• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Red Blood Cells आता करतायेत नवं काम; वैज्ञानिकही झाले हैराण

Red Blood Cells आता करतायेत नवं काम; वैज्ञानिकही झाले हैराण

शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याशिवाय लाल रक्तपेशींचं (Red blood cells) आणखी एक काम समोर आलं आहे.

  • Share this:
मुंबई, 23 ऑक्टोबर : मानवी शरीरामध्ये सुमारे पाच लीटर रक्त असतं. या रक्तामध्ये असणाऱ्या रेड ब्लड सेल्स (Red blood cells) म्हणजेच लाल रक्तपेशींचं काम हे शरीरात सगळीकडे ऑक्सिजन पोहोचवणं असतं (RBC function) , हे आपल्याला माहितीच आहे. पण याच तांबड्या पेशी (RBC) केवळ ऑक्सिजन पोहोचवण्याचं नाही, तर आणखीही एक महत्त्वाचं काम (RBC new function) करत असल्याचं वैज्ञानिकांना समजलं आहे. तांबड्या पेशी करत असलेलं हे काम पाहून वैज्ञानिकही आश्चर्यचकीत झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या पेशी आपल्या शरीरासाठी संरक्षक कवच म्हणून काम करतात. शरीरातल्या तांबड्या पेशी म्हणजे हिमोग्लोबीनच्या बॅग्ज असतात. या पेशी केवळ शरीरात ऑक्सिजन (RBCs supply oxygen) पुरवण्याचे काम करत असत. मात्र एका नव्या संशोधनानुसार या पेशींचं आणखी महत्त्वाचं काम समोर आलं आहे. पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या पॅरलमॅन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये पल्मोनरी आणि क्रिटिकल केअर फिजिशियन असणाऱ्या नीलम मंगलमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या पथकानेच याबाबत शोध लावला आहे. सायन्स ट्रान्सलेशन मेडिसीन या जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. आपल्या शरीरामध्ये एखादा विषाणू (Virus) दाखल झाल्यास किंवा एखाद्या ठिकाणी जखम झाल्यास त्याची माहिती आपल्या इम्युन सिस्टीमपर्यंत (RBC gives message to immune system) पोहोचवण्याचं काम या आरबीसी म्हणजेच तांबड्या पेशी करतात. यासाठी आपल्या शरीरात गेलेल्या विषाणूच्या डीएनएला आरबीसी आपल्याकडे आकर्षित करून घेतात. त्यानंतर त्याचं विश्लेषण करून मिळालेली माहिती पुढे मेंदूपर्यंत पोहोचवतात. यामध्ये काही धोका आढळल्यास शरीराच्या इम्युन सिस्टीमला इशारा दिला जातो. हे वाचा - तुमच्या शरीरात रक्त कमी आहे, कसं ओळखाल; लक्षणं दिसताच सुरू करा 'हे' उपाय नीलम मंगमूर्ती यांनी सांगितलं, "तांबड्या पेशी रक्तात नायट्रिक ऑक्साइडचं प्रमाण ठरवतात. आरबीसी शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचतात, त्यामुळे या एकप्रकारे आपल्या शरीरातल्या सैनिकच असतात. काही पक्षी आणि माशांच्या काही प्रजातींमध्ये आरबीसी या बाहेरून येणाऱ्या विषाणूंपासून शरीराचं रक्षण करतात. पण मानव किंवा अन्य सस्तन प्राण्यांमध्ये असं होत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं नव्हतं" त्या पुढे म्हणाल्या, "2018 मध्ये आमच्या टीमने केलेल्या संशोधनात आरबीसींवर मॉलिक्युलर सेन्सर असल्याचं आम्हाला