Home /News /lifestyle /

Bottle Guard : कधीच फेकणार नाही तुम्ही दुधी भोपळ्याची साल; या टेस्टी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

Bottle Guard : कधीच फेकणार नाही तुम्ही दुधी भोपळ्याची साल; या टेस्टी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

भोपळा केवळ शरीराला थंडावा देण्यापुरतीच मर्यादित नाही तर हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे आणि झोपेचे विकार कमी करण्यासही मदत करते. आज आम्ही तुम्हाला भोपळ्याच्या सालीपासून बनवता येणाऱ्या दोन पाककृती सांगणार आहोत.

  मुंबई, 19 जुलै : हिरव्या भाज्यांचे फायदे सर्वांना माहीत आहेत आणि दुधी भोपळा ज्याला सामान्यतः भोपळा म्हणतात, ही एक भाजी आहे ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत. पांढरा-फुलांचा भोपळा, कॅलबॅश, न्यू गिनी बीन, तस्मानिया बीन आणि लांब खरबूज अशा वेगवेगळ्या नावांनी हा भोपळा ओळखला जातो. ही भाजी केवळ शरीराला थंडावा देण्यापुरतीच मर्यादित नाही तर हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे आणि झोपेचे विकार कमी करण्यासही मदत करते. आपण भोपळ्याची भाजी तर बऱ्याचदा खाल्ली असेल. मात्र भोपळ्याची भाजी करताना आपण त्याची साल काढून टाकतो. टीव्ही नाईन हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, भोपळ्याच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. आज आम्ही तुम्हाला भोपळ्याच्या सालीपासून बनवता येणाऱ्या दोन पाककृती सांगणार आहोत.

  Weight Loss Tips : भूक शमवण्यासोबतच वजनही घटवा; दररोज खा हे हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स

  भोपळ्याच्या सालीपासून बनवा चवदार भाजी साहित्य : भोपळ्याच्या सालीची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला 2 कप भोपळ्याची बारीक केली साल, अर्धा चमचा जिरे, 1 टोमॅटो, 1 कांदा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, हळद, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे तेल आलं लसणाची पेस्ट लागेल. कृती : भोपळ्याच्या सालीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढई किंवा पॅनमध्ये तेल घ्या. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, कांदा आलं लसणाची पेस्ट टाकून ते चांगले परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, मीठ आणि टमाटे टाका. हे मिश्रण थोडे शिजू द्या आणि त्यानंतर त्यामध्ये भोपळ्याच्या साली टाका. यानंतर ही भाजी थोडा वेळ शिजू द्या आणि नंतर कोथिंबीर टाकून गार्निश करा. तुम्ही ही भाजी चपाती किंवा पराठ्यांसोबत खाऊ शकता. Lemon Side Effect : तुम्हाला माहित आहे का? लिंबाचे अतिसेवन ठरू शकते धोकादायक; हे आहेत दुष्परिणाम भोपळ्याच्या सालीची चटणी साहित्य : भोपळ्याच्या सालीची चटणी सोपी आणि चवीला खूप स्वादिष्ट असते. यासाठी तुम्हाला एक कप भोपळ्याची साल, अर्धा कप कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं, काळं मीठ, लिंबाचा रस, आणि लसूण लागेल. कृती : भोपळ्याच्या सालीची चटणी बनवण्यासाठी एक कप भोपळ्याची साल, अर्धा कप कोथिंबीर, थोडी पुदिन्याची पानं, काळं मीठ, आणि लसूण घ्या यावर लोम्बाचा रस पिला आणि हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्या. काही मिनीटांत तुमची भोपळ्याच्या सालीची चटणी तयार होते. ही चटणी तुम्ही भजी किंवा पराठ्यांसोबत सर्व्ह करू शकता.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Recipie

  पुढील बातम्या