मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Breakfast Recipe : अगदी कमी वेळेत बनवा आणि 20 दिवस खा; पाहा डाळ कचोरीची भन्नाट रेसिपी

Breakfast Recipe : अगदी कमी वेळेत बनवा आणि 20 दिवस खा; पाहा डाळ कचोरीची भन्नाट रेसिपी

कचोरी हा पदार्थ अगदी परंपरागत आपल्या घरात आणला जातो आणि खाल्ला जातो. डाळ कचोरीची चव अगदी अप्रतिम असते. एकदा खाल्यानंतर कचोरी प्रत्येकजण पुन्हा-पुन्हा चाखतोच.

कचोरी हा पदार्थ अगदी परंपरागत आपल्या घरात आणला जातो आणि खाल्ला जातो. डाळ कचोरीची चव अगदी अप्रतिम असते. एकदा खाल्यानंतर कचोरी प्रत्येकजण पुन्हा-पुन्हा चाखतोच.

कचोरी हा पदार्थ अगदी परंपरागत आपल्या घरात आणला जातो आणि खाल्ला जातो. डाळ कचोरीची चव अगदी अप्रतिम असते. एकदा खाल्यानंतर कचोरी प्रत्येकजण पुन्हा-पुन्हा चाखतोच.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 02 डिसेंबर : बाहेरचे काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली की आपल्याकडे सर्वात आधी नाव येते म्हणजे कचोरीचे. कचोरी हा पदार्थ अगदी परंपरागत आपल्या घरात आणला जातो आणि खाल्ला जातो. डाळ कचोरीची चव अगदी अप्रतिम असते. एकदा खाल्यानंतर कचोरी प्रत्येकजण पुन्हा-पुन्हा चाखतोच. खूप जुन्या काळापासून लोकांचे सर्वात आवडते स्ट्रीट फूड रेसिपीपैकी डाळ कचोरी एक आहे.

मात्र कचोरी बाहेरून अणूंचा खाण्याची गरज नाही. तुम्ही कचोरी अगदी सोप्या रेसिपीने घरीदेखील बनवू शकता. कचोरी अनेक प्रकारे बनवता येते. मूग डाळ कचोरी, आलू कचोरी, कॉर्न कचोरी, कांदा कचोरी. मात्र आज आम्ही तुम्हाला पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या डाळ कचोरीची रेसिपी सांगणार आहोत. जी तुम्ही कमी वेळेत बनवू शकाल आणि जास्त दिवस टिकावू शकाल. Rj Payal's Kitchen या युट्युब चॅनेलवर ही कचेरी कशी बनवायची ते सांगितले आहे.

Breakfast Recipe Video : चहापासून बनवा बिस्कीट; रविवारी ब्रेकफास्टला नक्की ट्राय करा ही भन्नाट रेसिपी

डाळ कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मैदा - 2 वाट्या

मूग डाळ - 2 कप

बेसन - 7 चमचे

तूप - 5 चमचे

जिरे - 1 टीस्पून

एका जातीची बडीशेप - 1 टीस्पून

हळद - 1/2 टीस्पून

धने पावडर - 1 टीस्पून

गरम मसाला - 1 टीस्पून

सुका आंबा - 1 टीस्पून

आले पावडर - 1/4 टीस्पून

लाल तिखट - 1 टीस्पून

हिरवी मिरची - 2

तेल - तळण्यासाठी

मीठ - चवीनुसार

डाळ कचोरी कशी बनवायची

डाळ कचोरी बनवण्यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या त्यात थोडे मीठ आणि तूप घालून चांगले मिक्स करा. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. लक्षात ठेवा की पीठ मऊ असावे. यानंतर पीठाला तेल लावून कापडाने झाकून 30 मिनिटे बाजूला ठेवा. याआधी एका भांड्यात मूग डाळ दोन तास भिजत घाला.

ठरलेल्या वेळेनंतर मूग डाळ घेऊन मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडी सदबेदार वाटून घ्या. डाळीचे मिश्रण एका भांड्यात काढून बाजूला ठेवा. एक कढई घ्या आणि त्यात थोडे तेल टाका. मध्यम आचेवर तेल गरम करा. नंतर त्यात बडीशेप, जिरे आणि चिमूटभर हिंग घालून परतून घ्या. मसाल्यांचा सुगंध यायला लागल्यावर त्यात हळद, तिखट, धनेपूड, आमचूर पावडर, गरम मसाला व इतर मसाले आणि चवीनुसार मीठ टाका.

मसाले चांगले तळून झाल्यावर त्यात बेसन घालून मंद आचेवर तळून घ्या. यानंतर या मिश्रणात आधी तयार केलेल्या मूग डाळीची पेस्ट टाकून 5 मिनिटे परतून घ्या. आणि या मिश्रणातील मॉइश्चर पूर्णपणे जाईपर्यंत ते हलवत राहा. नंतर डाळीचे दाणेदार आणि कोरडे मिश्रण तयार होत.

Recipe video : पाणीपुरी आणि भजी सगळेच खातात, पण तुम्ही कधी पाण्यातली भजी खाल्लीये का? नक्की ट्राय करा

मैद्यच्या पिठाचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्या. नंतर अंगठ्याने दाबून खोल करून त्यात मूग डाळीचे तयार सारण टाका. यानंतर सारण बंद केल्यानंतर, अतिरिक्त पीठ बाहेर काढा आणि एक गोल गोळा करा. नंतर हा गोळा तळहातांमध्ये ठेवा आणि दाबा. त्याचप्रमाणे सर्व मसाला कचोऱ्या तयार करा. तुम्हाला हव्या तितक्या लहान मोठ्या आकाराच्या कचोऱ्या तुम्ही बनवू शकता.

" isDesktop="true" id="794013" >

आता कढईत तेल टाकून मिडीयम गरम करा. त्यानंतर कचोऱ्या मंद आचेवर ठेवून तळून घ्या. कचोऱ्या दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. या कचोऱ्या चांगले तळण्यासाठी 10-15 मिनिटे लागतील. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढा. तुमची चवदार दाल कचोरी तयार आहे. आता या कचोऱ्या तुम्ही चहा किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता. या कचोऱ्या थंड झाल्यावर एका एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवा. अशाने त्या 15 ते 20 दिवस टिकू शकतात.

First published:

Tags: Food, Lifestyle, Recipie