मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Roti Pizza Pocket Recipe : उरलेल्या पोळ्यांपासून बनवा पिझ्झा पॉकेट; मुलंही आवडीने खातील

Roti Pizza Pocket Recipe : उरलेल्या पोळ्यांपासून बनवा पिझ्झा पॉकेट; मुलंही आवडीने खातील

पोळी पिझ्झा पॉकेट बनवायला जास्त वेळ लागत नाही. यामध्ये उरलेल्या पोळ्यांचा वापर करता येतो. आपण त्यात आवडत्या भाज्या घालू शकता. मुलांनाही हे खूप आवडेल.

पोळी पिझ्झा पॉकेट बनवायला जास्त वेळ लागत नाही. यामध्ये उरलेल्या पोळ्यांचा वापर करता येतो. आपण त्यात आवडत्या भाज्या घालू शकता. मुलांनाही हे खूप आवडेल.

पोळी पिझ्झा पॉकेट बनवायला जास्त वेळ लागत नाही. यामध्ये उरलेल्या पोळ्यांचा वापर करता येतो. आपण त्यात आवडत्या भाज्या घालू शकता. मुलांनाही हे खूप आवडेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 4 डिसेंबर : बऱ्याचदा स्वयंपाकात आपल्याकडून पोळ्या जास्त होतात आणि मग त्या उरतात. बरेच जण दुसऱ्या दिवशी उरलेल्या पोळ्या फेकून देतात. तुमच्यासोबतही असे अनेकदा होत असेल तर तुम्ही त्या पोळ्यांचा नाश्त्यासाठी वापर करू शकता. लोफ्टओव्हर चपातीसोबत तुम्ही एक मजेदार आणि चविष्ट नाश्ता बनवू शकता. रोटी पिझ्झा पॉकेट असे या डिशचे नाव आहे.

रोटी पिझ्झा पॉकेट्स बनवायला जास्त वेळ लागत नाही. यामध्ये उरलेल्या पोळ्यांचा वापर करता येईल. तसेच आपण त्यात आवडत्या भाज्या घालू शकता. मुलांनाही हे खूप आवडेल. त्यासाठी पोळ्या, बारीक चिरलेल्या भाज्यांसह काही गोष्टींची व्यवस्था करा. रोटी पिझ्झा पॉकेटच्या रेसिपीचा व्हिडिओ @foodisygwalior या युजरनेमने बनवलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया बनवण्याची सोपी पद्धत.

Breakfast Recipe : अगदी कमी वेळेत बनवा आणि 20 दिवस खा; पाहा डाळ कचोरीची भन्नाट रेसिपी

रोटी पिझ्झा पॉकेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उरलेल्या पोळ्या

बारीक चिरलेला कांदा

बारीक चिरलेला टोमॅटो

बारीक चिरलेली शिमला मिरची

एका पिझ्झा पॉकेटसाठी 4-5 चमचे स्वीट कॉर्न

चीज

मॅरीनेट केलेल्या भाज्या

रोटी पिझ्झा पॉकेट्स बनवण्याची कृती

- सर्व प्रथम एक पोळी घ्या आणि त्याच्या कडा पकडून टूथपिकच्या मदतीने चौकोनी वाटीचा आकार द्या. त्यात टोमॅटो केचप टाका आणि मेयोनेझदेखील पसरवा.

- त्यात बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो आणि मॅरीनेट केलेल्या भाज्या घाला. आता त्यात स्वीट कॉर्न आणि चीज घाला. यानंतर मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटे बेक करा.

Breakfast Recipe Video : चहापासून बनवा बिस्कीट; रविवारी ब्रेकफास्टला नक्की ट्राय करा ही भन्नाट रेसिपी

- तुम्ही त्यात काळी मिरी, मीठ, चिली फ्लेक्स वगैरे टाकू शकता. यामध्ये तुम्ही पिझ्झा सॉसदेखील वापरू शकता. ही डिश एकदा जरूर ट्राय करा. तुम्ही त्यात बटरही टाकू शकता. भाज्या मॅरीनेट करण्यासाठी तुम्ही केचप, मिरची आणि मीठ वापरू शकता. त्यात ओरेगॅनोही टाकता येईल. त्यामुळे याची चव आणखी वाढेल.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Recipie