मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Video: जयंत पाटलांच्या हाती 'लाल परी'चं स्टेअरीगं, इस्लामपुरात चालवली 'विठाई'

Video: जयंत पाटलांच्या हाती 'लाल परी'चं स्टेअरीगं, इस्लामपुरात चालवली 'विठाई'

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना माजी मंत्री जयंत पाटीय यांनी थेट एसटी बसचं स्टेअरिंग हाती घेत वाहन चालवल्याने इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला.

    असिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 15 ऑगस्ट : काही महिन्यांपूर्वी राज्याची सत्ता चालवणारी महाविकासआघाडी सध्या विरोधकांच्या भूमिकेत आहेत. सध्या सत्ता चालवत नसले तरी एसटी चालवण्याचा अनुभव मात्र माजी मंत्र्यांनी घेतला आहे. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट एसटीच्या स्टेअरींगवर बसत वाहन चालवण्याचा अनुभव घेतला. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगारामध्ये जाऊन एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर थेट एसटीचं स्टेअरिंग हातात घेऊन फेरफटका देखील मारला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माजी मंत्री जयंत पाटीय यांनी घेतला एसटी चालवण्याचा अनुभव एसटीच्या ड्रायव्हर सीटवर माजी मंत्री जयंत पाटलांनी बसत स्टेरिंग हातात घेऊन एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. यावेळी एसटी चालकांसोबत संवाद देखील साधला. इस्लामपूर आगारमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी येथील एसटी कर्मचाऱ्यांशी जयंत पाटलांनी संवाद साधला. त्यांच्याकडून असणाऱ्या अडचणी समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर एसटीचीही माहिती घेत थेट एसटी बस चालवली. ड्रायव्हर सीटवर बसून जयंत पाटलांनी एसटीचे चालक म्हणून एसटी चालवण्याचा अनुभव घेतला. इस्लामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून जयंत पाटलांनी एसटी चालवली. खुद्द माजी मंत्री एसटी चालवत असल्याचं पाहून अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात त्यांना कैद केलं. दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना असलेला उत्साह आणि  त्यातच जयंत पाटलांनी पकडलेलं एसटीचं स्टेअरिंग यामुळे इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला. आगारातील एसटी गाड्याही आज दिमाखात सजल्या आहेत. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या या लालपरीचे महाराष्ट्राच्या दळणवळणात मोलाचे आणि महत्त्वाचे योगदान असल्याचंही पाटील यांनी यावेळी म्हटलं.
    Published by:Rahul Punde
    First published:

    पुढील बातम्या