मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल

Tongue and health: जीभेवर दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा; गंभीर आजारांचा धोका टळू शकेल

जिभेच्या बदललेल्या रंगावरून समजतं की, तुमच्या शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता आहे की नाही किंवा तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त आहात? जीभेवर दिसणाऱ्या लक्षणांविषयी (Tongue and health) जाणून घेऊया.

जिभेच्या बदललेल्या रंगावरून समजतं की, तुमच्या शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता आहे की नाही किंवा तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त आहात? जीभेवर दिसणाऱ्या लक्षणांविषयी (Tongue and health) जाणून घेऊया.

जिभेच्या बदललेल्या रंगावरून समजतं की, तुमच्या शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता आहे की नाही किंवा तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त आहात? जीभेवर दिसणाऱ्या लक्षणांविषयी (Tongue and health) जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 04 डिसेंबर : जीभेवरून आपण आरोग्याची स्थिती जाणून घेऊ शकतो. काही आजारांची सुरुवातीची लक्षणं जिभेवर दिसतात, ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. जरी तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाली असेल, तरीही तुम्हाला त्याची लक्षणे तुमच्या जिभेवर दिसतील. हेल्थ वेबसाइट वेबएमडी आणि झी न्यूजच्या माहितीनुसार, जिभेच्या बदललेल्या रंगावरून समजतं की, तुमच्या शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता आहे की नाही किंवा तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त आहात? जीभेवर दिसणाऱ्या लक्षणांविषयी (Tongue and health) जाणून घेऊया. पांढरे ठिपके येणे जिभेवर मलईदार पांढरे ठिपके हे बुरशीजन्य संसर्ग थ्रशचे लक्षण असू शकतात. हे औषधांचे दुष्परिणाम किंवा काही गंभीर आजारामुळे देखील असू शकते. ल्युकोप्लाकियाच्या स्थितीत जिभेवर कडक, पांढरे सपाट ठिपके आढळतात. यामुळं पुढे तोंडाच्या कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. तुमच्या जिभेवर पांढरे चट्टे दिसत असतील तर लगेच दंतवैद्याकडे (dentist) जा. जिभेचा चमकदार लाल रंग ही कावासाकी रोगाची (Kawasaki disease) लक्षणं असू शकतात. हा एक अतिशय गंभीर आणि दुर्मिळ आजार आहे. हे सहसा मुलांमध्ये घडते. या स्थितीत रक्तवाहिन्यांना सूज येते. चमकदार लाल रंग देखील स्कार्लेट तापामुळे (scarlet fever) असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुमची जीभ गुळगुळीत, लाल दिसत असेल आणि तोंडात दुखत असेल तर ते व्हिटॅमिन बी3 च्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. जिभेवर जळजळ होणे गरम पदार्थ खाल्‍याने किंवा पिल्‍याने तुमची जीभ भाजली आहे असे वाटत असेल, तर ही मज्जातंतूची समस्या असू शकते. याला बर्निंग माउथ सिंड्रोम (burning mouth syndrome) म्हणतात. ऍसिड रिफ्लक्स आणि मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या बाबतीतही हे घडतं. हे वाचा - Sitting on the Floor while Eating: जमिनीवर बसून जेवल्यामुळे आरोग्याला होतात इतके फायदे, वाचा जेवण्याची योग्य पद्धत जीभ सुन्न होणं हे पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळं असू शकतं. लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळं हे घडतं. हे सेलिअ‌ॅक रोग (celiac disease) आणि औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील असू शकतं. तोंडाचा कर्करोग तोंडाच्या कर्करोगाच्या बाबतीत जीभ दुखणं आणि गुठळ्या ही समस्या असू शकते. याशिवाय गिळताना आणि चघळण्यास त्रास होणं हेही तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतं. हे वाचा - OMG! 9 वर्षीय बालक करत होता अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा कोरडे तोंड तोंड कोरडं पडण्याची समस्या कोविड 19 संसर्गामुळे होऊ शकते. याशिवाय चव कमी होणं हेदेखील कोविडचं लक्षण आहे. यामुळं, तुम्हाला जिभेत वेदना जाणवू शकतील आणि अन्न चघळताना स्नायू दुखू शकतात. तोंडात जळजळ आणि तोंडात अल्सरची समस्या देखील होऊ शकते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या