Relationship Funda : पहिल्यांदाच डेटवर जातेय; पण तो माझ्या अगदी क्लोज आला तर...

Relationship Funda : पहिल्यांदाच डेटवर जातेय; पण तो माझ्या अगदी क्लोज आला तर...

त्यानं माझा हात हातात घेतला. त्याचा हा मला झालेला पहिला स्पर्श. अंग अंग रोमांचित झालं, पण हृदयाची धडधडही वाढली.

  • Share this:

"आज मी खूप आनंदात आहे. फायनली उद्या आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेटणार आहोत. त्याला मी आणि तो मला... फेसबुकवर तर तो खूपच हँडसम दिसतो. प्रत्यक्षातही तसाच असेल का? फेसबुक मेसेजवर खूप छान बोलतो, माझ्यासमोरदेखील तसंच बोलेल का? तो मला काय काय विचारेल? मी त्याला काय विचारू, त्याच्याशी कसं बोलू?"  स्मिताच्या मनात रात्रभर असेच विचार घोळत होते. संपूर्ण रात्र ती झोपली नाही. कधी एकदा सकाळ होते आणि ती आपला ऑनलाइन बॉयफ्रेंड प्रतीकला भेटते, असंच तिला झालं होतं.

कधीही लवकर न उठणारी स्मिता त्यादिवशी मात्र बरोबर सकाळी सातच्या ठोक्याला उठली. तसं ती आणि प्रतीक दुपारीच भेटणार होते. पण त्याला भेटण्याचा उत्साह तिला इतका होता की ती सकाळीच उठून बसली आणि तयारी सुरू केली. सर्वात आधी तिनं आपलं कपाट उघडलं, "अरे यार कोणता ड्रेस घालू. कन्फ्युझ आहे मी आता. मी सुंदर दिसायला हवे ना... प्रतीकला आवडायलाही हवे. अरे हो, प्रतीक मला एकदा म्हणाला होता की त्याला मला वेस्टर्न आऊटफिटमध्ये पाहायला आवडेल. मग त्याच्यासाठी मी एखादा छानसा वनपिसच घालून जाते"

स्मिता छान तयार झाली. प्रतीकचाही फोन आला की तो निघाला. स्मिताही घरातून निघाली. पण आता मात्र तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. फक्त ऑनलाइन ओळख आणि त्यानंतर प्रेम जमल्यानंतर ती पहिल्यांदाच प्रतीकला भेटणार होती. ती ठरलेल्या रेस्टॉरंटजवळ पोहोचली. प्रतीकला फोन केला. प्रतीक आधीच पोहोचला होता. ती रेस्टॉरंटच्या आत गेली.

हे वाचा - Relationship Funda : कॉलेज टिचरवर तुम्ही फिदा आहात; पण तिचा सिग्नल ओळखलात का?

"रेस्टॉरंटमध्ये एका कोपऱ्यातल्या टेबलवर प्रतीक बसला होता. मला त्यानं दुरूनच ओळखलं मला पाहताच क्षणी तो तिथं उभा राहिला. मी त्याच्या जवळ गेले. तो एकटक माझ्याकडेच पाहत होता. अगदी माझ्या केसापासून पायापर्यंत त्याच्या नजरा फिरत होत्या. मला थोडं ऑड वाटलं पण राग नाही आला. शेवटी आमची पहिली डेट असली म्हणून काय झालं, तसं आम्ही ऑनलाइन तर एकमेकांना चांगलंच ओळखथो आणि तो माझा बॉयफ्रेंड होता कोणता दुसरा अनोळखी मुलगा नाही. पण हो तो प्रत्यक्षातही तसाच दिसत होता जसा फेसबुकवरील फोटोंमध्ये. अगदी माझ्या मनातला प्रिन्स"

"प्रतीक स्तब्ध उभा होता. त्यानंतर हळूच त्यानं माझा हात हातात घेतला. त्याचा हा मला झालेला पहिला स्पर्श. अंग अंग रोमांचित झालं, पण हृदयाची धडधडही वाढली. हात हातात घेऊन त्यानं मला खुर्चीवर बसवलं आणि मग तो समोरच्या खुर्चीवर बसला. माझे हात मी टेबलवर ठेवले होते. आधी दोघंही गप्पच होतो, ऑनलाइन किती तरी वेळ एकमेकांशी गप्पा मारणारे आम्ही. भेटल्यानंतर मात्र काय बोलावं तेच सुचत नव्हतं. पहिली दहा मिनिटं तरी अशीच गेली. मग अचानक प्रतीकनं माझ्या हातावर आपले हात ठेवले, माझे दोन्ही हात हातात धरून तो मला I LOVE YOU म्हणाला. तसं मेसेजवर दररोज बोलायचं, पण असं समोर पहिल्यांदाच बोलला होता. त्यानं माझ्यासाठी गिफ्टही आणलं होतं"

"तसं एकमेकांना पहिल्यांदा भेटून आमचं पोट भरलं होतं. त्यामुळे आम्ही फार काही खाल्लं नाही आणि तिथून निघालो कारण आम्हाला बीचवरही जायचं होतं. तिथून निघताना प्रतीकनं माझ्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि बीचवर तर त्याने माझ्या कंबरेतच घात घातला. पण मी त्याला दूर करू शकले नाही. त्याचा स्पर्श मला हवाहवासा वाटत होता. पण पहिल्याच भेटीत तो इतका क्लोज झाला याची भीतीही मनात होती"

हे वाचा - Relationship Funda : बॉयफ्रेंडला माझ्याकडून 'ते' हवंय! रिलेशनशिपमध्ये Sex

Redwomb या वेबसाईटवरील columnist  रजनी यांनी सांगितलं, "सध्या पुरुष आणि महिला एकमेकांना सोशल मीडिया आणि डेटिंग अॅपच्या माध्यमातून तर भेटतात, मात्र त्यांना डेटिंगबाबत पुरेशी माहिती नसते. बहुतेक डेट फेल होण्याचं प्रमुख कारण म्हणजे उतावळेपणा. यामुळे महिला आणि पुरुष दोघांच्या उत्साहावर पाणी फेरतं. डेटिंगचा पहिला नियम म्हणजे कूल राहा. उतावळेपणा नाही तर रसिकता दाखवा. पुढच्या टप्प्यावर जाण्याआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या"

"कोणत्याही नात्यात पहिल्याच भेटीत किंवा अगदी लगेच पहिल्यांदाच सेक्स करणं योग्य नाही, तर जेव्हा दोघांनाही सेक्सबाबत पुरेशी माहिती असते आणि ते तयार असतात तेव्हाच पहिल्यांदा सेक्स करावं. तुम्ही सेक्ससाठी तयार आहात की नाही हे जाणून घ्यायचं असेल, तर स्वत:ला काही प्रश्न विचारा. तुम्हाला सेक्स, गर्भनिरोधक (contraception), सुरक्षित आणि निरोगी सेक्सची पद्धत (safe and hygienic sexual practices) याबाबत किती माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्सबाबत नकारात्मक आणि गंभीर अशा प्रतिक्रिया हाताळण्यासाठी तुम्ही तयार आहात का? पहिल्यांदाच केलेलं सेक्स तणावपूर्ण किंवा जबरदस्ती केलेलं नसावं, तर अविस्मरणीय आणि मजेशीर असायला हवं", असं Redwomb वरील Sexual wellness columnist पूजा प्रियंवदा यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: November 30, 2020, 9:01 PM IST

ताज्या बातम्या