वजन कमी करायचं असेल तर दिवसाला किती कॅलरी करायच्या खर्च? तुम्हीच ठरवा तुमचा डाएट प्लॅन

कॅलरी नियंत्रणात ठेवणे हृदयासाठी चांगले आहे आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभू शकते.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 06:30 AM IST

वजन कमी करायचं असेल तर दिवसाला किती कॅलरी करायच्या खर्च? तुम्हीच ठरवा तुमचा डाएट प्लॅन

मुंबई, 19 जुलै : चविष्ट, गोड आणि जंक फूड खाणं कोणाला नाही आवडत? पण या पदार्थांसोबत शरीरात कॅलरीजचं प्रमाण वाढतं. परिणामी वजन वाढतं. मग धडपड चालू होते ती वजन कमी करण्याची. प्रत्येक वेळी चमचमीत पदार्थ खाताना कॅलरीवर पाळत ठेवावी लागते. तुम्हाला बारीक व्हायचं नसेल किंवा वजन कमी करायचं नसेल, तरी काही एक्स्ट्रा कॅलरी जाळणं निरोगी हृदयासाठी आवश्यक असतं. कॅलरीचा हिशोब सांभाळलात, तर वजन कमी करणं अवघड वाटणार नाही.

कॅलरी नियंत्रणात ठेवणं हृदयासाठी चांगले आहे आणि हृदय निरोगी राहिलं तर  तुम्हाला दीर्घायुष्य लाभू शकतं. याच विषयी आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. जाणून घ्या कशाप्रकारे कॅलरीज कमी केल्याने शरीराला फायदा होतो. Duke University School of Medicine ने एक रिसर्च केला होता. याची माहिती Lancet Diabetes And Endocrinology या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.

हाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा

कॅलरीजना नियंत्रणात ठेवण्याऱ्या डाएटचे हृदयासाठी असणारे फायदे या विषयावर हा रिसर्च करण्यात आले. त्यामध्ये जे लोक कॅलरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठीचं  डाएट करत आहेत अशा जवळपास 200 लोकांचं दोन वर्षासाठी निरीक्षण करण्यात आलं. या डाएटने होण्याऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला.

Loading...

या अभ्यासातून असं समोर आलं की, हे डाएट ज्यांनी व्यवस्थित पाळलं, त्यांचं कोलेस्टेरॉल कमी होऊन रक्तदाबही नियंत्रणात आला. रक्तामध्ये आढळणारं वाईट फॅट ज्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता असते ते 24 टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं. या अभ्यासाच्या सुरुवातीला सहभागी झालेल्या लोकांना फक्त एक चतुर्थांश कॅलरी दररोज कमी करण्यासाठी सांगण्यात आलं. हे डाएट करणारे लोक दररोज फक्त 12 टक्के कॅलरी कमी करू शकले म्हणजे 300 कॅलरीज कमी झाल्या. दररोज इतक्या कॅलरी कमी करणं आवश्यक आणि निरोगी आयुष्यासाठी पुरेसंही आहे.

कामाच्या दिवसांमध्ये खा हे 5 पोष्टीक पदार्थ...

जे ओव्हरवेट आहेत, ज्यांना मोठ्या प्रमाणावर वजन कमी करायचं आहे, त्यांनी मात्र याहून जास्त कॅलरी कमी करायला हव्यात.

300 कॅलरी म्हणजे नेमकं किती प्रमाण?

आता मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की, 300 कॅलरी म्हणजे नक्की किती? खाण्यात नेमकं काय कमी केलं तर या कॅलरी कमी होतील याचा हिशोब कसा ठेवायचा? प्रत्येक पदार्थाच्या बनवण्याच्या पद्धतीनुसार त्यामधलं कॅलरीचं प्रमाण ठरत असलं तरी साधारण अंदाज यावा म्हणून हे उदाहरण लक्षात घेता येईल. चीझकेकच्या एका स्लाईसमध्ये 300 कॅलरी असतात. तुम्ही तो एक तुकडा टाळलात तर दिवसाचा कोटा पूर्ण होऊ शकतो.

लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातले एक अभ्यासक डॉ. क्रॉस आणि त्यांच्या टीमने पाश्चिमात्य खाद्यपदार्थांची उदाहरणं देत हे 300 कॅलरीचं प्रमाण सांगितलं आहे. दोन चॉकलेट कुकीझ, बटाट्याच्या वेफर्सचं छोटं पाकिट किंवा पोटॅटो चिप्सचं एक किंवा पिझ्झाच्या एका स्लाईसमध्ये या एवढ्या कॅलरी असतात. आता तुम्ही ठरवा यातला कोणता चविष्ट पदार्थ खाणं बंद करायचा?

भरधाव कारच्या धडकेत 2 सख्ख्या भावांचा मृत्यू; अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 06:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...