Home /News /lifestyle /

Benefits Banana: हंगाम कोणताही असो, एक केळदेखील खाण्याचे आहेत अनेक फायदे

Benefits Banana: हंगाम कोणताही असो, एक केळदेखील खाण्याचे आहेत अनेक फायदे

Benefits Banana: केळी हे असे फळ आहे, जे खाल्ल्याने शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं. या फळाचे अनेक फायदे आहेत. केळीचा नियमित आहारात समावेश केल्यामुळे आश्चर्यकारक फायदे आपल्याला मिळतील. रक्ताभिसरण नियंत्रित ठेवण्यासाठीही केळी खूप उपयुक्त आहेत. जाणून घेऊया या फळाचे इतर कोणते फायदे आहेत.

पुढे वाचा ...
  1. वजन नियंत्रित राहील - वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही केळी खूप उपयुक्त आहेत. ज्यांना शरीराच्या स्थूलपणावर नियंत्रणात ठेवायचं आहे, अशा लोकांनी या फळाचा आहारात समावेश केला पाहिजे. यासोबतच हे लक्षात घ्यावं की, हे फळ नियमितपणे खावं. तरच, आपल्याला चांगले परिणाम मिळतील.
  1. वजन नियंत्रित राहील -
  वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही केळी खूप उपयुक्त आहेत. ज्यांना शरीराच्या स्थूलपणावर नियंत्रणात ठेवायचं आहे, अशा लोकांनी या फळाचा आहारात समावेश केला पाहिजे. यासोबतच हे लक्षात घ्यावं की, हे फळ नियमितपणे खावं. तरच, आपल्याला चांगले परिणाम मिळतील.
  2. पचनसंस्था मजबूत होईल ज्या लोकांचे पोट नेहमी खराब असते, त्यांनी केळींचा आहारात समावेश करावा. केळी खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे पोट फुगण्याची तक्रार असेल तर तीही हळूहळू संपेल.
  2. पचनसंस्था मजबूत होईल
  ज्या लोकांचे पोट नेहमी खराब असते, त्यांनी केळींचा आहारात समावेश करावा. केळी खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे पोट फुगण्याची तक्रार असेल तर तीही हळूहळू संपेल.
  3. साखर नियंत्रणात राहील काही लोक केळी खात नाहीत; कारण, त्यांना वाटतं की, केळ्यांमुळे रक्तातील साखर वाढेल. परंतु, ही समजूत खरी नाही. हे फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. एवढंच नाही तर, केळी खाल्ल्यानं हृदयही फिट राहतं. म्हणजेच, हृदयरोगी देखील या फळाचे सेवन करू शकतात. तेव्हा केळी नियमितपणे खा; याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  3. साखर नियंत्रणात राहील
  काही लोक केळी खात नाहीत; कारण, त्यांना वाटतं की, केळ्यांमुळे रक्तातील साखर वाढेल. परंतु, ही समजूत खरी नाही. हे फळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. एवढंच नाही तर, केळी खाल्ल्यानं हृदयही फिट राहतं. म्हणजेच, हृदयरोगी देखील या फळाचे सेवन करू शकतात. तेव्हा केळी नियमितपणे खा; याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  4. भरपूर कॅल्शियम मिळेल ज्या लोकांच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण खूपच कमी आहे, त्यांनी केळीचा आहारात समावेश करावा. जर, तुम्ही रोज एक केळं खाल्लंत त्याचा परिणाम तुम्ही स्वतःच अनुभवाल. तेव्हा, हे फळ जरूर खा.
  4. भरपूर कॅल्शियम मिळेल
  ज्या लोकांच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण खूपच कमी आहे, त्यांनी केळीचा आहारात समावेश करावा. जर, तुम्ही रोज एक केळं खाल्लंत त्याचा परिणाम तुम्ही स्वतःच अनुभवाल. तेव्हा, हे फळ जरूर खा.
  5. नैराश्य कमी होतं - केळ्यांच्या सेवनामुळे नैराश्याच्या समस्येतून आराम मिळतो, हे अनेक संशोधनांतून स्पष्ट झालं आहे. केळ्यांमध्ये अशी काही प्रथिनं आढळतात, की ज्यामुळे नैराश्याच्या समस्येने ग्रासलेल्या रुग्णाला आराम वाटतो. याशिवाय केळ्यात आढळणारं व्हिटॅमिन बी 6 शरीरातल्या रक्तातल्या ग्लुकोजची पातळी योग्य प्रमाणात राखते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  5. नैराश्य कमी होतं -
  केळ्यांच्या सेवनामुळे नैराश्याच्या समस्येतून आराम मिळतो, हे अनेक संशोधनांतून स्पष्ट झालं आहे. केळ्यांमध्ये अशी काही प्रथिनं आढळतात, की ज्यामुळे नैराश्याच्या समस्येने ग्रासलेल्या रुग्णाला आराम वाटतो. याशिवाय केळ्यात आढळणारं व्हिटॅमिन बी 6 शरीरातल्या रक्तातल्या ग्लुकोजची पातळी योग्य प्रमाणात राखते.
  (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health, Health Tips

  पुढील बातम्या