मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Red Rice Benefits : कितीही भात खाल्ला तरी वाढणार नाही वजन; फक्त तुमचा तांदूळ बदला

Red Rice Benefits : कितीही भात खाल्ला तरी वाढणार नाही वजन; फक्त तुमचा तांदूळ बदला

रेड राईस म्हणजेच लाला तांदूळ फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, अँथोसायनिन्स आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. लाल तांदूळ हा एक सेंद्रिय तांदूळ आहे जो पॉलिश केलेल्या पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक असतो.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 29 सप्टेंबर : वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करतात. चपाती आणि तांदूळ हे दोन्ही कार्बोहायड्रेट्सचे चांगले स्रोत मानले जातात. पण अनेकांना भात खायला खूप आवडते. अशा स्थितीत त्यांची वजन कमी करण्याची इच्छा अनेक वेळा अपूर्ण राहते. मात्र आता तुम्ही वजन कमी करतानाही तांदूळ खाऊ शकता. यासाठी फक्त पांढऱ्या तांदळाऐवजी लाल तांदूळ निवडा. लाल तांदळात फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, अँथोसायनिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.

लाल तांदूळ हा एक सेंद्रिय तांदूळ आहे जो पॉलिश केलेल्या पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक असतो. लाल तांदळात जास्त प्रमाणात मॅंगनीज असते. ज्यामुळे संयोजी ऊतक आणि हाडे तयार होण्यास मदत होते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील उपयुक्त भूमिका बजावू शकते. चला जाणून घेऊया लाल तांदूळ वजन कमी करण्यात कशी मदत करू शकतो.

Eating Maggi while on diet : वजन घटवायचंय, पण डाएट करताना मॅगी खाल्ली तर चालेल का?

फायबर समृद्ध

सर्व प्रकारच्या तांदळात कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन जवळजवळ समान प्रमाणात असतात, परंतु लाल तांदूळ फायबर आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. हेल्थ शॉट्सनुसार लाल तांदळात इतर तांदळाच्या तुलनेत अधिक पोषक तत्व असतात आणि हा तांदूळ चवीलाही उत्तम असतो.

फॅट्स बर्न करण्यासाठी उपयुक्त

लाल तांदळात अशी काही संयुगे आढळतात, जी चरबी जाळण्यास मदत करतात. त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते आणि ते शरीराला ऊर्जा देण्याचे उत्तम काम करू शकते. लाल तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते

लाल तांदूळ खाण्यास अतिशय हलका असतो, जो सहज पचतो. यामध्ये भरपूर फायबर असल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. त्याचे सेवन केल्यानंतर, इतर पदार्थ खाण्याची इच्छादेखील कमी होते.

नवरात्रीचा उपवास केलाय? या गोष्टींचा आहारात करा समावेश, नाही वाटणार अशक्तपणा

वाफाळलेला भात जास्त फायदेशीर

लाला तांदुळापासून निरोगी भात बनवण्यासाठी तो वाफेवर शिजवावा. तांदूळ वाफवल्याने त्यातील पोषक घटक खराब होत नाहीत आणि ते अधिक फायदेशीर ठरू शकतात. कोणत्याही प्रकारचा तांदूळ कुकरमध्ये शिजवू नये, त्यामुळे त्यातील सर्व महत्त्वाचे घटक निघून जातात तसेच गॅसची समस्याही उद्भवू शकते.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips