मुंबई, 24 डिसेंबर : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. ख्रिसमसला एक पारंपरिक रेसिपी बनवली जाते ती म्हणजे प्लम केक. इतर गोड पदार्थांसोबत या प्लम केकला ख्रिसमसला खूप महत्व आहे. आज आम्ही तुम्हाला या प्लम केकची रेसिपी सांगणार आहोत. हा केक बनवायला अगदी सोपा आहे आणि तुम्ही ख्रिसमसला अगदी सहज हा केक बनवू शकता.
हा केक बनवण्यासाठी बहुतेक फळे आणि ड्राय फ्रुट अल्कोहोलमध्ये भिजवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला विना अंडी आणि विना अल्कोहोलचा प्लम केक कसा बनवायचा हे सांगणार आहोत. केक बनवण्यासाठी फळं आणि ड्राय फ्रुट भिजवणे खूप महत्वाचे असते. आज आपण हे भिजवण्यासाठी अल्कोहोल ऐवजी द्राक्षांचा रस वापरणार आहोत.
Roti Pizza Pocket Recipe : उरलेल्या पोळ्यांपासून बनवा पिझ्झा पॉकेट; मुलंही आवडीने खातील
प्लम केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
खजूर - 100 gm
मनुके - 100 gm
ग्रीन टुटी फ्रुटी - 50 gm
रेड टुटी फ्रुटी - 50 gm
मिक्स्ड बेरी - 200 gm
ऍप्रिकॉट - 50 gm
ग्रेप ज्यूस (द्राक्षाचा रस) - 200 ml
बटर - 250 gm
ब्राऊन शुगर - 300 gm
तेल - 50 gm
दही - 130 gm
मैदा 300 gm
बदाम पावडर - 50 gm
बेकिंग सोडा- 1/4 टीस्पून
बेकिंग पावडर - 1 तीपासून
मीठ - 1/4 टीस्पून
लवंगाची पूड - 1/4 टीस्पून
दालचिनी पावडर - 1/4 टीस्पून
पिस्ता - 2 टेबलस्पून
चेरी - 2 टेबलस्पून
काजू - 2 टेबलस्पून
Breakfast Recipe : अगदी कमी वेळेत बनवा आणि 20 दिवस खा; पाहा डाळ कचोरीची भन्नाट रेसिपी
प्लम केक बनवण्याची कृती
- एका भांड्यात खजूर, मनुके, ग्रीन टुटी फ्रुटी, रेड टुटी फ्रुटी, मिक्स्ड बेरी, ऍप्रिकॉट हे सर्व घेऊन त्यामध्ये ग्रेप ज्यूस (द्राक्षाचा रस) टाका आणि व्यवस्थित मिक्स करा.
- मिक्स केल्यानंतर हे मिश्रण भिजण्यासाठी 8 तास झाकून ठेवा.
- 8 तासानंतर हे मिश्रण व्यवस्थित भिजेल म्हणजेच सर्व द्राक्षाचा रस शोषून घेऊन आणि सर्व ड्राय फ्रुट्स खूप रसदार होतील.
- त्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये बटर आणि ब्राऊन शुगर घेऊन ते बिटरच्या साहाय्याने व्यवस्थित बिट करा.
- यानंतर त्यात तेल आणि दही घालून पुन्हा चांगले बिट करून घ्या. मग ते मिश्रण छान क्रिमी होईल.
- त्यानंतर या मिश्रणात मैदा, बदाम पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, लवंगाची पूड, दालचिनी पावडर टाका.
- हे मिश्रण आता मिक्स अँड फोल्ड मेथडच्या साहाय्याने एकत्र करा.
- मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले ड्राय फ्रुट्स, पिस्ता, चेरी आणि काजू घालून मिक्स करा.
- त्यानंतर केक टिन घेऊन त्याला बटर आणि मैदा लावून किंवा त्यामध्ये बटर पेपर टाका.
- नंतर हे मिश्रण केक टिनमध्ये टाकून त्याला दोनदा टॅप करा.
- केक टिन मायक्रोवेव्हमध्ये 160 डिग्री सेल्सियसवर दीड तास बेक करा.
- त्यानंतर एका पॅनमध्ये थोडी चेरी, साखर आणि एक कप पाणी टाकून उकळा.
- आता केकमध्ये टूथपिक अनेक ठिकाणी टोचून घ्या आणि त्यावर तयार केलेले चेरी सिरप टाका आणि एका तासानंतर तुमचा टेस्टी-ज्युसी प्लम केक खाण्यासाठी तयार होईल.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.