मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Kitchen tips in marathi : नवरात्रीत उपवास करताय? मग साबुदाणा खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Kitchen tips in marathi : नवरात्रीत उपवास करताय? मग साबुदाणा खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

काही वेळा साबुदाणा दिसायला तर चांगला असतो परंतु तो आतून पोकळ असु शकतो. तुम्ही व्यवस्थित पाहून साबुदाणा खरेदी केला नाही तर तुम्हाला निरुपयोगी खराब दर्जाचा साबुदाणा मिळू शकतो.

काही वेळा साबुदाणा दिसायला तर चांगला असतो परंतु तो आतून पोकळ असु शकतो. तुम्ही व्यवस्थित पाहून साबुदाणा खरेदी केला नाही तर तुम्हाला निरुपयोगी खराब दर्जाचा साबुदाणा मिळू शकतो.

काही वेळा साबुदाणा दिसायला तर चांगला असतो परंतु तो आतून पोकळ असु शकतो. तुम्ही व्यवस्थित पाहून साबुदाणा खरेदी केला नाही तर तुम्हाला निरुपयोगी खराब दर्जाचा साबुदाणा मिळू शकतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 27 सप्टेंबर : नवरात्रोत्सव काही दिवसांवर आला आहे. नवरात्रीत अनेक जण उपवास करतात आणि उपवासात प्रामुख्याने साबुदाणा खाल्ला जातो. हिंदू धर्मात उपवासाला खूप महत्त्व आहे. सणांव्यतिरिक्त देखील काही विशिष्ट वारी लोक आपापल्या धार्मिक मान्यतांनुसार उपवास करतात. या दिवशी देखील साबुदाणा खाल्ला जातो. परंतु धार्मिक उत्सवांच्या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात साबुदाणा विकायला येतो. साबुदाणा खायला तर चवदार असतोच शिवाय तो आरोग्यासाठी देखील खूप लाभदायक असतो असे मानले जाते. परंतु बाजारातून साबुदाणा खरेदी करताना काही काळजी घेणे आवश्यक असते.

बाजारत वेगवेगळ्या दार्चाचा साबुदाणा मिळतो. त्यामुळे त्यातील चांगल्या दर्जाचा साबुदाणा निवडणे महत्त्वाचे असते. त्यासाठी काही गोष्टी लक्ष्यात ठेवणे महत्त्वाचे आहे. काही वेळा साबुदाणा दिसायला तर चांगला असतो परंतु तो आतून पोकळ असु शकतो. तुम्ही व्यवस्थित पाहून साबुदाणा खरेदी केला नाही तर तुम्हाला निरुपयोगी खराब दर्जाचा साबुदाणा मिळू शकतो. त्यामुळे बाजारातून साबुदाणा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Navratri Recipe : नवरात्रीमध्ये उपवासासाठी बनवा थालीपीठ, पाहा सोपी रेसिपी VIDEO

तुम्ही जेव्हा केव्हा बाजारात साबुदाणा खरेदी करण्यासाटी जाल, तेव्हा साबुदाण्याचा रंग, त्याचा पोत आणि त्यातील स्वच्छता याकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि निरखून घ्या. अतिशय योग असलेला साबुदाणा ओळखणे अवघड असले तरी काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही किमान खराब साबुदाणा विकत घेणे टाळू शकता.

साबुदाणा खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

रंग तपासा : साबुदाण्याचा नैसर्गिक रंग हा पांढरा असतो. परंतु साबुदाण्यांचा रंग पांढरा आणि फिकट पिवळा असेल तो चांगला असतो काही लोकांचा असा समज असतो, मात्र तो चुकीचा आहे. तुम्हीही असेच समजून पिवळसर दिसणारा साबुदाणा विकत घेत असाल तर हे लक्षात घ्या की त्यात कृत्रिम रंग वापरलेला असू शकतो आणि तो तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

आकार तपासा : साबुदाणा खरेदी करताना त्याच्या रंगासोबत त्याचा आकारही व्यवस्थित पाहून घ्यावा. कारण लहान आणि मोठ्या आकाराचा अशा दोन्ही प्रकारचा साबुदाणा बाजारात उपलब्ध असतो. परंतु तुम्ही साबुदाणा विकत घेताना नेहमी मोठ्या आकाराचा, शाबूत आणि मोत्यासारखा दिसणारा साबुदाणा विकत घ्या. कारण तो तुटलेले किंवा फुटलेला असेल तर त्यामुळे तुमच्या पदार्थांची चव बिघडू शकते.

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये देवीला दाखवा चंपाकळीचा खास नैवेद्य, जाणून घ्या रेसिपी VIDEO

फरक समजून घ्या : बाजारात नायलॉनचा आणि छोट्या आकाराचा अशा दोन्ही प्रकारचा साबुदणा उपलब्ध असतो. नायलॉनचा साबुदाणा प्रामुख्याने वडे बनवण्यासाठी वापरला जातो, तर छोट्या आकाराचा साबुदाणा खीर बनवण्यासाठी किंवा उसळ बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे साबुदाना खरेदी करताना त्यातील फरक समजून घ्या आणि तुमच्या गरजेनुसार साबुदाणा खरेदी करा.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Navratri