मुंबई, 21 जानेवारी : हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जातात. हिवाळ्यात हिरव्या भाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हिवाळ्यात मटार अगदी ताजे मिळते. मटार चवीने अतिशय स्वादिष्ट असते. अनेक भाज्यांमध्ये आणि कबाबमध्ये तुम्ही मटार वापरू शकता. मटार आरोग्यासाठी फायदेशीर असतेच परंतु त्याची साल देखील अतिशय चवदार असते.
मटारची साल देखील त्याच्यासारखीच गोड असते. या सालीची भाजीही केली जाते. तुम्ही कधी मटारच्या सालीची भाजी खाल्ली नसेल तर आज आम्ही तुम्हाला येथे त्याची रेसिपी सांगत आहोत.
आता लहान मुलंही आवडीने खातील पालक, असा बनवा हेल्दी ब्रेकफास्ट
मटारच्या सालीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
हिरव्या मटारच्या 20 ते 25 साली, मध्यम आकाराचे सोललेले 2 बटाटे, तेल 2 चमचे, जिरे अर्धा चमचा, मध्यम आकाराचे चिरलेला 2 कांदे, चवीनुसार मीठ, हळद 1/4 टीस्पून, आले-लसणाची पेस्ट 1 चमचा, मध्यम टोमॅटो 1, धने पावडर 1 चमचा, लाल तिखट अर्था चमचा, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, ज्युलियन आले,
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.