मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Vrat Recipe : सोमवारच्या उपवासासाठी बनवा मखाना बर्फी, गोड खाऊनही वाढणार नाही वजन

Vrat Recipe : सोमवारच्या उपवासासाठी बनवा मखाना बर्फी, गोड खाऊनही वाढणार नाही वजन

उपवासाला आपल्याकडे खूप विविध पदार्थ आणि फळांचेही सेवन करतात. मात्र उपवासाच्या काळात आपल्याला गोड इच्छा होते अशावेळी एखादी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो.

  मुंबई, 8 ऑगस्ट : सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि महादेवाचे भक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास करतात. उपवासाला आपल्याकडे खूप विविध पदार्थ बनवले जातात. त्याचसोबत लोक स्वत:ला ऊर्जावान आणि फिट ठेवण्यासाठी फळांचेही सेवन करतात. मात्र उपवासाच्या काळात आपल्याला गोड इच्छा होते अशावेळी एखादी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी पौष्टिक आणि चविष्ट अशी मखाना बर्फीची रेसिपी घेऊन आलो आहोत. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मखाना आपल्या आरोग्यासाठी तर चांगले असतेच त्याचबरोबर मखाना खाल्यामुळे जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि आपण जास्त खाणे टाळतो म्हणून वजनदेखील नियंत्रणात राहते. चला तर मग जाणून घेऊया ही हेल्दी आणि टेस्टी मखाना बर्फी कशी बनवायची. मखाना बर्फीचे साहित्य - 100 ग्रॅम मखाना - 5 वेलची - एक वाटी नारळ पावडर - एक वाटी शेंगदाणे - एक पाकीट दूध पावडर - 300 ग्रॅम दूध - अर्धी वाटी साखर Healthy Fries : मुलांना अनहेल्दी बटाट्याच्या फ्राईजपासून ठेवा दूर, बनवा हे दोन प्रकारचे हेल्दी आणि टेस्टी फ्राईज मखना बर्फी बनवण्याची कृती - हेल्दी मखाना बर्फी बनवण्यासाठी प्रथम नॉन-स्टिक पॅनमध्ये मखाना भाजून घ्या. यानंतर त्यात शेंगदाणे घालून 5 मिनिटे परतून घ्या. - आता परतलेले मखाना आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. - यानंतर दुसर्‍या पातेल्यात दूध आणि साखर टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि ते उकळल्यावर त्यात बारीक केले मिश्रण घाला. सोबतच त्यात मिल्क पावडर टाका.

  Makhana Kheer Recipe : गोड खायला आवडतं? या पद्धतीने बनवा हेल्दी आणि टेस्टी मखाना खीर

  - सर्व गोष्टी एकत्र केल्यावर मिश्रण नीट ढवळून घ्या म्हणजे तळाला चिकटणार नाही. आता ते एका प्लेटमध्ये काढा आणि सेट करण्यासाठी थोडा वेळ ठेवा.                          - मिश्रण थोडा घट्ट झाल्यावर म्हणजेच गोठल्यावर बर्फीच्या आकारात कापून घ्या आणि त्यावर थोडे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घाला. अशाप्रकारे तुमची हेल्दी आणि टेस्टी मखाना बर्फी तयार आहे.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Recipie, Shravan

  पुढील बातम्या