ज्या लाल मिरचीमुळे लागतो ठसका; ती दूर करू शकते तुमचा खोकला

ज्या लाल मिरचीमुळे लागतो ठसका; ती दूर करू शकते तुमचा खोकला

कोरोना काळात लाल मिरची (red chilli) तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. साधा खोकला तुम्हाला झाला असेल तर औषध म्हणून तुम्ही लाल मिरचीचा वापर करू शकता. वाचून थोडं आश्चर्य वाटणं साहजिकचं आहे. पण हे कसं शक्य आहे वाचा.

  • Last Updated: Oct 22, 2020 05:20 PM IST
  • Share this:

लाल मिरची (red chilli) किंवा लाल मिरचीची पूड (red chilli powder) म्हटली की ठसका लागतोच. लाल मिरचीची पूड थोडी जरी उडाली तरी खोकला (cough) सुरू होतो. त्यामुळे लाल मिरचीने खोकला कसा काय बरा होऊ शकतो, असं सांगितलं तर आश्चर्यच वाटेल. मात्र हे खरं आहे. लाल मिरची खोकल्यावर उपयुक्त आहे. लाल मिरचीचा तुम्ही औषध म्हणून वापर करू शकता. ती खोकल्यापासून आराम तर देईलच शिवाय छातीत होणाऱ्या वेदनाही कमी करते. फक्त तिचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा.खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी लाल मिरचीची पूड पाव चमचा घेऊन त्यात एक चमचा अॅपल सिडेर व्हिनेगर, एक चमचा मध, पाव चमचा आल्याचा रस आणि दोन चमचे पाणी घालून मिश्रण तयार करा. खोकला असल्यास दिवसातून दोन ते तीन वेळा हे मिश्रण घ्या. खोकल्यापासून आराम मिळेल.

लसूण आणि लाल मिरची पूड

लसूण अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. लसूण सर्दीसाठी एक उपयुक्त औषध आहे. यासाठी एक कप पाण्यात दोन ते तीन लसूण आणि एक चमचा ओवा आणि फारच थोड्या प्रमाणात लाल तिखट घाला आणि दोन मिनिटं उकळवा. मिश्रण थंड झाल्यावर दिवसातून दोनदा मध टाकून प्या. यामुळे खोकला बरा होतो. वाटलेला लसूण, लवंग तेलाचे काही थेंब आणि थोडं मध मिसळून हे मिश्रण घेतल्यासही खोकल्यापासून आराम मिळतो.

हळद आणि मिरपूड

myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते हळद एक आयुर्वेदिक औषधआहे. खोकल्यासाठी अँटी-बायोटिक औषध म्हणून कार्य करतं. अर्धा कप पाणी गरम करून त्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मिरपूड घाला. हवं असल्यास दालचिनी देखील घालू शकता. दोन ते तीन मिनिटं हे पाणी उकळवा.  आता त्यात मध घाला आणि जर तुम्ही खोकल्याचा त्रासाने ग्रस्त असाल तर याचं नियमित सेवन करा यामुळे खोकला दूर होईल.

हे वाचा - पालकांनो लक्ष द्या! बाटलीतून दूध नाही तर बाळाच्या शरीरात जातोय घातक घटक

याव्यतिरिक्त हळदीचं मूळ भाजून त्याची भरड तयार करा. आता ही पावडर पाण्यात मिसळा आणि त्यात मध घालून प्या.

गरम दूध आणि मध

गरम दुधामध्ये मध मिसळून प्यायल्याने सर्दी-पडशापासून आराम मिळतो. दूध गरम करून त्यात साखरेऐवजी मध घालून रात्री झोपताना प्या. यामुळे कफ कमी होतो आणि सर्दीदेखील बरी करते.

कांदा

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, साधा कांद्याचा वास जरी घेतला तरी खोकल्यापासून आराम मिळू शकतो. याशिवाय पिकलेल्या कांद्याच्या रसामध्ये मध आणि चहा मिसळून औषध म्हणून वापरलं जाऊ शकते. कोरडा खोकला दूर करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे.

हे वाचा - सोशल डिस्टन्सिंग राखा पण एकटं पाडू नका; कोरोना काळात एकमेकांना असा द्या आधार

तसंच अर्धा चमचा कांद्याच्या रसात अर्धा चमचा मध घालून दिवसातून कमीतकमी दोनदा सेवन केल्याने खोकल्यापासून आराम मिळेल आणि घशातील वेदना देखील दूर होतील.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - कोरडा खोकला

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 22, 2020, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading