असं तुम्हालाही तुमच्या नवऱ्याबाबत वाटतं का?

सतीश माझा नवरा... आधी ऑफिसला जायला खूप कंटाळा करायचा. कामाचा म्हणून नाही पण मला सोडून जावं लागतं म्हणून. माझ्याशिवाय तो राहायचाच नाही. ऑफिसला गेला तरी त्याचे दिवसातून किती तरी फोन असायचे. ऑफिस सुटताच सर्वात आधी फोन करायचा आणि मी घरी येतो आहे हे सांगायचा. लहान मुलांची शाळा सुटल्यावर त्यांना कसा आनंद होतो अगदी तसाच आनंद त्याला ऑफिसची शिफ्ट संपल्यावर घरी येताना व्हायचा. जेव्हा तो घरी यायचा आणि मी दरवाजा उघडायचे तेव्हा नेहमी त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर स्मितहास्य असयाचं. मला पाहून तो खूप प्रफुल्लित व्हायचा. घरात येतात बॅग ठेवायच्या आधीच मला मिठी मारायचा. मी तुला दिवसभर खूप मिस केलं, हे त्याचं ठरलेलं वाक्य असायचं. कधीतरी गिफ्ट, सरप्राईझ, ऑफिसला दांडी मारणं आणि माझ्यासोबत वेळ घालवणं, कधीतरी ऑफिसमधून लवकर घरी येणं आणि एखादी फिल्म पाहायला जाणं किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाणं. किती प्रेम त्याचं माझ्यावर. इतका प्रेम करणारा नवरा मला मिळाला म्हणून मी भारावून जायचे.

पण आता... आता त्याला काय झालं आहे कुणास ठाऊक. गेल्या काही दिवसांपासून तो खूप बदललेला वाटतो आहे. सकाळी मी उठायच्या आधीच तो उठतो. आपली तयारी करतो आणि डबा न घेताच निघून जातो. विचारलं तर सांगतो काम आहे खूप ऑफिसमध्ये लवकर जायचं आहे, ऑफिसच्या कँटिनमध्ये काहीतरी खाईन. जो सतीश मला ऑफिसमध्ये असतानाही माझ्याशी फोनवर किती तरी वेळ बोलायचा त्याला तो आता साधा मी फोन केला तरी उचलायला वेळ नाही. किंबहुना बिझी म्हणून तो फोन कट करण्याचीही तसदी घेत नाही. मेसेजला रिप्लाय देत नाही, जसं की फोन त्याच्याजवळ नाहीच किंवा त्यानं तो सायलेंट मोडवर टाकला आहे.

रात्री घरीदेखील उशिरा येतो. मला जेवून घे मी बाहेरून काहीतरी खाऊन येईन म्हणून सांगतो. तेदेखील मी फोन केल्यावर स्वत: फोन करून नाही. दरवाजा उघडल्यावर सर्वात आधी मला मिठी मारणारा सतीश आता दरवाजात माझ्या तोंडाकडेही न पाहता घाई असावी असा घरात घुसतो. मला त्याच्याशी खूप काही बोलायचं असतं. पण तो फ्रेश होतो आणि सरळ झोपूनच जातो. एकाच बेडवर असूनही आम्ही एकत्र नसतो.

हे वाचा - Relationship Funda : बॉयफ्रेंडला माझ्याकडून 'ते' हवंय! रिलेशनशिपमध्ये Sex

त्याच्या आयुष्यात फक्त काम काम आणि काम. आता अगदी रविवारचीही तो सुट्टी घेत नाही. रविवारचं कसलं काम असतं त्याचं? हा माझा सतीश नाही, हा खूप बदलला आहे. तो असं का करतो? माझ्याशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरी कुणीतरी नाही ना. हो! गेल्या वेळी कधी नाही तो त्यानं माझा फोन उचलला होता. पण सर बिझी आहेत असं पलीकडून एका मुलीचा आवाज आला. तिला मी पुढे काही विचारणार तोच तिनं फोन कटही केला होता. ती मुलगी कोण होती? सतीशचा फोन तिनं का उचलला होता? त्या मुलीसोबत सतीश ऑफिसमध्येच होता का? की बाहेर कुठे? तो माझ्याशी बोलतही नाही, कसं विचारू त्याला तो असं का करतो आहे? त्याचं ऑफिसमध्ये कुणासोबत अफेअर आहे का?

सुजातानं नवऱ्याचं बदललेलं हे रूप पाहिलं, आपल्याकडे त्याचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहिलं आणि आता तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. सुजाता एकटी नाही, अशीच अवस्था तुमची आणि कित्येक जणींची असते.

हे वाचा - ती सध्या 'कुणाशी' बोलते; बायको सतत फोनवर असल्यानं तुमच्या मनातही असा संशय?

याबाबत न्यूज 18 लोकमतशी बोलताना समुपदेशक संहिता सावंत म्हणाल्या, "पती-पत्नी नात्यात गोष्टी आपोआप न सांगता कळायला पाहिजेत असं नसतं. एकमेकांचा स्वभाव, सवयींबद्दल चर्चा, एकमेकांचा जगण्याबद्दलचा दृष्टीकोन काय आहे? जोडीदारामध्ये काय बदल अपेक्षित आहेत? एकमेकांच्या आनंदाची परिभाषा काय आहे? एकमेकांचे विचार समजून घेणं, त्याबाबतीत सुसंवाद साधणं गरजेचं आहे. समजून सांगणं आणि समजून घेणं ही प्रक्रिया जाणीवपूर्वक व्हायला हवी. सुसंवाद साधल्यानंतरदेखील काही अडचणी येत असतील तर समुपदेशकाचा सल्ला घेऊ शकता"

First published:

Tags: Relationship, Relationship tips, Wife and husband