दिसून आलं होतं. यांना टोल लाइक रिसेप्टर (TLR9) म्हटलं जातं. ज्या डीएनएमध्ये न्यूक्लियोटाईड बेस्ड सायटोसिन आणि गुआनिनची जोडी (CpG) असते, त्या डीएनए मॉलिक्यूलला हे रिसेप्टर पकडून ठेवतात. जेव्हा पेशी किंवा उतींना जखम होते, तेव्हा डीएनएमधून CpG बाहेर सोडलं जातं. यासोबतच, जेव्हा शरीरामध्ये एखादा विषाणू दाखल होतो, तेव्हाही हे CpG रिलीज केलं जातं. यावेळी तांबड्या पेशींवरचे सेन्सर सक्रिय होतात आणि इम्युन सिस्टीमला सूचना देतात. शास्त्रज्ञांना आतापर्यंत याबाबत माहिती होती. मात्र अशा वेळी पूर्ण तांबड्या पेशीच सक्रिय होऊन पुढे सूचना देत असल्याचं या नव्या संशोधनात समोर आलं आहे. संशोधनात काय दिसलं? शास्त्रज्ञांनी उंदरांवर प्रयोग करून पाहिला. त्यांनी उंदरांच्या शरीरात CpG डीएनए सोडून, त्यावर रक्तातल्या तांबड्या पेशी कशा प्रतिक्रिया देतात ते पाहिलं. यावेळी त्यांना उंदराच्या शरीरात विशिष्ट प्रकारची सूज दिसून आली. तसंच त्याच्या शरीरातल्या सर्व तांबड्या पेशी सक्रिय झाल्याचंही त्यांना दिसून आलं. हेच CpG डीएनए जेव्हा मानवी शरीरात शिरतात तेव्हा आपल्या तांबड्या पेशीही तशाच प्रकारे सक्रिय होतात. कोलंबिया विद्यापीठाचे पॅथोलॉजिस्ट स्टीव्हन स्पिटॅलनिक म्हणाले, "या संशोधनातले निष्कर्ष पाहून आम्हाला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला. यानंतर तांबड्या पेशी एकूण 17 प्रकारची कामं करत असल्याचा आमचा अंदाज आहे. तसंच सेप्सिस, कोविड-19 किंवा इतर प्रकारचे आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये या पेशी कशा काम करतात हेदेखील आम्हाला समजलं आहे" हे वाचा - दरवर्षी लाखो लोकांचा जीव वाचवणारं ‘निळं रक्त' काय आहे? जवळपास प्रत्येक लसीसाठी होतो वापर तांबड्या पेशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या छोट्या-मोठ्या समस्यांबाबतही माहिती देऊ शकतात. सर्वसाधारणपणे गंभीर रुग्णांना अॅनिमियाचा (Anaemia) त्रास होतो. ते अतिदक्षता विभागात असतील, तर तिसऱ्याच दिवशी ही समस्या येऊ शकते. कारण रक्त जेव्हा प्लीहातून जातं, तेव्हा दुबळ्या लाल रक्तपेशी प्लीहामध्ये नष्ट होतात. लाल रक्तपेशी नष्ट होणं म्हणजे रक्ताल्पता अर्थात अॅनिमिया; पण निरोगी आणि मजबूत तांबड्या रक्तपेशी प्लीहाचे भोजन होण्यापासून वाचतात. कारण त्यांच्या बाहेरच्या आवरणावर प्रोटीनचा एक विशेष थर असतो. विशेष म्हणजे, जेव्हा कोविडसारख्या गंभीर आजाराचे विषाणू शरीरात प्रवेश करतात तेव्हा या तांबड्या पेशी अधिक वेगाने त्याबाबत पुढे माहिती पाठवतात, जेणेकरून आपली इम्युन सिस्टीम त्याला वेगाने प्रतिकार करू शकेल. अर्थात, तांबड्या पेशी या केवळ संदेशवाहक म्हणून काम करतात; पण रोगप्रतिकार करण्यात त्यांचा म्हणावा असा वाटा नसतो; मात्र तांबड्या पेशी करत असलेलं हे कामही कमी महत्त्वाचं नाही. भविष्यात या संशोधनाचा वापर करून खूप रुग्णांना मदत होऊ शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
First published: