Home /News /lifestyle /

Relationship Funda : होणाऱ्या नवऱ्याला फक्त ऑनलाइनच भेटलेय आणि आता लग्न करायचंय, काय करू?

Relationship Funda : होणाऱ्या नवऱ्याला फक्त ऑनलाइनच भेटलेय आणि आता लग्न करायचंय, काय करू?

लग्न (marriage) ठरल्यानंतर Coronavirus मुळे प्रवासावर निर्बंध आले आणि फक्त फोनवर बोलणं, मेसेजमार्फत संवाद आणि व्हिडीओ कॉलवरून भेटणं झालं. अशी परिस्थिती तुमचीही असेल तर अशावेळी काय कराल याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

    मुंबई : निशा कित्येक महिन्यांपासून आपल्या जोडीदाराच्या शोधात होती. आपले आई-वडील आपल्यासाठी उत्तम स्थळ शोधतील असा विश्वास निशाला होता. त्यामुळे प्रेमाच्या भानगडीत ती कधी पडलीच नाही. अरेंज मॅरेज (Arranged Marriage) करायचं असं तिनं ठरवलं होतं. पण कोरोनाची महासाथ (corona pandemic)  आली आणि तिच्यासाठी स्थळ पाहणं थांबलं. आता ही महासाथ काही लवकर जाणार नाही हे माहिती झालं आणि मग निशासाठी कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) व्हर्चुअली स्थळ पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. अखेर निशाला तिचा जोडीदार सापडला. दोघांनीही एकमेकांना पसंत केलं. पण तरी निशाच्या मनात एक खंत ती म्हणजे ज्या मुलासोबत तिचं लग्न होणार आहे, त्याला लग्नाआधी तिला प्रत्यक्ष भेटता आलं नाही. निशा मुंबईत राहणारी आणि होणारा नवरा प्रितेश पुण्याचा... दोघंही एकमेकांना भेटले पण व्हर्च्युअली. कोरोना महासाथ आणि लॉकडाऊनमुळे त्यांना प्रत्यक्ष काही भेटता आलं नाही. फोनवर बोलणं, मेसेज करणं, व्हिडीओ कॉलमधून एकमेकांसमोर राहून संवाद साधणं इतकीच काय ती त्यांची भेट आणि आता दोघंही एकमेकांना प्रत्यक्ष भेटणार ते थेट लग्नामध्ये.जसजशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसतशी निशाच्या मनात धाकधूक होऊ लागली. साहजिक फोनवर किती बोलणं झालं तरी प्रत्यक्ष न भेटता एका अनोळखी माणसासोबत लग्न करणं म्हणजे मनात थोडी भीती असतेच. आपल्या आई-वडिलांचं घर सोडून एका नव्या घरात जाणं म्हणजे तसंही प्रत्येक मुलीसाठी एक आव्हानच असतं. त्यात जर ज्या माणसासोबत आपल्याला आयुष्य घालवायचं आहे, त्याला एकतर कमी वेळ भेटलो किंवा भेट झालीच नाही अशा परिस्थितीत तर ही भीती अधिकच वाढते. हे वाचा - इथं कराल हनीमून तर होईल घटस्फोट; चुकूनही निवडू नका असे Honeymoon destination निशाच्या मनातही अशाच भीतीनं काहूर माजवलं. सध्या कोरोना काळात अशी परिस्थिती फक्त निशाचीच नाही तर लग्न ठरलेल्या अनेक तरुणींची आहे. अशी भीती वाटली तर काय करावं? त्यावर कशी मात करावी? हे त्यांना समजत नाही आहे. तुम्हीदेखील अशाच परिस्थितीला सामोरं जात आहात का? न्यूज 18 लोकमतशी बोलताना मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक संहिता सावंत म्हणाल्या, "कोरोना काळात भेटणं कमी होणं किंवा फक्त व्हिडीओ कॉलवरून संवाद साधणं यामुळे भविष्याबाबत एक भीती मनात निर्माण होणं साहजिक आहे. अशी भीती तुम्हालाही वाटत असेल तर जितका काही संवाद तुमच्या दोघांमध्ये होत असेल त्यातील सकारात्मक गोष्टींची एक यादी तयार करा. वर्तमान काळात ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत, ते क्षण अनुभवा, त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घ्या" हे वाचा - चुकीच्या इंजेक्शनमुळे जन्माला आली मुलगी; दाम्पत्याला मिळाले तब्बल 74 कोटी रुपये "भीतीचं प्रमाण इतकं जास्त असेल की ज्याचा दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असेल तर अशा वेळी समुपदेशकांचा सल्ला घ्या. विवाहपूर्व समुपदेशन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं", असा सल्ला डॉ. सावंत यांनी दिला आहे.

    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Marriage, Relationship, Relationship tips, Wedding couple

    पुढील बातम्या