मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Veg Fish Curry Recipe : श्रावणात नॉनव्हेज मिस करताय? बनवा ही टेस्टी 'व्हेज फिश करी'

Veg Fish Curry Recipe : श्रावणात नॉनव्हेज मिस करताय? बनवा ही टेस्टी 'व्हेज फिश करी'

श्रावण सुरु झाल्यावर नॉनव्हेजिटेरियन लोकांची फारच पंचाईत होते. कारण श्रावण सुरु झाला की नॉनव्हेजिटेरियन लोकही व्हेजिटेरियन होतात. संपूर्ण श्रावण महिन्यात ते नॉनव्हेज खात नाहीत.

श्रावण सुरु झाल्यावर नॉनव्हेजिटेरियन लोकांची फारच पंचाईत होते. कारण श्रावण सुरु झाला की नॉनव्हेजिटेरियन लोकही व्हेजिटेरियन होतात. संपूर्ण श्रावण महिन्यात ते नॉनव्हेज खात नाहीत.

श्रावण सुरु झाल्यावर नॉनव्हेजिटेरियन लोकांची फारच पंचाईत होते. कारण श्रावण सुरु झाला की नॉनव्हेजिटेरियन लोकही व्हेजिटेरियन होतात. संपूर्ण श्रावण महिन्यात ते नॉनव्हेज खात नाहीत.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 8 ऑगस्ट : सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावणात आपल्याकडे उपवास केले जातात. उपवासांना मग विविध पदार्थ बनवले जातात. मात्र श्रावण सुरु झाल्यावर नॉनव्हेजिटेरियन लोकांची फारच पंचाईत होते. कारण श्रावण सुरु झाला की नॉनव्हेजिटेरियन लोकही व्हेजिटेरियन होतात आणि श्रावण पाळतात. म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यात ते नॉनव्हेजिटेरियन पदार्थ खात नाहीत. मात्र आता चिंता करू नका. जर तुम्ही नॉनव्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला श्रावणाची पाळायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सुवर्णमध्य काढला आहे. आज आम्ही तुम्हाला व्हेज फिश करीची रेसिपी सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला नक्कीच नॉनव्हेज खाल्ल्याचा फील येईल. व्हेज फिश करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य - ओलं खोबरं - टोमॅटो, लिंबू - कांदा - बेसन - कच्ची केळी - लसूण - धने - बेडगी मिरची - तिखट, हळद - आवश्यकतेनुसार तेल - चवीनुसार मीठ

Vrat Recipe : सोमवारच्या उपवासासाठी बनवा मखाना बर्फी, गोड खाऊनही वाढणार नाही वजन

व्हेज फिश करी बनवण्याची पद्धत - कच्या केळीचे दोन भाग करून घ्या. एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये थोडे मीठ आणि केळीचे काप घाला. हे केळीचे काप पाण्यामध्ये 10 मिनिटे बॉईल करून घ्या. - एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, टोमॅटो, कांदा, लसूण, बेडगी मिरची, धने आणि हळद घाला. हे मिश्रण थोड्या पाण्यासह फाईन ग्राइंड करून घ्या. - त्यानंतर बॉईल केलेली केळी थंड करण्यासाठी ठेवा. ही केळी थंड झाल्यानंतर तिची साल काढून घ्या. - आता एका भांड्यात बेसन, मीठ, हिंग, हळद, तिखट, ओवा आणि पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. - नंतर या पेस्टमध्ये केळी डीप करा आणि ती केळी परत कोरड्या बेसनामध्ये घोळून घ्या. अशाप्रतकारे सर्व केळीचे काप बेसनात कोट झाल्यानंतर ते तेलात तळून घ्या.

Healthy Fries : मुलांना अनहेल्दी बटाट्याच्या फ्राईजपासून ठेवा दूर, बनवा हे दोन प्रकारचे हेल्दी आणि टेस्टी फ्राईज

- त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता आणि ग्राइंड केलेली मसाल्याची पेस्ट टाका. ही पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आणि नंतर त्यामध्ये पाणी, मीठ आणि थोडे कोकम घाला. ही ग्रेव्ही 5 मिनिटांसाठी वाफवून घ्या. - तयार ग्रेव्हीमध्ये केळीचे फ्राय केलेले काप घाला. त्यांनतर यावर कोथिंबीर घालून पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी ही करी वाफवून घ्या. अशाप्रकारे तुमची व्हेज फिश करी तयार आहे. ही करी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबतही एन्जॉय करू शकता.

First published:

Tags: Fish, Food, Lifestyle, Recipie

पुढील बातम्या