स्वतःच्या मुलांना बॉडी पेंटिंग करू देण्यासाठी अर्धनग्न झालेल्या रेहाना फातिमाच्या पतीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

स्वतःच्या मुलांना बॉडी पेंटिंग करू देण्यासाठी अर्धनग्न झालेल्या रेहाना फातिमाच्या पतीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

फातिमाने स्वत:च्या मुलांना 'बॉडी पेंटिंग' करू दिलं आणि त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला. यावर फातिमा यांच्या पतीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

कोची, 29 जून : अर्धनग्न होत स्वतःच्या मुलांना शरीरावर पेंटिंग करून देणारी महिला कार्यकर्ती रेहाना फातिमाचा तो VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. या सगळ्या प्रकाराबद्दल रेहाना यांच्या पतीने मनोज के. श्रीधर यांनी  पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

माझ्या बायकोनं कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळे तिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर व्हायला हवा, असं मनोज यांनी म्हटलं आहे. रेहाना यांच्यावर थिरुवल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सेक्शन आयटी कायद्याच्या 67 अंतर्गत (इलेक्ट्रॉनिक मार्गाने लैंगिक कंटेट प्रसिद्ध करणे) आणि जुवेनाइल जस्टिस कायद्याच्या सेक्शन 75 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून रेहाना यांनी केरळच्या कोर्टात जामीन अर्जासाठी याचिका दाखल केली आहे.

याबद्दल ANI शी बोलताना रेहाना यांचे पती मनोज श्रीधर म्हणाले, "या व्हीडिओत कुठलीही अश्लीलता नाही. स्त्रीदेहाचं ते प्रदर्शनही नाही. आईने आपल्या मुलांबरोबर केलेला तो संवाद आहे. मुलांनी आई आजारी असताना तिला बरं वाटावं म्हणून तिच्या शरीरावर चित्र काढलं. त्यांनी राखेतून उडणारा फिनिक्स तिच्या अंगावर चितारला. यात काहीही अश्लील नाही. तो कलाविष्कार आहे. त्यामुळे रेहाना यांना जामीन मिळण्यात अडचण येणार नाही, याची खात्री आहे."

"विशिष्ट पक्ष आम्हाला मुद्दाम लक्ष्य करत आहे. त्यांचे राजकीय हेतू उघड आहेत. उलट तेच फेक अकाउंटवरून आम्हाला त्रास देत आहेत. सायबल बुलिंग करत आहेत," असा आरोप मनोज यांनी केला.

सावधान! चुकूनही पाहू नका या 10 वेबसीरिज आणि ऑनलाइन फिल्म्स; सरकारचा अलर्ट

केरळच्या शबरीमालामध्ये अयप्पा मंदिर प्रवेश प्रकरणी रेहाना फातिमा यांचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं होतं. आता अर्धनग्न होत रेहाना फातिमाने स्वत:च्या मुलांना 'बॉडी पेंटिंग' करू दिलं आणि त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे त्या पुन्हा अडचणीत आल्या आहेत.

रेहाना फातमि यांनी या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, 'जेव्हा त्यांची आई डोळ्याच्या समस्येमुळे काहीसा आराम करत होती, त्यावेळी तिच्या मुलांनी तिला Cool बनवण्याठी फिनिक्स पक्षाचं चित्र काढण्याचा निर्णय घेतला.' सध्याच्या समाजात महिला कपड्यांमध्ये देखील सुरक्षित नाही आहेत. एखाद्या स्त्रीचे शरीर काय आहे किंवा लैंगिकता काय आहे याबाबत उघडपणे बोलले पाहिजे असे म्हणणे रेहानाने या व्हिडीओतून मांडले आहे.

मास्क वापरा अन्यथा भरा एवढा दंड!, प्रशासनानं जारी केला नवा आदेश

रेहाना फातिमाने हा व्हिडीओ शेअर करताना 'बॉडी आर्ट आणि राजकारण' (Body Art and Politics) असं कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिची दोन्ही मुलं तिच्या अर्धनग्न शरिरावर पेंटिंग करत आहेत. पोस्टबाबत फातिमाचे असे म्हणणे आहे की, लैंगिकतेच्या चुकीच्या संकल्पनेविरोधात तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

(संकलन - अरुंधती)

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: June 29, 2020, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading