मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Sweet For Rakshabandhan : अवघ्या 15 मिनिटात तयार होते ही मिठाई, रक्षाबंधनाला नक्की ट्राय करा

Sweet For Rakshabandhan : अवघ्या 15 मिनिटात तयार होते ही मिठाई, रक्षाबंधनाला नक्की ट्राय करा

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला आपल्या भावासाठी खूप काही करावेसे वाटते. त्याच्या आवडीचे पदार्थ करावेसे वाटतात. मात्र सणासुदीला आपल्याकडे काहीतरी विशेष करण्यासाठी वेळ फार कमी असतो.

  मुंबई, 11 ऑगस्ट : रक्षाबंधनाच्या दिवशी खूप घाई गडबड असते. भावाचे लाड करण्यासाठी बहिण काय काय करावं याच विचारात असते. त्यातही जेव्हा एखादा भाऊ लग्न झालेल्या बहिणीकडे खूप दिवसांनी जातो. तेव्हा त्या बहिणीला आपल्या भावासाठी खूप काही करावेसे वाटते. त्याच्या आवडीचे पदार्थ करावेसे वाटतात. मात्र सणासुदीला आपल्याकडे काहीतरी विशेष करण्यासाठी वेळ फार कमी असतो. म्हणूनच आम्ही आज तुमच्यासाठी एक झटपट आणि विशेष अशी कलाकंदची रेसिपी घेऊन आलो आहोत. याने तुमच्या भावाचे तोंड गोड करा आणि तुमच्या नात्यातील गोडवा वाढावा. अजतकने ही पनीरपासून बनवलेल्या कलाकंदची रेसिपी शेअर केली आहे. हे कलाकंद बनवणे अवघड नाही. तुम्ही घरीही सहज हे कलाकंद बनवू शकता. यासाठी तुम्‍हाला खवा किंवा साखरेच्या पाकाचीही गरज भासणार नाही आणि अवघ्या 15 मिनिटांत बनवता येईल. रक्षाबंधनाच्या खास प्रसंगी तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलेल्या कलाकंदने तुमच्या भावाचे तोंड गोड करू शकता. कलाकंद बनवण्याची पद्धत जाणून घेऊया. कलाकंद बनवण्यासाठी लागणारे साहित्य - 250 ग्रॅम पनीर - 2 टेबलस्पून साखर - 1 टीस्पून दूध पावडर - अर्धा टीस्पून वेलची पावडर - चिरलेला पिस्ता - गुलाबाच्या पाकळ्या

  Sweet Recipe : रक्षाबंधनाला बनवा ही झटपट होणारी मिठाई, भावासोबतचे क्षण होतील आणखी गोड

  कलाकंद बनवण्याची कृती - 250 ग्रॅम पनीर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. - आता कढई गरम करून त्यात २ चमचे साखर आणि पनीर घालून नीट ढवळून घ्यावे. - मध्यम आचेवर ५ मिनिटे ढवळत राहा. - आता वरून एक चमचा मिल्क पावडर घालून ढवळा. Makhana Kheer Recipe : गोड खायला आवडतं? या पद्धतीने बनवा हेल्दी आणि टेस्टी मखाना खीर - 5 मिनिटांनंतर वरून वेलची पूड घाला आणि ढवळा. - हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यावर झाल्यावर प्लेटवर पसरवा. - वरून चिरलेला पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा. - थंड झाल्यावर हे कलाकंद सर्व्ह करा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Recipie, Tasty food

  पुढील बातम्या