Home /News /lifestyle /

तुमचा क्रश तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर फॉलो करतोय का? 'या' पद्धतीने घ्या जाणून

तुमचा क्रश तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर फॉलो करतोय का? 'या' पद्धतीने घ्या जाणून

तुम्हाला कोणी पसंत करत असेल, पण त्याची सांगण्याची हिंमत होत नसेल तर Whatsapp च्या मदतीने तुम्ही ही गोष्ट ओळखू शकता. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणते संकेत आहेत जे सांगतील की तुमचा क्रश तुम्हाला Whatsapp च्या माध्यमातून फॉलो करत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 मार्च : प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी क्रशची एन्ट्री होतेच. अशावेळी आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच्या मनातल्या भावना माहिती झाल्या तर किती भारी ना? तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीची तुमच्यावर नजर असते का, तुमच्या लहान-लहान, अगदी बारीकसारीक गोष्टी ते नोटीस करतात का, हे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. आज आम्ही अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यावरून तुमच्या क्रशचं तुमच्यावर लक्ष असतं का, हे तुम्हाला कळेल. तुम्ही क्रश (Crush) हा शब्द कोणाकडून तरी ऐकला असेल. या शब्दाचा हल्ली सर्रास वापर केला जातो. क्रश म्हणजे आपल्याला आवडणारी एखादी व्यक्ती. थोडक्यात जी व्यक्ती आपल्याला आवडते तिच्यासाठी हा शब्द वापरला जातो. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीने आपल्यावरही प्रेम करावं, असं आपल्याला वाटतं; पण अनेक जण क्रशला आपल्या मनातल्या भावना सांगत नाहीत. कारण, असं केल्याने तो/ती आपल्याला नाकारेल किंवा आहे ती मैत्रीही तुटून जाईल, अशी भीती त्यांना असते. पण, आता चिंता सोडा. सध्याच्या अधुनिक युगात प्रत्येक जण सोशल मीडियाचा (social media) वापर करतो. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुमच्या क्रशची तुमच्या नजर असते का, हे सहजगत्या माहिती करून घेऊ शकता. तुमचा क्रश तुम्हाला नोटीस करतो का हे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरच्या आपल्या डीपीवरून माहिती करू शकता. तुम्ही प्रोफाइल फोटो बदलल्यानंतर तुमच्या क्रशचा मॅसेज येत असेल तर समजून घ्या ते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपवरचे अपडेट चेक करत असतात. समोरच्या व्यक्तीचं तुमच्या प्रत्येक कामावर लक्ष असतं. बापरे! 'या तरुणीच्या सुंदर ओठांमुळे देश धोक्यात', PHOTO पाहताच लोक दहशतीत जर तुमचा क्रश केलेला मेसेज डिलीट करत असेल आणि असं वारंवार घडत असेल तर कदाचित समोरच्या व्यक्तीचं तुमच्यावर क्रश असू शकतं. ती व्यक्ती तुम्हाला त्यांच्या मनातल्या भावना सांगण्याच्या प्रयत्नात आहे; पण सांगू शकत नाही, हे समजून घ्या. याबद्दल त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. याशिवाय, एखादी व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून कट करत असेल, तर असं एक-दोनदा होणं ठीक आहे; पण तसंच पुन्हा-पुन्हा होत असेल तर समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडत असू शकता. त्यांना तुमच्याशी बोलण्याची इच्छा असेल; पण हिंमत होत नसल्याने ते फोन कट करत असू शकतात. सर्वांत मोठा संकेत म्हणजे, तुम्ही त्यांना पाठवलेला मेसेज लगेच ब्लू टिक होत असेल आणि त्यावर ताबडतोब रिप्लाय येत असेल तर समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही महत्त्वाचे आहात, हे समजून घ्या. कदाचित तुम्ही त्यांचे क्रश असू शकता. या पद्धतीचा वापर करून तुम्ही तुमच्या क्रशच्या अंत:करणात हलकेच डोकावू शकता.
    First published:

    Tags: Relationship, Relationship tips

    पुढील बातम्या