मुंबई, 27 जानेवारी : नूडल्स खायला कोणाला आवडत नाही. सर्वांची आवडती चायनीज डिश म्हणजे नूडल्स. 6 ऑक्टोबरला नूडल्स डे साजरा केला जातो. नूडल्स हे स्ट्रीट फूड म्हणून ओळखले जाते. मात्र बाहेरचे अन्न खाणे आपण आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही टाळलेच पाहिजे. नूडल्स अनेक प्रकारे तयार केले जातात. पण हेच नूडल्स जर घरी बनवले आणि त्यातही काही हेल्दी पदार्थ टाकून ते बनवले तर त्याची मजाच वेगळी येईल.
असाच नूडल्सचा एक हेल्दी प्रकार म्हणजे मशरूम नूडल्स. हे मशरूम नूडल्स केवळ चवीनेच परिपूर्ण नसतात, तर मशरूममध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे शरीरासाठी सामान्यतः हानिकारक मानल्या जाणार्या नूडल्सची ही रेसिपी आरोग्यासाठी चांगली ठरते. कारण मशरूममध्ये फायबर, व्हिटॅमिनसह अनेक पोषक तत्व असतात.
Breakfast Recipe : सकाळच्या धावपळीत नाश्त्यासाठी बनवा याप्रकारचे Quick And Healthy डोसे
मुलांना नूडल्स खूप आवडतात. जर तुम्हाला त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यायची असेल पण त्यांचे मनही मोडायचे नसेल तर तुम्ही त्यांना मशरूम नूडल्स बनवून खाऊ घालू शकता. ही रेसिपी केवळ त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी पुरेशी नाही तर त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे.
मशरूम नूडल्ससाठी लागणारे साहित्य
नूडल्स - 1 पॅकेट
चिरलेले मशरूम - 1/2 कप
चिरलेले मिक्स व्हेज - 1 कप
किसलेले आले - 1/2 टीस्पून
चिरलेला कांदा - 1
चिरलेला लसूण - 1 टीस्पून
काळी मिरी - 1/2 टीस्पून
टोमॅटो सॉस - 1 टीस्पून
सोया सॉस - 1/2 टीस्पून
चिली सॉस - 1/4 टीस्पून
व्हिनेगर - 1/4 टीस्पून
तेल - 3 टीस्पून
मीठ - चवीनुसार
मशरूम नूडल्स बनवण्याची कृती
मशरूम नूडल्स बनवण्यासाठी प्रथम नूडल्सचे एक पॅकेट घ्या आणि ते पाण्यात टाकून उकळा. यानंतर नूडल्सचे पाणी चाळणीतून काढून बाजूला ठेवा. यानंतर मशरूम, लसूण आणि कांदे यांचे तुकडे करा. आता एका कढईत १ टीस्पून तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेला मशरूम घालून तळून घ्या. 1-2 मिनिटे परतून घेतल्यावर त्यात काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि थोडा वेळ शिजल्यानंतर गॅस बंद करा.
आता भांडे घ्या आणि त्यात 2 चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि मिक्स्ड व्हेज (तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता) घालून तळून घ्या. 1-2 मिनिटे भाजल्यानंतर त्यात उकडलेले नूडल्स टाका आणि चमच्याच्या मदतीने हळूहळू मिक्स करा.
Jilebi Recipe : दसऱ्याला फक्त 15 मिनिटांत घरीच बनवा रसरशीत, कुरकुरीत जिलेबी; ही आहे सोपी रेसिपी
यानंतर वर चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घालून मिक्स करा. आता या मिश्रणात तळलेले मशरूम घाला आणि चवीनुसार मीठ घाला. काही मिनिटे शिजल्यानंतर त्यात व्हिनेगर घालून गॅस बंद करा. तुमचे स्वादिष्ट आणि हेल्दी मशरूम नूडल्स तयार आहेत. ते नाश्त्यात किंवा दिवसभरात केव्हाही खाल्ले जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Recipie