मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Red sauce pasta recipe : गॅस नाहीये, नो वरी! फक्त इलेक्ट्रिक केटलमध्ये झटपट बनवा रेड सॉस पास्ता; जाणून घ्या चविष्ट रेसिपी

Red sauce pasta recipe : गॅस नाहीये, नो वरी! फक्त इलेक्ट्रिक केटलमध्ये झटपट बनवा रेड सॉस पास्ता; जाणून घ्या चविष्ट रेसिपी

आजकाल बऱ्याच जणांना घरापासून दूर एकटं राहण्याची वेळ येते. तेव्हा रोज बाहेरचं जेवण जेऊन आपण कंटाळून जातो. पण घरी तयार करायचं म्हटलं तर त्याला बरंच साहित्य आणि महत्वाचं म्हणजे गॅस शेगडी आवश्यक असते. पण अशीही एक अतिशय फॅन्सी रेसिपी आहे. जी तुम्ही कमी साहित्यात आणि इलेक्ट्रिक केतलमध्ये बनवू शकता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 31 ऑगस्ट : तुम्ही सिंगल आहात का, की घरापासून दूर एकटे राहत आहात. असं असेल तर तुम्ही रोज मेसचं किंवा तेच तेच बाहेरचं जेवण जेऊन नक्कीच कंटाळले असाल. त्यावर मी आज तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगणार आहे. एक मस्त रेसिपी जी तुमचं तुम्ही सहजपणे बनवून खाऊ शकता. जी खाल्यावर तुम्हाला घरचं जेवण जेवल्याचा फील येईल. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला गॅस किंवा इंडक्शन असण्याची देखील काही गरज नाही. बाहेर राहणाऱ्यांकडे इतर काही नसलं तरी इलेक्ट्रिक केटल किंवा टी मेकर हमखास असतंच. फक्त इलेक्ट्रिक केटल मध्ये आणि कमीतकमी साधनात ही रेसिपी बनवून तयार होते. इतकी सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया हा स्वस्त आणि मस्त पदार्थ काय आहे.

आज आपण जाणून घेणार आहोत ती सिंपल रेसिपी आहे पास्ता. हा पास्ता आजकाल सगळ्यांचा फेव्हरेट आहे. रेस्टॉरंट मध्ये गेलं की आपण हमखास पास्ता मागवतो. नंतर त्याचं भरमसाठ बिल देखील भरतो. पण हाच पास्ता घरी कमीतकमी साहित्यात बनवता आला तर त्याची मजा काही औरच असणार. पास्ता हा मूळ इटलीतील पदार्थ असला तरी आपण भारतीयांनी त्याला एक देसी रूप दिलेलं आहे. आज आपण हाच देसी फ्लेवरचा रेड सॉस पास्ता इलेक्ट्रिक केटल मध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत.

(मास्टरशेफ पंकज भदौरिया सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसाठी अनेक रेसिपीज शेअर करत असतात. त्यांनी सांगितलेली रेड सॉस पास्ताची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.)

या रेसिपी साठी सर्वात पहिले तुमच्याकडे केटल असणं  आवश्यक आहे. तुम्हाला आवडेल तो कच्चा पास्ता घ्या. जेवढा पास्ता तेवढंच पाणी घ्या. आधी पाणी गरम करून घ्या आणि त्यात पास्ता घाला. त्याचबरोबर 1 चमचा पास्ता सॉस, चवीनुसार मीठ आणि थोडे बटर घाला आणि मिक्स करा. यानंतर 3 ते 4 मिनिटे त्याला चांगले उकळून घ्या. तुम्हाला दिसेल की पास्ता थोडा मऊ झालेला असेल तसच सॉस देखील घट्ट झाला असेल.

यानंतर केटलीमध्ये चिरलेली सिमला मिरची सोबत आवडत असेल तर २ चमचे टोमॅटो प्युरी, 2 चमचे  दूध, १/२ चमचा ओरेगॅनो आणि चिली  फ्लेक्स घालून सर्व मिक्स करा. त्यानंतर त्याला अगदी 1 मिनिट उकळी येऊ द्या आणि केटल बंद करा. गरमागरम पास्ता सर्व्ह करा. अशाप्रकारे फक्त 15 मिनिटाच्या आत तुमचा रेड सॉस पास्ता मस्तपैकी बनून तयार होतो.

आहे की नाही एकदम सोप्पी पण चवदार रेसिपी. आता वाचत काय बसला आहात. आताच ही रेसिपी तयार करून पाहा. आणि चविष्ट रेड सॉस पास्त्याचा आनंद घ्या.

First published:

Tags: Digital prime time, Ganesh chaturthi