मुंबई, 5 फेब्रुवारी : पराठा हा नाश्त्यातील एक सामान्य पदार्थ आहे. बहुतेक घरांमध्ये नाश्त्यासाठी पराठे बनवले जातात. कधी साधे पराठे तर कधी बटाट्याचे पराठे, कोबीचे पराठे, पनीर पराठे असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला मसाला पराठा कसा बनवायचा ते सांगणार आहोत. हा चविष्ट मसाला पराठा बनवणे अगदी सोपे आहे. जर तुम्हाला रोज तोच नाश्ता करण्याचा कंटाळा आला असेल आणि पराठ्याच्या विविध प्रकारांमध्ये काहीतरी वेगळे करून पाहायचे असेल तर मसाला पराठा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
मसाला पराठा फार कमी वेळात तयार करता येतो आणि मुलांनाही त्याची चव आवडेल. जर तुम्ही मसाला पराठ्याची रेसिपी कधीच ट्राय केली नसेल. तर तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीनं एकदा हा मसाला पराठा नक्की बनवून पाहा.
Lemon Side Effect : तुम्हाला माहित आहे का? लिंबाचे अतिसेवन ठरू शकते धोकादायक; हे आहेत दुष्परिणाम
मसाला पराठ्यासाठी लागणारे साहित्य
मैदा - १ कप
बेसन - १ कप
जिरे - १/२ टीस्पून
ओवा - 1 टीस्पून
आले पेस्ट - 1 टीस्पून
लाल तिखट - 1 टीस्पून
हिंग - १ चिमूटभर
कसुरी मेथी - 1 टीस्पून
कोथिंबीर चिरलेली - २ चमचे
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
मसाला पराठा कसा बनवायचा
मसाला पराठा बनवण्यासाठी प्रथम एका प्लेट किंवा मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये पीठ आणि बेसन चाळून घ्या. यानंतर हे दोन्ही घटक चांगले मिसळा. यानंतर त्यात लाल तिखट, जिरे, ओवा, हिंग, कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व व्यवस्थित मिसळा. पराठे कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तेल घालून मिक्स करा. आता थोडे पाणी घालून पराठ्याचे पीठ मळून घ्या आणि ते अर्धा तास झाकून ठेवा.
अर्ध्या तासानंतर पीठ घेऊन आणखी एकदा मळून घ्या. यानंतर पिठाचे गोळे तयार करा. आता नॉनस्टिक तवा/पॅन घ्या आणि गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम होईपर्यंत एक गोळा घ्या आणि गोल किंवा त्रिकोणी पराठा लाटून घ्या. आता तव्यावर थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा. यानंतर त्यावर पराठा टाकून भाजून घ्या.
वैवाहिक आयुष्यात आनंद आणि उत्साह टिकवून ठेवण्यासाठी पुरुषांनी जरूर खावी वेलची, वाचा फायदे
साधारण 1 मिनिट भाजल्यानंतर पराठा उलटा करून दुसरीकडे तेल लावून भाजून घ्या. पराठा दोन्ही बाजूंनी चांगला सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यानंतर एका प्लेटमध्ये पराठा वेगळा काढा. तसेच सर्व पिठाचे गोळे लाटून भाजून घ्या. नाश्त्यासाठी चविष्ट मसाला पराठा तयार आहे. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर हा पराठा सर्व्ह करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health Tips, Lifestyle, Recipie