Home /News /lifestyle /

तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरणं धोकादायक; होऊ शकतात ‘हे’ आजार

तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरणं धोकादायक; होऊ शकतात ‘हे’ आजार

स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम करणे (Reheating Cooking Oil) आणि त्यात अन्न शिजवणे हे प्रत्येक घरात सामान्य आहे. जर आपण बाजारात मिळणार्‍या पदार्थांबद्दल बोललो तर तुम्ही हे अनेकदा पाहिले असेल की ते तेल इतके गरम करतात की तेल काळे होते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 मे : स्वयंपाकघर तेलाशिवाय (Cooking Oil) अधुरं आहे. किचनमध्ये तयार होणाऱ्या बहुतांश पदार्थांसाठी तेल लागतं. तेलाशिवाय बनणारे पदार्थ फार कमी असतात. आता उन्हाळ्यात तर पापड, बटाट्याचे चिप्स आणि अजून बरेच तळणीचे पदार्थ बनवून ठेवले जातात. हे पदार्थ नंतर वर्षभर तळून खाल्ले जातात. आपण पदार्थ तळताना तेल वापरतो. तळून झालं की उरलेलं तेल काढून ठेवतो, नंतर पुन्हा तेच तेल स्वयंपाकासाठी वापरतो किंवा पदार्थ तळण्यासाठी वापरतो. परंतु, तेल वारंवार वापरणं आपल्या शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल (Recooking Oil) पुन्हा वापरू नये. वारंवार वापरलेल्या तेलाचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात, हे जाणून घेऊ या. या संदर्भातली माहिती देणारं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. तेल पुन्हा गरम करणं योग्य आहे का? काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की पुन्हा गरम केलेल्या तेलात शिजवलेलं अन्न खाल्ल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात. पहिल्यांदा तेल मंद आचेवर गरम केलं असेल तर ते पुन्हा गरम करता येतं. तसंच तळण्याआधी अन्नात मीठ घालणं टाळा. कारण मिठामुळे तेलातून लवकर धूर येऊ लागतो आणि एकदा तेलाचा धूर येऊ लागला की ते वापरण्यासाठी योग्य मानलं जात नाही. शरीरातल्या आम्लाचं प्रमाण वाढवतं तेल वारंवार गरम केल्यास त्यातल्या आम्लाचं (Acid) प्रमाण वाढतं. पोटात आणि घशात जळजळ होत असेल तर खाण्याचं तेल हे त्यामागचं कारण असू शकतं. अ‍ॅसिडिटीचा जास्त त्रास होत असेल तर जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा. त्यामुळे घसा आणि पोटदुखीमध्ये आराम मिळेल. Black Turmeric: काळी हळद हेल्दी तर आहेच; स्कीनसाठीही तिचा असा होतो फायदा शरीरात विषारी पदार्थाचे प्रमाण वाढतं सूर्यफूल किंवा कॉर्न ऑइलसारखं (Corn Oil) काही वनस्पतींचं तेल पुन्हा गरम केल्याने त्यातल्या विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हृदयविकार, अल्झायमर, स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. वनस्पती तेल पुन्हा गरम केल्याने 4-हायड्रॉक्सी-ट्रान्स-2-नॉमिनल (HNE) नावाचा विषारी घटक बाहेर पडतो. तो डीएनए, आरएनए आणि प्रथिनांना योग्यरित्या कार्य करण्यास प्रतिबंध करतो. खराब कोलेस्टेरॉल वाढतं काळं आणि धूर निघणारं तेल वारंवार गरम केल्यास ते शरीरातलं एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवू शकतं. एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि छातीत दुखण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कोलेस्टेरॉलशी संबंधित समस्या टाळण्यासाठी स्वयंपाकाचं तेल पुन्हा गरम करून वापरणं टाळा. 7 जन्मांक असलेल्या व्यक्ती कशा असतात? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या स्वभाव आणि... कॅन्सरचा धोका वाढतो तेल पुन्हा गरम केल्याने ते कार्सिनोजेनिक बनू शकतं. म्हणजेच ते कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकतं. संशोधन असं सांगतं, की तेल वारंवार गरम केल्यास त्यात अल्डिहाइड्स (विषारी घटक) तयार होतात. नंतर त्याचा वापर केल्यास ते विषारी घटक शरीरात पोहोचतात आणि त्यामुळे शरीराचं नुकसान होतं. या तेलाच्या वापरामुळे कॅन्सरचा (Cancer) धोका वाढतो. तसंच शरीरातल्या टॉक्सिन्सचं प्रमाण वाढल्याने लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेहासह अनेक आजार होऊ शकतात.
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या