मुंबई, 31 डिसेंबर : तुम्ही पिझ्झा खाण्याचे शौकीन असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. अनेक वेळा लोक पिझ्झा बेस आणि इतर साहित्य आणून घरीच पिझ्झा बनवतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंते अनेकांना पिझ्झा खायला आवडतो. परंतु तो दररोज खाणे आरोग्यासाठी चांगले नसते. कारण पिझ्झा बेस मैद्यापासून बनलेला असतो आणि त्यात भरपूर चीज टाकले जाते.
तुम्हाला पिझ्झा खायचा असेल तर तुम्ही घरी वेगवेगळ्या रेसिपी वापरून चांगला आणि फ्रेश पिझ्झा खाऊ शकता. यात तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ घालून अगदी सहज बनवू शकता. यासाठी तुम्हाला पिझ्झा बेस खरेदी करण्याचीही गरज भासणार नाही. खरं तर आम्ही जी पिझ्झाची रेसिपी सांगत आहोत ती ब्रेडपासून बनवली जाते. या पिझ्झाच्या रेसिपीचे नाव पॉकेट पिझ्झा आहे. ही रेसिपी इन्स्टाग्रामवर (@jyotiz_kitchen) या युजरनेमने शेअर केली आहे. जाणून घेऊया पॉकेट पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि बनवण्याची पद्धत.
Kebab Recipe : वेट लॉसदरम्यान नाश्त्यासाठी रेसिपी शोधताय? बनवा हे टेस्टी-हेल्दी व्हीगन कबाब
पॉकेट पिझ्झा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
ब्रेड- 2 स्लाइस
मोजरेला चीज
गाजर- 1 छोटा चमचा बारीक चिरलेले.
मटर- 1 छोटा चमचा
पिवळी शिमला मिर्ची- 1 छोटा चमचा बारीक चिरलेली
हिरवी शिमला मिर्ची- 1 छोटा चमचा बारीक चिरलेली
लाल शिमला मिर्ची- 1 छोटा चमचा बारीक चिरलेली
स्वीट कॉर्न- 1 छोटा चमचा
शेजवान चटणी
रेड चिली फ्लेक्स
मिक्स हर्ब्स
मेयोनीज
अमचूर पाउडर
चवीनुसार मीठ
पॉकेट पिज्जा बनवण्याची पद्धत
Instagram यूजर jyotiz_kitchen यांनी शेअर केलेल्या रेसिपीनुसार, एक पॉकेट पिझ्झा बनवण्यासाठी 2 ब्रेड स्लाइस घ्या. ब्रेडच्या कडा कापून घ्या. आता ब्रेडवर दाब देऊन रोलिंग पिनने रोल करा. एका भांड्यात तिन्ही शिमला मिरची, मटार, गाजर, स्वीट कॉर्न, मेयोनेझ, शेझवान चटणी, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, मीठ, आमचूर पावडर घालून मिक्स करा.
यानंतर ब्रेडच्या काठावर थोडे दूध लावा आणि तयार केलेले मिश्रण ब्रेडवर लावा. त्यावर मोझारेला चीज टाका. आता त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवा. काट्याच्या चमच्याने ब्रेडभोवती दाब द्या, जेणेकरून दोन्ही ब्रेड एकमेकांना व्यवस्थित चिकटतील आणि पॉकेट तयार होईल. आता त्याच्यावर तूप किंवा वितळलेले लोणी लावा. काही चिली फ्लेक्स शिंपडा आणि मायक्रोवेव्हमध्ये 450 अंशांवर दोन मिनिटे गरम करा. अशाप्रकारे चविष्ट पॉकेट पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनुसातर त्यात काही घटक आणि प्रमाण वाढवू शकता.
Weekend Recipe : वीकेंडला मुलांसाठी बनवा ही चटपटीत इडली चाट; मुलंही बोटं चाटून खातील
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.