पार्टनरसोबत रोज भांडा, कधीच तुटणार नाही तुमचं नातं
पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पण म्हणून तो नसावाच असंही काही नाही. पैशांशिवाय प्रेमाला किंमत राहत नाही.

नात्यात प्रेम आणि भांडण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही गोष्टी एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. जोडप्यांमध्ये भांडणं होणं फार सामान्य गोष्ट आहे.

नात्यात जेव्हा भांडण होतं तेव्हा प्रेमाची खरी किंमत कळते. आयुष्यातील या गोड- कटू आठवणीच प्रेम ताजतवानं ठेवायला मदत करतात. आज आम्ही तुम्हाला पार्टनरसोबत भांडणाचे फायदे सांगणार आहोत...

नात्यात भांडण होणं सर्वसामान्य गोष्ट आहे. पण, एक वेळ अशीही येते की लोकांना पार्टनरसोबत राहूनही एकटेपणासारखं वाटतं. या मुद्यावरून तुम्ही हक्काने आपल्या पार्टनरशी भांडू शकता.

अनेकदा असं होतं की घरची सर्व जबाबदारी बायको सांभाळेल अशी अपेक्षा असते. जर तुम्ही ऑफिसमधून निघाल्यावर थकून घरी आला असाल तर तुम्ही पार्टनरकडून किचनमध्ये मदत मागू शकता.

अनेकदा नोकरी करणाऱ्या मुलींना सासरी राहायला आवडत असं नाही. त्यांना वेगळं राहायचं असतं. अशावेळी लग्नाच्याआधीच तुम्ही पार्टनरकडे ही गोष्ट स्पष्ट करू शकता.

पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पण म्हणून तो नसावाच असंही काही नाही. पैशांशिवाय प्रेमाला किंमत राहत नाही. पैशांवरुन लग्नानंतर भांडण नको यासाठी त्यासंदर्भात आधीच सविस्तर बोला.
First Published: Jul 28, 2019 07:23 PM IST