मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Breakfast Recipe : सकाळच्या धावपळीत नाश्त्यासाठी बनवा याप्रकारचे Quick And Healthy डोसे

Breakfast Recipe : सकाळच्या धावपळीत नाश्त्यासाठी बनवा याप्रकारचे Quick And Healthy डोसे

नाश्त्यासाठी पौष्टिक रेसिपी

नाश्त्यासाठी पौष्टिक रेसिपी

आपण अशा पदार्थांच्या शोधात असतो जो टेस्टी सुद्धा असेल आणि हेल्दी सुद्धा. जेणेकरून मुलं तोंड वाकडं न करता ते खातील.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 18 ऑगस्ट : रोज सकाळी आपल्यासमोर मोठ्या प्रश्न असतो तो म्हणजे नाश्त्यासाठी काय करावं. विशेषतः आपण अशा पदार्थांच्या शोधात असतो जो टेस्टी सुद्धा असेल आणि हेल्दी सुद्धा. जेणेकरून मुलं तोंड वाकडं न करता ते खातील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही कमी वेळेत बनवू शकता आणि हे पदार्थ मुलंदेखील आवडीने खातील. बेसन डोसा साहित्य : 1 कप बेसन, 1 कांदा, 1 चिमूट हळद, ½ टीस्पून ओवा, 1 हिरवी मिरची, 1 टीस्पून आले लसूण पेस्ट, 2 चमचे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. कृती : एका भांड्यात थोडे बेसन आणि मीठ घ्या. त्यात. बारीक चिरलेला कांदा, हळद, ओवा, हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीर टाका. मिश्रण एकत्र करा आणि नंतर पाणी घालून त्याचे बॅटर तयार करून घ्या. आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला आणि आणि त्याचे मऊ बॅटर तयार करून घ्या. नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर तेलाचे काही थेंब टाका आणि यापैकी थोडे बॅटर घालून त्याचे डोसे बनवून घ्या

Banana Peel Benefits : केळीच्या सालीचे हे अद्भुत फायदे माहितीयेत? कॅन्सरसह अनेक समस्यांपासून करते बचाव

ज्वारीचे डोसे साहित्य : 1 कप ज्वारीचे पीठ, ½ कप दही, ½ कांदा, ½ टोमॅटो, ½ सिमला मिरची, ½ टीस्पून धणे पूड, ½ टीस्पून कोरडी कैरी पावडर, ¼ टीस्पून गरम मसाला पावडर, 2 चमचे धणे आणि चवीनुसार मीठ. कृती एका भांड्यात ज्वारीचे पीठ, मसाला आणि मीठ घाला. दही घालून मिक्स करा. त्यानंतर थोडे पाणी घाला आणि घट्ट पिठ तयार करा. आता कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. पिठात भाज्या घाला. यानंतर पुन्हा यात थोडे पाणी घाला आणि माध्यम असे बॅटर तयार करून घ्या, जे जास्त घट्टही नसेल आणि पातळही. त्यानंतर नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. तव्यावर हे मिश्रण घाला आणि त्याला गोल आकार द्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी ठिपके दिसेपर्यंत शिजवा आणि सर्व्ह करा. Diabetic : ही फळं हेल्दी असली तरी मधुमेह असणाऱ्यांनी खाऊ नयेत; वाढते ब्लड शुगर मूगडाळीचा डोसा साहित्य : 1 वाटी पिवळी मूग डाळ, 1 इंच आले, 1 हिरवी मिरची, 2 लसूण पाकळ्या, 1 कांदा, 1 चिमूट हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. कृती : मूग डाळ धुवून 3-4 तास भिजत घालावी. किंवा तुम्ही रात्रभर ही डाळ भिजवून ठेवू शकता. पाणी काढून टाका आणि ब्लेंडरमध्ये डाळ घाला. तसेच आले, लसूण पाकळ्या, हिरवी मिरची घालावी. ¼ कप पाणी घाला आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा. हे मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात मीठ, हळद, तिखट, गरम मसाला आणि बारीक चिरलेला कांदा घाला. पाणी घालून याचे चांगले बॅटर तयार करून घ्या. नॉन-स्टिक तव्याला तेलाने ग्रीस करून त्यावर हे बॅटर टाकून पसरवा आणि सोनेरी तपकिरी ठिपके दिसेपर्यंत दोन्ही बाजूंनी शिजवा.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Recipie

पुढील बातम्या