मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फक्त लैंगिक इच्छाच संपत नाही, तर Sex Hormone कमी झाल्यास असाही होतो परिणाम

फक्त लैंगिक इच्छाच संपत नाही, तर Sex Hormone कमी झाल्यास असाही होतो परिणाम

(Image:shutterstock)

(Image:shutterstock)

या हार्मोनची कमतरता असल्यास, शरीराच्या विविध भागांवर परिणाम दिसून येतो

  मुंबई, 05 ऑक्टोबर : पुरुषांमध्ये प्रजननक्षमतेसाठी टेस्टोस्टेरॉन म्हणजेच सेक्स हॉर्मोन (Male Sex Hormone) कारणीभूत असतं. पुरुषांच्या अंडकोशामध्ये हे हॉर्मोन (Testosterone) तयार होत असतं. या हॉर्मोनच्या कमतरतेमुळे केवळ प्रजननक्षमतेवरच नाही, तर इतरही अनेक गोष्टींवर परिणाम होतो. या हॉर्मोनचा संबंध थेट पौरुषत्वाशी जोडला जातो.

  या हॉर्मोनचा पुरुषांमधली आक्रमकता, चेहऱ्यावरचे केस, स्नायू आणि लैंगिक क्षमता या सर्वांवर थेट परिणाम होतो. केवळ शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही हे हॉर्मोन (Role of Testesterone) महत्त्वाची भूमिका पार पाडतं. या हॉर्मोनची कमतरता असल्यास, शरीराच्या विविध भागांवर परिणाम दिसून येतो; पण याचा सर्वांत मोठा परिणाम (Effect of lack of Testosterone) लैंगिक क्षमतेवर होतो.

  साधारणपणे वयाच्या 40व्या वर्षानंतर दर वर्षी हे हॉर्मोन दोन टक्क्यांनी कमी होत जातं; मात्र कित्येक कारणांमुळे, आजारामुळे वा अपघातांमुळे त्यापूर्वीच शरीरातली टेस्टॉस्टेरॉन लेव्हल कमी होते. बीबीसीने दिलेल्या एका बातमीनुसार, या प्रकाराला हायपोगोनॅडिझम (Hypogonadism) म्हटलं जातं. ब्रिटिश पब्लिक हेल्थ सिस्टीमने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक हजार व्यक्तींमागे पाच लोकांना हायपोगोनॅडिझमला सामोरं जावं लागतं.

  टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यास काय होतं?

  टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनच्या कमतरतेमुळे आपल्याला लवकर थकवा जाणवू लागतो. तसंच काहीही करण्याचा उत्साह (Effect of low testosterone) राहत नाही. यासोबतच, चिंता आणि चिडचिडेपणाही वाढू लागतो. याचा सर्वांत मोठा परिणाम सेक्स लाइफवर होतो. हॉर्मोनच्या कमतरतेमुळे सेक्स करण्याची इच्छाच कमी होऊन जाते. काही प्रकरणांमध्ये यामुळे नपुंसकत्व आल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.

  हे वाचा - Relationship : चांगल्या वैवाहिक जीवनासाठी जोडीदारासोबत या गोष्टी करू नका शेअर

  टेस्टॉस्टेरॉनच्या कमतरतेमुळे जास्त वेळ व्यायाम करणं अशक्य होतं. तसंच चेहऱ्यावरची दाढी आणि मिशांची वाढही खुंटते. एकाग्रता आणि स्मृतीवरही याचा परिणाम जाणवतो. तसंच, जास्त काळापर्यंत ही समस्या कायम राहिल्यास, शरीरातली हाडं ठिसूळ होण्याचा धोकाही असतो.

  टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचे उपाय

  हेल्थलाइनने दिलेल्या एका वृत्तानुसार, व्यायाम केल्याने नैसर्गिकरीत्या शरीरातली टेस्टॉस्टेरॉन लेव्हल वाढते. वेटलिफ्टिंग हा त्यासाठी सर्वोत्तम व्यायामप्रकार असल्याचंही यात म्हटले आहे.

  हे वाचा - 'झोपूही देत नाही, काय करू?', नवऱ्याच्या 'त्या' सवयीला वैतागलेल्या बायकोची व्यथा

  यासोबतच, कॅफेन आणि कॅरेटीन मोनोहायड्रेटही (creatine monohydrate) टेस्टोस्टेरॉन वाढवण्यास (How to increase testosterone level) मदत करतात. तुमच्या आहारात प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्सचं योग्य संतुलन राखल्यानेही टेस्टॉस्टेरॉन वाढू शकतं; पण आहार एका मर्यादेपर्यंत असणं गरजेचं आहे. जास्त खाल्ल्यामुळेही टेस्टॉस्टेरॉनमध्ये घट होऊ शकते. याशिवाय हॉर्नी गॉट वीड, कवचबीज चूर्ण (mucuna pruriens) आणि शिलाजितसारख्या हर्बल औषधांच्या मदतीनेही शरीरातली टेस्टॉस्टेरॉन लेव्हल वाढवता येते.

  First published:
  top videos

   Tags: Health, Lifestyle, Sexual health